Subscribe Us

संदीप गुंड यांची कार्यशाळा चिखलीत संपन्न

संदीप गुंड यांची कार्यशाळा चिखलीत संपन्न ई-लर्निंग पॅटर्न राज्यासाठी आदर्श - राहुलभाऊ बोंद्रे


अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाव्दारे आयोजीत या एकदिवसीय कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक संदीप गुंड यांनी आधुनिक तंत्रज्ञानामुळे शिक्षकांचा तसेच विद्यार्थ्यांचा वेळ, श्रम व खर्च वाचतो तसेच प्रचलीत शिक्षण पध्दतीमध्ये आपण विद्यार्थ्यांना एकतर आमीष नाहीतर पनिश करतो, यामुळे विद्यार्थी फॉलोअर बनतात, यालाच आपण वर्तनवाद म्हणतो. परंतु आज आपल्या देशाने रचनावाद स्विकारून विद्यार्थ्यांना सृजनशिल व कल्पक बनविण्याची शिक्षण पध्दती स्विकारली असल्याचे सांगीतले. पारंपारीक शिक्षण पध्दतीला छेद देवून त्याऐवजी संकल्पनेचा व्हिडीओ जर विद्यार्थ्यांना दाखविला तर विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीत भर पडून ती बाब त्यांच्या मनोपटलावर कायमची कोरल्या जाते. ही बाब हेरून गत तीन वर्षापुर्वी ई-लर्नींग प्रकल्पाची मुहुर्तमेढ चिखली रोवली आहे.. त्यात अधिकाधिक प्रगती करून राज्यात चिखलीचा एक आदर्श निर्माण करावयाचा आहे, असा विश्‍वास आमदार राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केला.
स्थानिक नटराज चित्र मंदिरात प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांकरीता गरूडझेप शिक्षण प्रकल्पाअंतर्गत आयोजीत ई-लर्नींग कार्यशाळेच्या उद््घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पष्टेपाडा ता. शहापुर येथील डिजीटल स्कूलचे संदीप गुंड, जि.प.बांधकाम सभापती अंकुशराव वाघ, प.स.सभापती सत्यभामाताई डहाके, उपसभापती कोकीळाबाई परिहार, नंदकिशोर सवडतकर, न.प.उपाध्यक्ष म.आसीफ, गटविकास अधिकारी राजेश लोंखडे, गटशिक्षणाधिकारी राजपुत, विस्तार अधिकारी काळे, अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरूण नन्हई, अनुराधा औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.आर.बियाणी, अनुराधा तंत्रनिकेतनचे प्राचार्य व्हि.एल.भांबेरे, महेंद्र थिमते आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.अरूण नन्हई यांनी अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आ.बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षापुर्वी ई-लर्नींगची संकल्पना राबविण्यास सुरूवात झाल्याचे सांगून आजपर्यंत १00 शाळा ई-लर्नींग केल्याचे सांगीतले.
आज बुलढाणा चिखली येथे मा. श्री. संदीप गुंड सर(पष्टेपाडा शाळा) यांच्या कार्यप्रेरणेने यशस्वीरीत्या पार पडलेल्या डिजिटल कार्यप्रेरणा याकार्यक्रमाला तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेचे शिक्षक तसेच विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.तसेच मा.आमदार राहूल भाऊ यांच्या समवेत 15 अधिकारी / पदाधिकारी यांनी हजेरी लावली.सभागृहाची जागा अपुरी पडल्यानंतर सभागृहाबाहेरील लावलेल्या screen वरून शिक्षकांनी कार्यशाळेचा आनंद घेतला व आपल्या अभिप्रायात प्रचंड प्रेरणा घेऊन जात असल्याचे सांगितले.





Post a Comment

0 Comments