Subscribe Us

शेगाव येथे जमला तंत्रस्नेही शिक्षक मेळा

तंत्रस्नेही शिक्षकांच्या संमेलनात विविध विषयांवर चर्चा...

विदर्भातील संत श्री गजानन महाराजांच्या शेगावनगरीत (जि.बुलढाणा) येथे दि.१ व २ जून रोजी पार पडलेल्या तंत्रस्नेही शिक्षकांच्या संमेलनात विविध विषयांवर चर्चा झाली.

दोन दिवस झालेल्या कार्यशाळेत चिंतन करत मराठी शाळा टिकविण्यासाठी टेक्नोस्नेही शिक्षकांकडून धडे घेत जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांनी तंत्रस्नेही व शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविण्यासाठी पाउले उचलली आहेत.

या तंत्रस्नेही संमेलनात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या दोन हजार शिक्षकांनी विविध परिसंवादाद्वारे आपली गुणवत्ता वाढविण्याबरोबरच जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून मुलांना व पालकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी विचारविनिमय केला. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांचा कायापालट करण्याचा निश्‍चय करताच विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाची माहिती घेतली. या वेळी शिक्षकांनी ज्ञानगंगा घराघरात पोहचविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांना अधिक सक्षम बनविण्याचा निश्‍चय केला.

संमेलनाचे उद््घाटन महात्मा फुले प्रसारक मंडळाचे अध्यक्ष इरभान शेगोकार यांच्या हस्ते झाले. या वेळी मुख्याध्यापक हरिश चिंचोलकर, अँडमीन पॅनलचे प्रमुख संतोष भोंबळे, दीपक चामे आदींसह मान्यवर उपस्थित होते. पहिल्या सत्रात राहुल पाटील यांनी मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, विक्रम अडसूळ यांनी प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून द्यावे की इंग्रजीतून, डॉ. प्रभाकर लोंढे यांनी कृतीशील अध्यापन, रवींद्र राऊत यांनी कृतीशील शिक्षण उपक्रमांतून समाज सहभाग, रामदास घुगे यांनी विषयावर साहित्य निर्मिती, श्रीकृष्ण निहाळ यांनी शिक्षक -पालक व शाळा संबंध, पंकज पालीवाल यांनी शिक्षक संपर्क कौशल्य विकसन, ज्ञानदेव नवसरे यांनी उपक्रमातून शिक्षकांत नवचैतन्य या परिसंवादातून प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच दिले जावे, यावर चिंतन करण्यात आले. दुसर्‍या सत्रात शफी शेख यांनी सोशल नेटवर्किंगचा अध्ययन अध्यापनात वापर, ज्योती बेलवले यांनी ई लर्निंगच्या पुढे काय? रमजान शेख यांनी तंत्रज्ञान वापरातील शिक्षकांची सक्षमता, प्राथमिक शिक्षक असलेले वेब इंजिनिअर लक्ष्मण वाठोरे यांनी माहिती तंत्रज्ञानामध्ये शिक्षकांचा दृष्टिकोन व येणार्‍या अडचणी, राजू खाडे यांनी मोबाईलवरून शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती, राजेश कोगदे यांनी आनंददायी पाढे, सखाराम खुरपे यांनी स्पोकन इंग्लिश विषयावर मार्गदर्शन केले. दत्ता आम्रीत पाटील यांनी आपल्या स्वरचित चला शाळेला जाऊ, या प्रेरणा गीताने संमेलनात नवचैतन्य निर्माण केले. स्मिता गालफाडे याच्या गीतालाही विशेष दाद मिळाली. दुसर्‍या दिवशी संगीता पाटील, वैशाली सरोदे, नानासाहेब मंडलिक, किशोर भागवत, रवींद्र नादारकर, प्रज्ञा मेश्राम, शेवंती दांगट, स्मिता गालफाडे, सायाराबानू, लक्ष्मण दावनकर, राजू इंगले यांनी शिक्षक समृद्धीसाठी माझी भूमिका, या विषयावर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर ई लर्निंग विषयी श्रीकांत कंवठेकर यांनी व्हिडीओ निर्मिती, सुनील सगरे यांनी ऑफ लाईन अँप निर्मिती कशी करावी,हे प्रत्यक्ष कृतीतून माहिती दिली. यासह ब्लॉग निर्मिती वेबसाईट, अशा विविध विषयांवर मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले.

संमेलनाचा समारोप यवतमाळच्या शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. ई लर्निंग ही काळाची गरज आहे. जिल्हा परिषदेच्या शाळाबद्दल चुकीचे गैरसमज पसरविले जात आहे. शाळापासून मुले व पालक दूर का जात आहेत, याची समीक्षा करण्याची गरज आहे. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी किशोर बळी, अरविंद शिंगाडे, अशोक पंडित यांनी सूत्रसंचालन केले. संतोष भोंबळे, दीपक चामे, दत्ता पाटील, सचिन शेळके, घनश्याम सोनवणे, रवी भापकर, श्रीकृष्ण निहाळ, जोशी एम. बी.,प्रदीप कुंभार,पंकज पालीवाल,राठौड सर अंबाजोगई,रामदास कौटिकर,राजेंद्र कोळी, सतीश कोळी,कृष्णा बोरसे,सदाशिव पाटिल,उमेश कोटलवार, गुरुशान मंगी, हेमलता मॅडम, सायराबानू चौगुले, निलिमा गारपाल, शाम गिरी आदींनी परिश्रम घेतले.
.
शेगाव येथे 1 व २ जून रोजी महाराष्ट्रातील जि.प. च्या शिक्षकांनी व्हाटसअप च्या माध्यमातून स्वयंप्रेरणेने एकत्र येत तंत्रस्नेही शिक्षक संमेलन आयोजित केले होते या संमेलनाची c २४ taas news वर केलेली बातमी पाहण्यासाठी  http://youtu.be/LKsY5tnkzC0

Post a Comment

0 Comments