पीएम श्री योजना PM Shri Scheme संपूर्ण माहिती
प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया (PM-SHRI) योजनेंतर्गत, संपूर्ण भारतात 14,500 शाळा विकसित आणि श्रेणी सुधारित करण्यात येणार आहेत. प्रत्येक तालुक्यातील एक शाळा आदर्श शाळा बनविली जाईल. ज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा (NEP) संपूर्ण आत्मा अंतर्भूत होईल.
देशभरातील सुमारे 14,500 सरकारी शाळा ह्या पीएम श्री योजना ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2022 अंतर्गत अपग्रेड करण्याची योजना आहे. सोलर पॅनल, स्मार्ट कचरा विल्हेवाट आणि व्यवस्थापन प्रणाली, नैसर्गिकरीत्या लागवड केलेल्या पौष्टिक बागा, जलसंधारण आणि कापणी यंत्रणा इत्यादींसह शाळांना "ग्रीन स्कूल" म्हणून विकसित केले जाईल. NEP 2020 ची ठळक वैशिष्ट्ये प्रतिबिंबित करण्यासाठी अभ्यासक्रम आणि अतिरिक्त - अभ्यासक्रम क्रियाकलाप देखील सुधारित केले जातील. मार्गदर्शनासाठी प्रत्येक शाळा उच्च शिक्षण संस्थांशी जोडली जाईल आणि स्थानिक कारागिरांसोबत इंटर्नशिपची तरतूद असेल.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशातील 14,500 प्राथमिक शाळांचा चेहरामोहरा बदलणारी एक योजना संमत करण्यात आली असून या योजनेच्या क्रियान्वयनासाठी 27 हजार 360 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यामुळे 18 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचा लाभ होणार असून ही योजना नंतर विस्तारण्यात येणार आहे.
केंद्रीय विद्यालयासह नवोदय विद्यालय आणि इतर उपक्रमांतर्गत चालविण्यात येणारी विद्यालये व शिक्षण केंद्रांचा या योजनेतर्गत विकास करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारांकडून चालविण्यात येणाऱ्या शाळा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा यांचाही समावेश या योजनेत करण्यात येणार आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 सप्टेंबरला शिक्षक दिनानिमित्त PM - SHRI पीएम- श्री या योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या खर्चापैकी 18 हजार 128 कोटी रुपये केंद्र सरकारकडून तर उरलेले संबंधित राज्य सरकारांकडून दिले जाणार आहेत. केंद्रीय शाळांच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी दक्षता समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती शाळांच्या दैनंदिन तसेच नैमितिक कार्यावर लक्ष ठेवणार आहे. कामगिरीची छाननी करून त्यांना योग्य त्या सूचना देण्याचे कामही या समितीवर सोपविण्यात आले आहे.
पीएम श्री योजना PM Shri Scheme
5 सप्टेंबर 2022 ला शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीया योजनेची घोषणा केलीआहे
या योजनेची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत
1) विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांच्या अंगभूत कौशल्यांना प्रोत्साहन देऊन शिक्षणाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित करण्याची ही योजना आहे.
2) निसर्ग आणि आधुनिकता यांचा समन्वय साधणे.
3) आधुनिकतेबरोबरच परंपरेलाही जपण्याचा हेतू नव्या योजनेत आहे.
4) आधुनिकरणानंतर शाळांमध्ये पुस्तके ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिकावर भर देण्यात येणार आहे.
5) पर्यावरण संरक्षणाविषयी जागृती विद्यार्थीदशे पासूनच केली जाणार.
उच्च गुणवत्तेच्या शिक्षणाचे ध्येय
सरकारी शाळांमधील शिक्षणाची गुणवता सुधारावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून याच उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे. शाळेच्या अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकावर भर देण्यात येणार असून विद्यार्थ्यांना रोजगार क्षम आणि कौशल्य संवर्धक शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. केवळ पुस्तकी शिक्षणावर भर न देता विद्यार्थ्यांच्या पोटाचे प्रश्न सोडण्याचे शिक्षण ही देण्यावर भर देण्याची केंद्र सरकारची योजना आहे.
प्रत्येक विभागात एक आदर्श शाळा
प्रत्येक शैक्षणिक विभागात ब्लॉक पातळीवर एक तरी आदर्श शाळा असावी असे केंद्र सरकारचे धोरण आहे या शाळेकडे पाहून नंतर इतर शाळानाही तशा प्रकारे कार्य करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण त्यासाठी अभ्यासक्रमात वेगळे प्रयोग करण्यास शिक्षकांनाही प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
निसर्ग संरक्षणाला प्राधान्य
शिक्षण क्रमात इयत्ता पहिलीपासून निसर्ग आणि संवर्धन तसेच पर्यावरण संरक्षण आधी विषयाचे धडे समाविष्ट केले जाणार आहेत. जलसंधारण जलसंरक्षण आणि पाण्याचा उपयोग आदी विषयाचे शिक्षण इयत्ता तिसऱ्या चौथ्या वर्गापासून दिले जाणा आहे. निसर्ग शेती, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक मुक्त परिसर आधी आधुनिक संकल्पना विद्यार्थ्यांच्य मनावर बालपणापासूनच ठसविण्यात येणार आहेत.
पारंपरिक संकल्पनांचे जतन
जलसंधारण आणि जलसंरक्षण यांच्या संदर्भात पारंपारिक संकल्पनाचे पुनर्जन करून या संकल्पनांना आधुनिक काळात कसे वापरता येईल यासंबंधी ही केंद्र सरकार विचार करणार आहे खेड्यांमधील तळ्यांचे पुनर्जन करण्याची योजन यापूर्वीच क्रियान्वित करण्यात आलेली आहे. य योजनेअंतर्गत एक लाखावर अधिक खेड्यांमध्ये नैसर्गिक जलस्रोतांना पुनर्जीवित करण्यात आले आहे.
शिक्षणाच्या गुणवत्तेवर भर
केंद्र सरकारच्या नव्या योजनेचे उद्दिष्ट केवळ शाळांमध्ये दिखाऊ परिवर्तन करण्याचे नसून अमुलाग्र परिवर्तनावर भर देण्यात येणार आहे. संगणकीय शिक्षणाबरोबरच शेती, वृक्ष संवर्धन, वनस्पतीचे मानवी जीवनात उपयोग, पाण्याचा योग्य तेवढाच वापर इत्यादी शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.
PM SHRI Portal login शाळेचा UDISE व HM Registered Mobile वरून लॉगीन करता येईल.
PM SHRI Schools Login link - Click Here
PM SHRI Schools Registration link - Click Here
Login for National, State & District User link - Click Here
PM SHRI Schools Portal link - http://pmshrischools.education.gov.in/
0 Comments