Subscribe Us

जनरल रजिस्टर दाखल खारीज रजिस्टरचा व शाळा सोडण्याचा दाखला नवीन नमुना ठेवणेबाबत शासन निर्णय


जनरल रजिस्टर दाखल खारीज रजिस्टरचा  व शाळा सोडण्याचा दाखला नवीन नमुना ठेवणेबाबत शासन निर्णय 

शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रात व त्या अनुषंगाने सर्वसाधारण नोंदवहीमध्ये कोणत्या नोंदी आवश्यक आहे याबाबत पालकांकडून व शाळा मुख्याध्यापकांकडून सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. या सूचनांच्या आधारे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या, सर्व मंडळांचे अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांसाठी शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रात व सर्वसाधारण नोंदीत राज्यभर एकसारखेपणा आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील बालकांच्या प्रवेशाबाबतच्या तरतूदी, सरलप्रणाली मध्ये घ्यावयाच्या आवश्यक नोंदी तसेच पालक व शाळांचे मुख्याध्यापकांकडून प्राप्त झालेल्या सूचनांचा साकल्याने विचार करुन शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व त्या अनुषंगाने सर्वसाधारण नोंदवही (जनरल रजिस्टर) यातील नोंदीबाबत राज्यभर एकसारखेपणा आणण्यासाठी सोबत जोडलेल्या सुधारित नमुन्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. हा शासन निर्णय २०१६-१७ या वर्षापासून लागू राहील. सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनांच्या - शाळांना हा निर्णय लागू राहील. सर्व शाळा प्रमुखांनी आपापल्या शाळांमध्ये रजिस्टर व शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यांची छपाई नवीन नमुन्याप्रमाणे करुन घ्यावी.

जनरल रजिस्टर नवीन नमुना  CLICK HERE

शाळा सोडण्याचा दाखला TC नवीन  नमुना  CLICK HERE

जनरल रजिस्टर शासन निर्णय  CLICK HERE




Post a Comment

0 Comments