Subscribe Us

चंद्रग्रहण 2022 वैशिष्ट्ये व ग्रहणाची शास्त्रीय कारणे todays lunareclipse 2022 and scientific reason


चंद्रग्रहण 2022 वैशिष्ट्ये व ग्रहणाची शास्त्रीय कारणे  todays lunareclipse 2022 and  scientific reason
  •  आज चंद्रग्रहण असून, हे या वर्षातील शेवटचे आणि दुसरे ग्रहण आहे.
  • आज ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. हे ग्रहण देशातील अनेक भागांत दिसणार आहे. चंद्रग्रहण १ तास १० मिनिटे दिसणार
  •  ते भारतात संध्याकाळी ०५ वाजून ०९ मिनिटे ते ०६ वाजून १९ मिनिटे या वेळेत दिसेल. भारतात ग्रहणाचा एकूण कालावधी एक तास १० मिनिटे राहील.
  • हे ग्रहण विशेष आहे कारण यानंतर पुढील तीन वर्षे अशी कोणतीही खगोलीय घटना दिसणार नाही. याव्यतिरिक्त, चंद्राच्या वर फक्त एक बोटाची रुंदीवर एक तेजस्वी तारा युरेनस दिसेल.

हे दृश्य असेल

एकूण चंद्रग्रहण सुमारे एक ते दीड तास दिसणार आहे. 'ईस्टर्न टाईम झोन'नुसार, सकाळी ०५ वाजून १६ मिनिटे ते सकाळी ०६ वाजून ४१ मिनिटे या वेळेत ते दृश्यमान असेल. दरम्यान, पृथ्वी चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये जाते. "ब्लड मून" म्हणून ओळखला जाणारा, तो सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या प्रकाशातून लाल-केशरी रंगात पृथ्वीवर दिसेल.

महाराष्ट्रात गडचिरोली येथे सर्वांत आधी सायंकाळी ५.२९ वाजता ते दिसेल. नागपूरला हे ग्रहण ५.३२ वाजेपासून पाहता येईल. चंद्र हा ग्रहणातच उगवलेला असेल. तब्बल दोन तास हा सोहळा अनुभवता येणार आहे. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत येणार आहेत; पण यावेळी पृथ्वी मध्ये असेल आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडणार असल्याने हे ग्रहण होईल

कुठे किती वाजता चंद्रग्रहण?

नागपूर सायं. ५.३२ वा.

गडचिरोली सायं. ५.२९ वा.

चंद्रपूर सायं. ५.३३ वा.

यवतमाळ सायं ५.३७ वा.

अकोला सायं ५.४१ वा.

जळगाव सायं. ५.४६ वा.

औरंगाबाद सायं. ५.५० वा.

नाशिक सायं. ५.५५ वा.

पुणे  सायं. ५.५७ वा.

 मुंबई  सायं ६.०१ वा.

ग्रहणाची शास्त्रीय माहिती 

ग्रहण हे दोन प्रकारचे असते.

 1) चंद्रग्रहण

a} खंडग्रास चंद्रग्रहण

b} खग्रास चंद्रग्रहण

 2) सूर्यग्रहण 

a} खंडग्रास सूर्यग्रहण 

b} खग्रास सूर्यग्रहण

c} कंकणाकृती सूर्यग्रहण

चंद्रग्रहण

 खंडग्रास चंद्रग्रहण - पृथ्वीच्या चंद्रावरील सावलीमूळे चंद्राचा काही भाग झाकतो त्याला खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतात.

खग्रास चंद्रग्रहण - पृथ्वीच्या सावलीमुळे संपूर्ण चंद्र झाकतो त्याला खग्रास चंद्रग्रहण म्हणतात.


 चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेलाच होते.

 सूर्यग्रहण नेहमीच अमावस्येला घडते.

 अमावस्येला चंद्र हा पृथ्वी व सूर्याच्या मध्ये असतो.

सूर्यग्रहण

सूर्यग्रहणात पृथ्वी, चंद्र व सूर्य एका सरळ रेषेत येतात. चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्यामुळे सूर्य झाकतो यालाच सूर्यग्रहण. म्हणतात.

सूर्यग्रहणाचा कालावधी जास्तीत जास्त 107 मिनीटे असतो.

 खंडग्रास सूर्यग्रहण - चंद्राच्या पृथ्वीवरील उपच्छायेमुळे सुर्याचा काही. भागच झाकला जातो यालाच खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात.


 खग्रास सूर्यग्रहण - चंद्राच्या पृथ्वीवरील प्रच्छायेने संपूर्ण सुर्य झाकला जातो यालाच खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. 

सूर्यग्रहणाचा कालावधी जास्तीत जास्त 7 मिनीटे 20 सेकंद.



 कंकणाकृती सूर्यग्रहण - चंद्राच्या अपभू स्थितीत चंद्राची सावली पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. चंद्राच्या प्रच्छायेमुळे सूर्याचा मधलाच भाग. झाकतो यालाच कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.

Post a Comment

0 Comments