Subscribe Us

ज्ञानरचनावादी अध्ययन वर्ग व CD विमोचन - दि ५.११.२०१५

ज्ञानरचनावादी अध्ययन वर्ग व CD विमोचन - दि ५.११.२०१५ 


स्थळ - जिल्हा नियोजन सभागृह बुलडाणा 

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत मा दीपा मुधोळ मुख्य कार्य कारी अधिकारी जिप बुलडाणा  यांच्या संकल्पनेतून डायटचे  प्राचार्य सुभाष कांबळे  व जिप उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर  यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या अभ्यास दौरा माहे ऑक्टोंबर २०१५ कुमठे बीट सातारा येथील भेटीचे चित्रीकरण केलेले ज्ञानरचनावादी सीडी  सर्व जिप  शाळांना वितरीत  करण्यात आली आहे 





DOWNLOAD लिंक  -- https://www.youtube.com/watch?v=vg3HRpmmhhg

       मा.प्रधान सचिव नंदकूमार साहेब यांच्या आढावा बैठकीनंतर कुमठे बीट ला प्रत्यक्ष अनुभव घेऊन आलेल्या टिमचे अनुभव व ते digital स्वरुपात सर्वांना अनुभवता यावे यासाठी VIDEO CD चे अनावरण  कार्यक्रमाला मा विभागीय आयुक्त श्री राजूरकर साहेब , मा CEO Buldana दिपा मुधोळ मॅडम, मा जि प अध्यक्षा,अलका ताई खंडारे  मा उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर ,मा प्राचार्य कांबळे सर DIET Buldana, मा Ad.Collector टाकसाळे साहेब, मा शिक्षणाधिकारी वैशाली ठग मॅडम,  मा सभापती(बुलडाणा, मेहकर,संग्रामपूर,दे.राजा ),    सर्व गट शिक्षणाधिकारी  शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख, पत्रकार व  तंत्रस्नेही शिक्षक  समूह साधन व्यक्ती  असे एकूण  २७५  जण प्रामुख्याने उपस्थित होते.
         Video CD ची  वैशिष्टे 

  •  मा.नंदकुमार साहेब यांचे बुलडाणा दौऱ्यातील प्रगत महाराष्ट्र विषयी संवाद
  • बुलडाणा CEO , अध्यक्ष यांच्या शुभेच्छा
  • कुमठे बीटचे DIET अधिव्याख्याता  यांनी केलेले यशस्वी चित्रीकरण
  • जिप उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर  यांच्या प्रश्नांना प्रतिभाताई भराडे यांनी दिलेली उत्तरे  व मनोगत .
  • विद्यार्थी सहभागासह एकूण ४० उपक्रमाची माहिती .                                         
  • पदाधिकारी शिक्षक  यांच्या प्रश्नास कुमठे बीट मधील शिक्षकांनी दिलेली उत्तरे
  • राज्यात प्रथमच बुलडाणा DIET च्या वतीने केलेला प्रयत्न 
  • या Video CD ला आपणही Download  करू शकता .यासाठी https://www.youtube.com/watch?v=vg3HRpmmhhg  या लिंक वर click करा 
  •  
  • आता youtube वरील वीडियो मोबाइल वर करा download कुठलीही अप्प्स न वापरता😊त्यासाठी 
  • ▶Search video on YouTube
  • ▶copy url of video (वीडियो प्ले झाला की pause करा लिंक म्हणजे url दिसते )
  • ▶आता browser मधे savefrom.net ही साईट ओपन करा
  • ▶ तेथे url paste करा आणि next घ्या
  • ▶mp4 3gp.यापैकी फॉर्मेट select करा आणि download करा...
  • 😊आहे की नाही सोपे 😊
  • Information source by tantrsnehi Buldana

  ५0 शिक्षकांनी घेतले ज्ञानरचनावादाचे धडे (लोकमत मधील बातमी )

