Subscribe Us

उपस्थिती भत्ता योजनेचे पुनर्विलोकन करून एक सर्वसमावेशक आणि उपयुक्त अशी नवीन योजना आणणार

 


मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याकरिता आणि शाळेत विद्यार्थिनींची पटसंख्या वाढवण्यासाठी राज्य शासन कालबाह्य झालेली 'उपस्थिती भत्ता' योजनेचे पुनर्विलोकन करून एक सर्वसमावेशक आणि उपयुक्त अशी नवीन योजना शासन आणणार आहे असे आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सभागृहात मा शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी याबाबत आश्वस्त केले असून त्यांनी त्याच्या अधिकृत TWITTER वरून VIDEO द्वारे TWEET केले आहे .




उपस्थिती भत्ता  हि योजना सन १९९२ पासून सुरु असून ती आता कालबाह्य झाली आहे .  विद्यार्थिनी  जितके दिवस शाळेत हजर आहे  त्याचे १ रुपया रोज एका दिवसास एक रुपया याप्रमाणे विद्यार्थिनींना प्रोत्साहन म्हणून उपस्थिती भत्ता दिला जातो  सध्याची परिस्थिती लक्षात घेता मिळणारा उपस्थिती भत्ता हा खूप अल्प आहे  विद्यार्थिनीने  इतर ठिकाणी कामाला न जाता शाळेत आले पाहिजे असा यामागचा उद्देश आहे परंतु जर उपस्थिती भत्ता म्हणून एक रुपया मिळत असेल आणि इतर ठिकाणी  काम करायला गेले असता यापेक्षा जास्त रक्कम मिळत असेल तर विद्यार्थिनी शाळेत न येता कामाला  जातील आणि या योजनेचा मूळ उद्देश सफल होणार नाही असे  विधानपरिषदेत महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री  विधान क्ले असून या योजनेचे स्वरूप बदलणार आहे असे त्यांनी म्हटले आहे 

Post a Comment

0 Comments