Subscribe Us

जागतिक ग्राहक दिन : काय आहे ग्राहकांचे हक्क (दि.१५ मार्च २०२२)


जागतिक ग्राहक दिन :  काय आहे ग्राहकांचे हक्क  (दि.१५ मार्च २०२२)

जागतिक ग्राहक दिन साजरा करणे बाबत पत्र

15 मार्च रोजी दरवर्षी  जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो.  भारतात  24 डिसेंबरला दरवर्षी ‘National Consumer Day’ अर्थात ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ साजरा केला जातो.


15 मार्च 1962 मध्ये अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी ग्राहकांच्या अधिकारांबद्दल भाषण केले होते.ग्राहक हक्कांबद्दल भाष्य करणारे ते पहिले नेते ठरले होते. ग्राहक हक्कांची चळवळ चालवणाऱ्या नागरिकांनी 1983 मध्ये पहिल्यांदा जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यास सुरुवात केली. जागतिक ग्राहक दिन हा आतंरराष्ट्रीय पातळीवर 15 मार्चला साजरा केला जातो.

 ग्राहकांचे मुख्य अधिकार

– सुरक्षिततेचा अधिकार

– माहितीचा अधिकार

– निवड करण्याचा अधिकार

– समस्या निराकरण करण्याचा अधिकार

– ग्राहक शिक्षणाचा अधिकार


जागतिक ग्राहक दिनाची 2021 ची थीम काय होती ? 

राष्ट्रीय ग्राहक दिन 

    जागतिक ग्राहक दिनानिम्मित दरवर्षी विविध विषयांवर भाष्य करणारी थीम निवडली जाते. यंदाच्या ग्राहक दिनानिमित्त “Tackle Plastic Pollution.” ही थीम निवडण्यात आली आहे. परिसंस्था सध्या एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक मुळे विविध समस्यांना तोंड देत आहे. महासागरांमध्ये प्लास्टिक वाढत आहे. त्यामुळे ग्राहक दिन साजरा करत अशताना प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी ही थीम निवडण्यात आली.

    भारतात 1986 मध्ये 24 डिसेंबरला ग्राहक संरक्षण कायदा तयार करण्यात आला. तर, सन 1991 आणि 1993मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली. या कायद्याचा जास्तीत जास्त वापर केला जावा म्हणून डिसेंबर 2002मध्ये पुन्हा या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. नंतर 15 मार्च 2003पासून या कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. तथापि, या कायद्यातसुद्धा 1987मध्ये सुधारणा करण्यात आली होती. परंतु, 5 मार्च 2004 रोजी याची संपूर्ण अधिसूचना देण्यात आली


ग्राहक चळवळीचा भारतातील  इतिहास  व कार्य

जागतिकीकरणानंतर जग हे ग्लोबल खेड्यात रुपांतरित होत आहे. ग्लोबल खेड्यांची बाजारपेठदेखील झपाट्याने विकसित होत आहे. विकसित होणाऱ्या बाजारात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आगमनामुळे जगातील सर्वच देशात नामांकित ब्रँडस् सहजपणे उपलब्ध होत आहेत. त्यातच ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय ग्राहकांकडे आल्याने नामांकित ब्रँडस् एका क्लिकसरशी ग्राहकांना घरपोच मिळू लागला आहेत. बाजारातल्या या वाढत्या स्पर्धेमुळे आज ग्राहक हा खऱ्या अर्थाने ग्राहक राजा बनला आहे. अशा परिस्थितीत ग्राहक राजाची फसवणूक होऊ नये याकरिता ग्राहक हक्क सरंक्षण व्यवस्था मजबूत असायला हवी.


देशातील ग्राहक हक्क संरक्षण व्यवस्थेबाबत माहिती 

                 भारतात ग्राहक हक्क संरक्षण चळवळ क्षेत्रात सुरूवातीला खाजगी व स्वंयसेवी संस्थांच्या पातळीवर प्रयत्न करण्यात येत होते. महाराष्ट्रात बिंदुमाधव जोशी यांनी 1974 साली ग्राहकांचे संघटन केले आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची स्थापना करण्यात आली. अशा प्रयत्नांच्या माध्यमातून ग्राहक चळवळीचा विस्तार देशभरातझाला.ग्राहक हक्क संरक्षणासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकारानेच देशात ग्राहक संरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकावर 24 डिसेंबर 1986 रोजी राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर देशभरात तो कायदा म्हणून लागू करण्यात आला. त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून भारतात 24 डिसेंबर रोजी 'राष्ट्रीय ग्राहक दिवस' साजरा करण्यात येतो. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे सर्व ग्राहकांना सुरक्षेचा अधिकार, उत्पादनाबाबतच्या माहितीचा अधिकार, निवडीचा अधिकार, तक्रार निवारणाचा अधिकार आणि ग्राहक शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे. या आधारे एखाद्या उत्पादन सेवेबाबत जाणून घेणे त्याबाबत तक्रार असल्यास त्याचे निरसन करुन घेण्याचा हक्क नागरिकांना मिळू शकला. या कायद्यामुळे ग्राहकांचे हक्क जोपासण्याच्या द्ष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले गेले.

                      ग्राहकांना आवश्यक मार्गदर्शन थेट मिळावं यासाठी राज्यात 15 सप्टेंबर 2011 पासून स्वतंत्र हेल्पलाईन कार्यरत आहे. ग्राहक 1800-22-2262 या क्रमांकावर हेल्पलाईनला फोन करुन आपल्या शंकाचे निरसन करु शकतात. ग्राहककेंद्रीत बाजारव्यवस्था निर्माण होणे ही काळाची गरज असताना अशा सुविधांचा लाभ घेऊन ग्राहकांनीदेखील आपले हक्क जाणून घेणे गरजेचे आहे. हक्कांचा उपयोग करुन ग्राहक हित जोपासणारी व्यवस्था निर्माण होण्याच्यादृष्टीने सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने ग्राहक हा ‘राजा’ होऊ शकेल.

Post a Comment

0 Comments