Subscribe Us

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजना EDUCATION LOAN FOR OBC STUDENTS


ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजना

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादितकडून इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राज्य तसेच देशांतर्गत शिक्षणासाठी १० लाख रुपये आणि परदेशातील शिक्षणासाठी २० लाख रुपये मर्यादित कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

या योजनेमध्ये उमेदवारांना बँकेत भरलेल्या व्याजाच्या १२ टक्केपर्यंत व्याज परतावा मिळणार आहे

    लाभार्थीच्या पात्रतेच्या अटी व शर्ती :

    १. अर्जदाराचे वय १७ ते ३० वर्षे असावे.

    २. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी व इतर मागास प्रवर्गातील असावा,

    ३. अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामिण व शहरी भागाकरीता रु.८.०० लक्ष पर्यंत व शासनाच्या सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या नॉन क्रिमिलेअर च्या मर्यादेत

    ४. अर्जदार इयत्ता १२ वी ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.

    ५. पदवीच्या द्वितीय वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी ६०% गुणांसह पदवीका (Diploma) उत्तीर्ण असावा.

    ६. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किमान ६०% गुणांसह पदवी उत्तीर्ण असावा.

    ७. केवळ पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमाकरीता शासन मान्यता प्राप्त संस्थेमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी.

    ८. अर्जदार कोणत्याही वित्तीय संस्थेचा, बँकेचा थकबाकीदार नसावा / अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी असल्यास अर्जदाराचे पालक यांचे थकबाकीदार नसावेत,

    ९. बँकेने मंजुर व वितरीत केलेल्या रक्कमेवरील व्याजाची नियमित परतफेड करणारे अर्जदार व्याज परतावा योजनेसाठी पात्र राहील.

    १० राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याकरीता बँकेने उपलब्ध करुन दिलेल्या कर्जामध्ये शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदी व अर्जदाराच्या राहण्याचा व भोजनाचा खर्च समावेश राहील.

    ११. परदेशी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याकरीता बँकेने उपलब्ध करून दिलेल्या कर्जामध्ये फक्त शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदीचा समावेश राहील.

    १२. अर्जदाराचा सिबील क्रेडिट स्कोअर ०-१ (म्हणजेच यापूर्वी त्याने कर्ज घेतलेले नसावे किंवा ५०० पेक्षा जास्त असावा.

अधिकृत वेबसाईट - CLICK HERE 

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्याबाबत. CLICK HERE 

कर्ज प्रस्तावा सोबत अपलोड करावयाची कागदपत्रे :

१. अर्जदाराचा इतर मागास प्रवर्गातील जातीचा दाखला

२. उत्पन्नाचा दाखला

३. महाराष्ट्राचा रहिवाशी दाखला (Domicile)

४. अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे आधार कार्ड (Front & Backside).

५. ज्या अभ्यासक्रमाकरीता शैक्षणिक कर्ज आवश्यक आहे त्या अभ्यासक्रमासाठीची पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका.

६. अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे पासपोर्ट आकारातील फोटो.

७. अर्जदाराचा जन्माचा / वयाचा दाखला.

८. शैक्षणिक शुल्क संबंधित पत्र

९. शिष्यवृत्ती (Scholarship), शैक्षणिक शुल्कमाफी (Free ship) पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र.

१०. मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा.

११. आधार संलग्न बैंक खाते पुरावा.

१२. इतर आवश्यक पुरावे


शैक्षणिक अभ्यासक्रमाबाबत आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. 

ही योजना ऑनलाईन असून महामंडळाच्या https://education.msobcfdc.in/users/obc.html    या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करावे लागणार आहे. राज्य, देशांतर्गत तसेच परदेशी अभ्यासक्रमामध्ये येणारे अभ्यासक्रम आरोग्य विज्ञानमधील सर्व पदवी व पदव्युतर अभ्यासक्रम, अभियांत्रिकीमधील सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम, व्यावसायिक व व्यवस्थापन अभ्यासक्रमामधील कृषि, अन्न प्रक्रिया व पशू विज्ञान, दुग्ध विज्ञानमधील सर्व संबंधित अभ्यासक्रम यात समाविष्ट आहेत. व्याज परतावा व परफेडीचा कालावधी हा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण हाईपर्यंत बँकेने वितरीत केलेल्या कर्ज रकमेवरील व्याजाची नियमित परतफेड केलेल्या उमेदवाराला केवळ व्याजाचा परतावा महामंडळ उमेदवाराच्या आधार लिंक बँक खात्यात वर्ग करेल. कर्जाचा कालावधी जास्तीत जास्त ५ वर्षे असेल. ज्या पात्र उमेदवारांनी सदर योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी महामंडळाच्या वेबसाईटवर अर्ज सादर करावेत. अधिक माहिती करिता जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ  यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments