Subscribe Us

शिक्षकांनी नेटीझन व्हावे. जिल्हास्तरीय तंत्रस्नेही शिक्षकांच्या संगणक कार्यशाळेत आमदार श्री राहुलभाउ बोंद्रे यांचे प्रतिपादन

शिक्षकांनी नेटीझन व्हावे. जिल्हास्तरीय तंत्रस्नेही शिक्षकांच्या संगणक कार्यशाळेत आमदार श्री राहुलभाउ बोंद्रे यांचे प्रतिपादन 
शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाची निर्माण झालेली काळाची गरज लक्षात घेऊन शिक्षकांनी मराठी शिक्षणात नवचैतन्य निर्माण करावे.विद्यार्थ्यांसाठी स्वत: शिक्षकांनी  संगणकीय शैक्षणिक साधने निर्माण करून विद्यार्थ्याचे ज्ञान विश्व समृद्ध करावे शिक्षकांनी आता फक्त सिटीझन न होता नेटीझन व्हावे   असे प्रतिपादन चिखली विधानसभा मतदार संघाचे लाडके आमदार श्री राहुलभाउ बोंद्रे यांनी दिनांक १२ एप्रिल २०१५ रोजी श्री शिवाजी डि.एड कॉलेज ,चिखली येथे तंत्रस्नेही शिक्षकांच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत व्यक्त केले . कार्यशाळेला बुलडाणा जि.प मधील तेराही पंचायत समितीतील जवळपास साठ  शिक्षक उपस्थित होते.हिंगोली तसेच जळगाव जिल्हयाची शिक्षकही उपस्थित होती हे विशेष .  चिखली पं.स चे शि.वि.अ. श्री काळे साहेब ,श्री शिंदे साहेब  ,केंद्र प्रमुख श्री गावडे ,शि.वि.अ.मेहकर दिपक सवडतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत  सकाळी दहा वाजतापासुन सुरु झालेल्या कार्यशाळेत  सातारा  येथुन आलेले राज्यपुरस्कार प्राप्त जिप प्राथमिक शिक्षक  श्री बालाजी जाधव व श्री राम सालगुडे सर यांनी अतिशय छान पद्धतीने मार्गदर्शन करत ब्लॉग कसा बनवावा,गुगल डॉक्स ,पी.पी.टी.,youtube वापर ,video uploading,video conference,google drive,hangout,photoshop  आणि इतर अत्यंत महत्वाचे SOFTWARE ची प्रात्यक्षिकसह ची माहीती दिली.  विशेष म्हणजे राज्याचे शिक्षण सचिव श्री नंदकुमार साहेब यांनी सर्वाना कार्यशाळा सुरु असताना SMS मार्फत शुभेच्छा दिल्या.
           कार्यशाळेच्या समारोपात चिखली विधानसभा मतदार संघाचे लाडके आमदार श्री राहुलभाउ बोंद्रे यांनी गरूडझेप शिक्षण प्रकल्पासाठी या कार्यशाळेचा निश्चितच लाभ होणार असून  कार्यशाळेचे आयोजन तंत्रस्नेही शिक्षक रविंद्र नादरकर व त्यांचे सहकारी यांनी  घडवुन आणल्यामुळे त्यांचे कौतुक आपल्या समारोपीय  भाषणातुन केले. गरूडझेप शिक्षण प्रकल्पाची आज संपुर्ण महाराष्ट्र कसा दखल घेतअसून.आ.राहुलभाउंचे गरूडझेप प्रकल्पातील योगदान याची माहिती शिक्षण विस्तार अधिकारी काळे यांनी सांगितली . आ.राहुलभाऊ    तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.सत्येंद्र भुसारी  यांचे हस्ते सहभागी शिक्षकांना  शैक्षणिक SOFTWARE सीडीचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे बहारदार संचलन विजय मोंढे यांनी तर आभार प्रदर्शन अरुण गरुड यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  बाळु गव्हाने , प्रशांत वायकोस सागर  संजय सोनुने सतीश शिंदे सागर दंडेकर मधुकर सांळुके यांनी परिश्रम घेतले .