Subscribe Us

आयुक्त मा .भापकर साहेब यांच्या उपस्थित बुलडाणा शिक्षण परिषद संपन्न

शिक्षण आयुक्त मा .भापकर साहेब यांच्या उपस्थित बुलडाणा शिक्षण परिषद संपन्न

शब्दांकन-रविंद्र नादरकर व संदीप राऊत

२२८ शाळा झाल्या प्रगत
        प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत कुमठे बीट साताराच्या धर्तीवर ज्ञानरचनावाद पद्धतीने बुलडाणा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य व्यवस्थापनाच्या १५५९ पैकी २२८ शाळा प्रगत झाल्याच्या पार्श्वभूमीवर दिनांक १३ मार्च २०१६ ला एक दिवशीय शिक्षण परिषदेचे भव्य आयोजन राज्याचे शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर साहेब यांच्या उपस्थित करण्यात आले .

  प्रमुख उपस्थिती 

मा. पुरुषोत्तम भापकर साहेब , राज्य शिक्षण आयुक्त
 मा दीपा मुधोळ ,मुख्य कार्यकारी अधिकारी जिप बुलडाणा
मा.कुलकर्णी उपसंचालक अमरावती मा. पांडुरंग खेडेकर उपाध्यक्ष जिप बुलडाणा मा अंकुश वाघ अर्थ व बांधकाम सभापती मा सुभाष कांबळे प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था कु. वैशाली ठग शिक्षणाधिकारी प्राथमिक मा. सोनवणे शिक्षणाधिकारी माध्यमिक ज्योती परिहार गटशिक्षणाधिकारी हवेली ,पुणे अनिल अकाळ उपशिक्षणाधिकारी श्री चौधरी उपशिक्षणाधिकारी , समाधान डुकरे राजेश गवई अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नेहा शिरोळे ,विस्तार अधिकारी नाशिक श्याम मक्रमपुरे MOT राज्य समन्वयक

  शाळा व गावाला भेट 
भापकर साहेब यांनी सकाळी जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मलगी गावातील गावकऱ्यानां भेटून मुलांच्या प्रगती बाबत चर्चा केली .
जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा अंत्रीतेली तालुका बुलडाणा या प्रगत शाळेला भेट देऊन शाळेतील प्रत्येक मुलाची शैक्षणिक दर्जा बाबत पाहणी करून सदर शाळा प्रगत असल्याचे सांगून मुख्याध्यापक साळवे सर यांचे अभिनंदन करून शाळा प्रगत असल्याचे जाहीर केले .

शिक्षण परिषद 

राज्याचे शिक्षण आयुक्त मा. भापकर साहेबांच्या शिक्षकांशी संवादातून तसेच प्रगत शाळांचे शिक्षक ,केंद्रप्रमुख गटशिक्षणाधिकारी यांच्या PPT सादरीकरणाने सहकार मंदिर बुलडाणा येथे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्या अनुषगाने जिल्हातील प्रत्येक शाळेचा एक शिक्षक अश्या १५०० जणांच्या उपस्थित परिषद संपन्न झाली.
 परिषदेस मा आयुक्त महोदयांचे सकाळी १२.३० वाजता आगमन झाले ते त्यांनीच रचलेल्या व गायलेल्या ध्यास गुणवत्ता ..गुणवत्ता .... या गीताच्या पार्श्वभूमीवर
मोठ्या प्रसन्न चेहऱ्याने त्यांनी उपस्थित हजारो शिक्षकांना अभिवादन केले .
व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या औपचारिक स्वागतानंतर साहेबांनी प्रगत शाळांचे शिक्षक ,केंद्रप्रमुख गटशिक्षणाधिकारी यांनी केलेल्या PPT सादरीकरणाच्या च्या नोंदी काळजीपूर्वक ऐकत नोंदी घेतल्या

सादर झालेली presentations –


पाहुण्या मान्यवरांचे सादरीकरण –
नेहा शिरोळ शिक्षण विस्तार अधिकारी नाशिक - यांनी आपल्या तालुक्यातील ज्ञानरचनावाद कसा राबवला पालकांचा सहभाग , शिक्षक संवाद मुलांनाच मानसशास्त्र याविषयी उपस्थितांना अनुभव कथन केले .
ज्योती परिहार गटशिक्षणाधिकारी हवेली - हवेली तालुक्याचा गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभार घेतल्यानंतर शिक्षकांना विश्वासात घेऊन ,त्याचाच सहकार्याने ISO चळवळ , गुणवत्ता विकास कार्यक्रम राबविला . मला मिळालेला भारत सरकारचा पुरस्कार हा खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यासाठी काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान आहे . कोणतेही काम कठीण नसून ते ठरवून धेय्य निष्ठेने करणे महत्वाचे .

