Subscribe Us

उन्हाळी सुट्टी 2021 मधील MDM लाभार्थी ची रक्कम आता शाळेच्या खात्यात जमा होणार


 सन 2020-21सत्रातील  मे जून 2021 उन्हाळी सुट्टी तील मधील शालेय पोषण आहार DBT लाभार्थीची  रक्कम जिल्हास्तरावरून जमा होणार होती गेल्या वर्षभरून याबाबतीत शाळा स्तरावरून लाभार्थी याद्या देण्यात आलेल्या होत्या परंतु रक्कम DBT द्वारे ही रक्कम जमा करण्यास तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे  आता  ही रक्कम  विद्यार्थी ऐवजी  शाळेच्या खात्यात जमा होणार आहे 

यासाठी शाळांना आता सन 2020-2021 या वर्षांतील मे जून मधील पटावर  असलेल्या व स्वतः चे आधार कार्ड ,तसेच स्वतःचे बँक खाते किंवा पालकांचे खाते असलेले विद्यार्थी पात्र असणार आहे ही विद्यार्थ्यांची संख्यात्मक माहिती कार्यालयात सादर करावी लागणार आहे त्यानुसार रक्कम शाळा खात्यावरPFMS प्रणाली द्वारे जमा होणार आहे 

याबाबतीत बुलडाणा जिल्हा परिषद ने पत्र काढून  शाळांना  माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत 

दिनांक 15 एप्रिल 2022 चे पत्र 

Post a Comment

0 Comments