Subscribe Us

EPFO /GPF रकमेवर चालू आर्थिक वर्षासाठी व्याज दरात कपात .

 

EPFO /GPF रकमेवर चालू आर्थिक वर्षासाठी व्याज दरात कपात !

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी   'पीएफ'चा लाभ घेणाऱ्या सहा कोटी कर्मचारी प्रभावित होणार  

·  सन २०२१-२२  साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर ८.१ टक्के करण्यात आला

·        मागील चार दशकातील पीएफवरचा हा सर्वात कमी व्याजदर आहे

नवी दिल्ली : देशभरातील 'पीएफ'चा लाभ घेणाऱ्या सहा कोटी कर्मचाऱ्यांना आज जोरदार झटका लागला आहे. चालू आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर ८.१ टक्के करण्यात आला आहे. मागील चार दशकातील पीएफवरचा हा सर्वात कमी व्याजदर आहे. गेल्या वर्षी तो ८.५ टक्के इतका होता. केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या अखत्यारितील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने हा निर्णय घेतला असून तो अंतिम मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जाणार आहे  जर या निर्णयावर अर्थ खात्याने शिक्कामोर्तब केले तर देशभरातील जवळपास सहा कोटी कर्मचाऱ्यांच्या वार्षिक व्याजाचे उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे

केंद्रीय कामगार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील आणि नियोक्ता, तसेच कर्मचारी प्रतिनिधी असलेले विश्वस्त मंडळ व्याजदराची शिफारस करते. या शिफारशीला अर्थ मंत्रालयातर्फे मंजुरी देण्यात येते

गुवाहाटी येथे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या विश्वस्तांची (EPFO Central Board of Trustee Meeting) बैठक पार पडली. केंद्रीय श्रम मंत्री भुपेंदर यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत २०२१-२२ या वर्षाकरिता ८.१० टक्के .व्याजदराला मजुंरी देण्यात आली आहे. आता हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाच्या संमतीसाठी पाठवला जाणार आहे. त्यानंतर व्याजदर लागू होऊन त्याची रक्कम पीएफ खातेधारकांच्या खात्यात जमा केली जाते.

चार दशकातील सर्वात कमी व्याजदर

२०१९-२० साठी दिलेला पीएफ व्याज दर २०१२-१३ पासून सर्वात कमी म्हणजे ८.५ टक्के करण्यात आला होता. मात्र आजच्या दर कपातीनंतर पीएफवरील व्याजदर ८.१ टक्के इतका खाली आला आहे. मागील ४० वर्षांतील हा सर्वात कमी व्याजदर आहे. यापूर्वी १९७७-७८ या वर्षात पीएफ रकमेवर ८ टक्के व्याज देण्यात आले होते.

मागील पाच वर्षातील पीएफ व्याजदर

आर्थिक वर्ष

व्याजदर (टक्के)

२०१६-१७

८.६५

२०१७-१८

८.५५

२०१८-१९

८.६५

२०१९-२०

८.५

२०२०-२१

८.५

करोनाकाळात मात्र ८.५ टक्के व्याजदर

करोना विषाणू साथीमुळे बहुतेकांचे आर्थिक गणित बिघडले. त्यामुळे भविष्य निर्वाह निधीतून मोठ्या प्रमाणात पैसे काढले गेले.असे असतानाही भविष्य निर्वाह निधी संघटनेने २०१९-२० प्रमाणेच २०२०-२१ साठीही भविष्य निर्वाह निधीच्या ठेवींवर ८.५ टक्के व्याज दर दिला होता. करोना काळात भविष्य निर्वाह निधीतील योगदान कमी होते आणि पैसे काढण्याचे प्रमाण मोठे होते.

सौजन्य- PTI


Post a Comment

0 Comments