जिल्ह्यातील सादरीकरण

  मा. सुभाष कांबळे(प्राचार्य डाएट) बुलडाणा ---जिल्ह्यात मा.नंदकुमार साहेब यांनी भेट दिल्यानंतर शाळा प्रगत करण्याबाबत ची झालेली वाटचाल कथन केली .
मा श्री किशोर पागोरे गटशिक्षणाधिकारी मेहकर मा श्री राजपूत गटशिक्षणाधिकारी चिखली मुसद्वाले गटशिक्षणाधिकारी सिंदखेड राजा डॉ निर्मला जाधव(के प्र) श्री पवार (के प्र) श्री संदीप तायडे (सहशिक्षक,खुपगांव सव बुलडाणा) श्री राजू साळवे(स शि अंत्री तेली) श्री प्रवीण वाघ (मु अ) श्री संदीप राऊत(स शि रुईखेड टेकाळे) श्री म्हसने (स शि) श्री काटकर (सहशिक्षक मेहकर) श्री रवींद्र नादरकर तंत्रस्नेही शिक्षक - जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षक वाटचाल

शिक्षकांशी सुसंवाद व शंका समाधान
 
आललेले प्रश्न - ज्ञानरचनावाद पद्धतीने शिस्त बिघडते , बहुवर्ग अध्यापन , गतीमद विद्यार्थी याबाबत प्रश्न शिक्षकांनी विचारल्यावर श्याम मक्रमपुरे MOT राज्य समन्वयक यांनी सर्व प्रथम आपल्या मध्ये स्वतः वर विश्वास निर्माण करून दुसऱ्याच्या विश्वासास पात्र व्हा याबाबतचे मार्मिक विवेचन केले . शिस्त बिघडली तरी मुले प्रगत होतात . गतीमदविद्यार्थ्यांना प्रमाण पत्र देण्याची सुविधा नसून हि मुले सुद्धा प्रगत होतात हे ज्ञानरचनावाद सांगतो .

मा. श्री. पुरुषोत्तम भापकर साहेब यांच्या प्रेरणादायी भाषणाचे अंश

  • ज्ञानरचनावाद पद्धतीने इतक्या मोठ्या प्रमाणात शाळा प्रगत करणारा महाराष्ट्रात पहिला जिल्हा बुलडाणा ठरला आहे . 
  • विविध जिल्ह्यामधील १४०० शिक्षक पुढील आठवड्यात जिल्ह्यात प्रगत शाळांना भेटी देणार कामामुळे शिक्षकाचा खरा चेहरा समोर आला.
  • एक शिक्षकी शाळेचा मीसुद्धा विद्यार्थी!त्यामुळेच जि प साठी काहीतरी करायचं असं ठरवलं.
  • अंत्री तेली, वरखेड चे अभिनंदन !! 
  • 752 techno savy ची नोंदणी बुलडाणा येथे झाली, त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्र्रात चळवळ उभी झाली.  तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षण हे तुमच्या मागणीनुसार चार दिवसाचे करण्यात येईल 
  • मा. उपाध्यक्ष खेडेकर यांच्यासारखे पदाधिकारी तुम्हाला मिळाले हे भाग्य! 
  • टाचण, नियोजन कशाला हवे? कितीवेळ शाळेत, मुख्यालयी राहतो का? 24 तास शाळा कशाला? हे सर्व गौण, मुल शिकले पाहिजे हे महत्वाचे.
  • माझी खात्री एप्रिल च्या चाचणीत पर्यंतच बुलडाणा 100% प्रगत होणार!! 
  • माझ्या संपूर्ण service मध्ये उत्कृष्ट जि आर म्हणजे मा. नंदकुमार साहेबांचा!! शिक्षणाचा बायबल, कुराण व गीता म्हणजे हा GR. दुर्गम,
  • अत्यंत अड्चणीतल्या शाळांमध्ये (भामरागड, नंदुरबार जेथे 94% गळती)सुद्धा 450 शाळा दत्तक घेऊन सुधारल्या, बुलडाणा एवढा अवघड नाही.
  • " गुरुजी आमचा मोहरून गेला गुणवत्तेचा झाला बोलबाला" गुणवतेचाच सन्मान होत असतो.
  • शाळाबाह्य मुलांचा प्रश्न एका दिवसात सुटू शकतो, फक्त शिक्षकांची इच्छा हवी.
  • शिक्षक तणावमुक्त हवा!! बदलीचे सर्व प्रश्न मार्गी लागणार!! आंतर जिल्हा बदलीचा मार्ग लवकरच मार्गी लागणार 
  • तंत्रस्नेही शिक्षकांनी चांगले काम करत सरलची माहिती भरली आहे .
  •  मित्रांनो साहेबांनी दाखविलेल्या विश्वासाला सार्थ ठरवूया!! 

मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ 

जिल्ह्याचा पदभार घेतल्यावर शाळांना भेटी दिल्यावर जे निराशाजनक चित्र होते ते आता बदलेले आहे . 
खूपगाव शाळेतील तसेच इतर प्रगत शाळेतील विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या विध्यार्थ्यांना मागे टाकत आहेत 
 १०० टक्के प्रगत शाळा करणे हे आपले उद्दिष्ट असून ते आपल्याला पूर्ण करवयाचे आहे .
 वरखेड शाळेने लोकसहभागातून केलेले कार्य कौतुकास्पद असून शाळा हि ISO केल्याबद्दल शाळेचे अभिनंदन केले .
 शाळेचे विद्यार्थी नवोदय परीक्षा जाण्यासाठी प्रयत्न करणे ,
 शाळांचे वाचनालय मुलांसाठी मुक्त करावीत ,
उपलब्ध असलेली संगणक ,प्रोजेक्टर हि साधने वापरत आणून विद्यार्थ्यांना रोज हाताळण्यास द्यावीत विद्यार्थ्यांनी स्वच्छ हात कसे धुवावेत ,
 भविष्यात आपला विद्यार्थी MPSC ,UPSC परीक्षा देऊन उत्तीर्ण कसा होईल यासाठी आतापासूनच प्रयत्न करणे .
शाळेतील शिक्षकाकडून किमान अपेक्षा व्यक्त करत शाळेतील सर्व विद्यार्थी १०० टक्के प्रयत्न करवयाचे आहे . 
२२८ शाळा प्रगत करण्यासाठी आपण सर्वांनीप कामा केले असून टीम चे यश आहे . 

उपाध्यक्ष म. पांडुरंग खेडेकर 

आपल्याला कुमठे बीटच्या मी दिलेल्या प्रत्यक्ष भेटीत ज्ञानरचनावाद मला समजला असून शिक्षकांनी त्या दिशेने प्रयत्न करून माझ्या गावापासून सुरवात करत २२८ शाळा प्रगत केल्या याचा मला अभिमान आहे . 

कार्यक्रमातील पुस्तक प्रकाशने 
"यशोगाथा" - डाएट बुलडाणा प्रकाशन, "मूल समजून घेतांना" - कोगदे सर पुस्तक प्रकाशन, अपंग प्रेरणा साप्ताहिक विशेषांक"- कंकाळ सर या सर्वांचे मा शिक्षण आयुक्त भापकर साहेबांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

 शाळांना शुभेच्छा संदेशाचे मोठे प्रमाणपत्र प्रातिनिधिक स्वरूपात प्रदान, नंतर सर्व प्रगत 228 शाळांना मिळणार. 
उत्कृष्ठ कार्य व PSM चे 100% प्रगत शाळांचे प्रेसेंटशन करणाऱ्या सर्वांना, नवोपक्रम स्पर्धेत क्रमांक प्राप्त शिक्षकांना "सन्मान पत्राचे" वितरण आयुक्तसाहेबांच्या हस्ते करण्यात आले. 
जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख उपस्थित ,

संचालन अरविंद शिंगाडे , विजय मोंढे , काझी मलेका यांनी केले 
  शब्दांकन- रविंद्र नादरकर व संदीप राऊत

कार्यक्रम विशेष सर्वांनी वरीस लेकीच लोगो लावले

Post a Comment

0 Comments