काय शिकतात विद्यार्थीकाय आहे कुमठे बीटला

प्रगतीशील शिक्षक उपक्रम : कुमठे बीटच्या विद्यार्थी केंद्रीत शाळेला शिक्षकांची भेट
जिल्ह्यातील एकूण ५0 शिक्षक सध्या कुमठे बीटला अभ्यास दौर्‍यावर गेले आहेत. या प्रशिक्षणावरून आल्यानंतर प्रथम आपल्या वर्गात नंतर शाळेमध्ये ते निश्‍चित बदल करतील, अशी अपेक्षा आहे. - दीपा मुधोळ
मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. बुलडाणा काय शिकतात विद्यार्थी ■ कुमठे बीटमधील शाळा विद्यार्थी केंद्रित बनविण्यात आली आहे. तेथील शिक्षक विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारतात. कुठल्याही विषयावर जे मनात येईल ते बोलण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना दिल्या जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती कौशल्याचा प्रचंड विकास झाला आहे. येथे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृती करण्याबर भर दिल्या जातो. कृतीयुक्त अध्यायनासाठी सहज उपलब्ध होणार्‍या वस्तूचा अतिशय कल्पकतेने वापर केला जातो. येथे इयत्ता पहिलीसाठी जून ते सप्टेंबर काळात विद्यार्थ्यांचे पुर्वज्ञान व चित्राच्या माध्यमातून शब्द ओळख व नंतर वाक्य ओळख करून दिल्या जाते. विद्यार्थ्यांना एक शब्द दिला की, विद्यार्थी त्या शब्दावर स्वानुभवावर आधारित असंख्य वाक्य तयार करतात. कार विद्यार्थ्यांची शब्द संपत्ती व अनुभव विश्‍व खूप समृद्ध आहे. काय आहे कुमठे बीटला ■ शिकवणार्‍याला जसं स्वातंत्र्य हवं तसे ते शिकणार्‍यालाही हवे म्हणून मूल समजून घ्यायला हवं, मुलं कसे शिकतात, हे समजून घेण्याचे काम रचनावाद करतो. हाच रचनावाद येथे शिकवल्या जातो. मूल स्वत: शिकू शकतं, यावर विश्‍वास ठेवणं आवश्यक आहे. करून बघणे, विचार करणे, वेिषण करणे, पडताळा घेणे, स्वत:चे मत तयार करणे, निर्णय घेण्याची संधी देणे, स्वत:च्या गतीने विकासाची संधी, खरं स्वातंत्र्य, खरा बालहक्क रचनावाद देतो. जो चुकतो, तो शिकतो, याप्रमाणे मुलांच्या चुका स्वीकारून चुकत चुकत शिकण्याची येथे संधी दिल्या जाते. बुलडाणा : जो चुकतो, तो शिकतो, मुलांच्या चुका स्वीकारून त्यांना चुकत चुकत शिकण्याची संधी दिल्यास मुले अधिक चांगले शिकू शकतात. यावर विश्‍वास ठेवून सातारा जिल्ह्यातील कुमठे बीट येथील विद्यार्थी केंद्रित शाळेला बुलडाणा जिल्ह्यातील ५0 शिक्षकांनी भेटी देऊन येथील शाळेच्या ज्ञानरचनावादाचे धडे घेतले. सध्या हे शिक्षक कुमठे बीट येथे प्रशिक्षण घेत आहेत. राज्याचे प्रधानसचिव नंदकुमार हे बुलडाणा जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना त्यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत उपक्रमशील शिक्षक हा उपक्रम मांडला होता. त्यासाठी त्यांनी सातारा जिल्ह्यातील कुमठे बीट येथील शाळांना भेटी देण्याचे शिक्षकांना आवाहन केले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण सभापती तथा जि.प. चे उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर यांच्यासह ५0 शिक्षकांची एक टीम सध्या कुमठे बीट येथे अभ्यास दौर्‍यावर गेली आहे. यामध्ये ८ केंद्रप्रमुख, ४ मुख्याध्यापक, ३७ शिक्षक आणि डाएटचे २ अधिव्याख्याता यांचा समावेश आहे. कुमठे बीट येथे प्रशिक्षणासाठी जाण्यापूर्वी या शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली होती. कुमठे बीट येथील प्रतिभा भराडे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील रचनावादी शिक्षण पद्धती जाणून घेण्याचे काम शिक्षक करीत आहेत.  
प्रतिनिधी)

सहकार्य व प्रेरणा  -   मा. दीपा मुधोळ , CEO बुलडाणा 

                                                डॉ.सुभाष कांबळे, प्राचार्य 

                                                 कु .वैशाली ठग शिक्षणाधिकारी (प्राथमिक )

                                            जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलडाणा 

                            कार्यालय शिक्षणाधिकारी प्राथमिक बुलडाणा  

Post a Comment

0 Comments