Subscribe Us

जिल्हा परिषदच्या शाळांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा करणार -मा ना वर्षाताई गायकवाड शिक्षण मंत्री

 

राज्यातील सर्व जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा करण्यासंदर्भात लवकरच नवीन धोरण शासन आणणार आहे .

आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सभागृहात मा शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी याबाबत आश्वस्त केले असून त्यांनी त्याच्या अधिकृत TWITTER वरून VIDEO द्वारे TWEET केले आहे .



 शाळांतील वीज पुरवठा संदर्भातील परिस्थिती ही अतिशय चिंताजनक  आहे शाळांना मिळणारे अनुदान हे अपुरे  असून वीज पुरवठ्यासाठी शाळेला असलेले मीटर हे व्यावसायिक  मीटर आहे. ज्याचे दर  खूप जास्त असल्याने  छोट्या शाळांनी व्यावसायिक मीटर ने येणारे वीज बिल हे   त्यांना प्राप्त निधी सर्व खर्च केला तरी देखील वीज बिल भरता येणार नाही अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री यांनी केलेली घोषणा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी दिलासादायक आहे  



Post a Comment

0 Comments