Subscribe Us

UGC च्या नवीन आराखडा नुसार पीएच.डी.साठी नेट’,‘जेआरएफ’ पात्रताधारकांसाठी ६० टक्के जागा राखीव असणार


UGC ’च्या  नवीन आराखडा नुसार पीएच.डी.साठी  नेट’,‘जेआरएफ’ पात्रताधारकांसाठी ६० टक्के जागा राखीव   असणार आहे यूजीसीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये  या सुधारणांबाबत चर्चा करण्यात आली.

पीएच.डी.च्या ६० टक्के जागा नेट परीक्षा पात्र साठी  राखीव असणार . 

नेट आणि जेआरएफ परीक्षा हि नॅशनल टेस्टिंग एजन्सी’च्या वतीने  घेतली जाते.  यात  उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना थेट पीएच.डी.ला प्रवेश दिला जातो. मात्र, अनेक विद्यापीठांमध्ये मार्गदर्शकांनी त्रुटींचे कारण दिल्यामुळे पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनाही पीएच.डी.ला प्रवेश मिळत नाही. आता नवीन सुधारणांनुसार नेट, जेआरएफ पात्र विद्यार्थ्यांसाठी पीएच.डी.च्या ६० टक्के जागा राखीव ठेवल्या जाणार आहेत. तर अन्य ४० टक्के जागा या प्रवेश परीक्षांमधून भरल्या जाणार आहेत.

नवीन पदवी अभ्यासक्रमाचे फायदे..

    पदवी अभ्यासक्रम हा तीन किंवा चार वर्षांचा असणार आहे. चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर  विद्यार्थी एक वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किंवा थेट पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र ठरेल. नवा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम तयार करताना विद्यार्थ्यांना प्रवेशाचे अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांला अभ्यासक्रम मधेच  सोडता येईल. जर  एखाद्या विद्यार्थ्यांने चार वर्षे अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि त्याने अभ्यासक्रम सोडला तर त्याला सोडलेल्या वर्षांपासून पुन्हा या अभ्यासक्रमात प्रवेश मिळू शकेल.

विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून  चार वर्षांचा नवीन पदवी अभ्यासक्रम सुरू करणार आहे  हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांस  थेट पीएच.डी.ला प्रवेश मिळेल . यानंतर  पीएच.डी.च्या ६० टक्के जागा या ‘नेट’ आणि ‘जेआरएफ’ पात्र उमेदवारांसाठी राखीव असतील  तर उर्वरित ४० टक्के जागा विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षांमधून भरल्या जातील.

नवीन सुधारणांबाबत  यूजीसीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली असून या नवीन सुधारणांच्या आराखडय़ाला बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे  तो जनतेच्या सूचनांसाठीही ठेवण्यात  येऊन त्यांच्या प्रतिक्रिया येणार असल्याचे कळते 


Post a Comment

0 Comments