मा. श्री सूरज मांढरे : राज्याचे नूतन शिक्षण आयुक्त.
राज्याचे नवे शिक्षण आयुक्त म्हणून पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील भूमिपुत्र व नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.एका प्राथमिक शिक्षकाच्या मुलाची राज्याच्या शिक्षण आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने एक रोमहर्षक वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना नियुक्तीनंतर सुरज मांढरे यांनी व्यक्त केली.पुढील आठवड्यात पुण्यात पदभार स्वीकारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची बदली लांबण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच मंत्रालयाने बुधवारी (दि. ९) मांढरे यांची पुणे येथील शिक्षण आयुक्तपदी नियुक्ती केली. पुणे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज पाहत असताना १२ मार्च २०१९ रोजी सूरज मांढरे यांची नाशिक जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली होती. जिल्ह्याची सूत्रे घेऊन त्यांना तीन वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांच्या बदलीची चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यांची6 बदली आणखी एक महिना लांबण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच बुधवारी त्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले.आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तीन वर्षे पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिल्याने मांढरे यांच्याही बदलीची चर्चा सुरू होती. अखेर बुधवारी राज्य शासनाने नऊ आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर केली.
सुरज मांढरे यांची कारकीर्द
- १२ मार्च २०१९ मध्ये नाशिक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती
- मालेगावमधील काेरोना नियंत्रणात आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका
- सेवा हमी कायद्यात १०१ सेवा देणारा राज्यातील पहिला जिल्हा
- कोरोनात अनाथ झालेल्या पालकांचे पालकत्व
- माझी वसुंधरा उपक्रमात राज्यात उल्लेखनीय कामगिरी
- लॉकडाऊन काळात व्हॉट्सॲपवर तक्रार निवारण
Suraj Mandhare
Collector Nashik.
Birth Date –21/05/1971
Education -B.Com (1991) (Pune University)
L.L.B. (1994) (Pune University)
Diploma in Information Technology (1991)
Occupation
– IAS Batch – 2010
Cadre Maharashtra
Current Posting – Collector, Nashik
Previous Postings
Probationer Dy. Collector, Amravati
Sub Divisional Officer, Dharni (Melghat),5 Amravati
Dy. Collector (EGS), Buldhana
Sub Divisional Officer, Akola
Sp. Land Acquisition Officer, Kolhapur6
Dist. Resettlement Officer, Pune
Sub Divisional Officer,Miraj
Dy. Commissioner, PMC, Pune
Jt. Director Maharashtra State Warehousing Corporation, Pune
Dy. Commissioner (Revenue) Marathwada Div, Aurangabad
O.S.D. ACS (Rev.) Mantralay, Mumbai
. Secretary Chief Secretary Office Mantralay, Mumbai
C.E.O Zilla Parishad,6 Pune
0 Comments