Subscribe Us

अखेर शासन निर्णय आला ! राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरात १ एप्रिल पासून वाढ

 


राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरात१ एप्रिल पासून  वाढ

राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरात 1 एप्रिलपासून सुधारणा करण्याचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे 

दिनांक २० एप्रिल २०२२ 


एस-20 आणि त्यावरील वेतन स्तरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी समुहात 5400 रुपये व इतर ठिकाणी 2700 रुपये, एस-7 ते एस-19 स्तरासाठी अनुक्रमे 2700 व 1350 रुपये, एस-1 ते एस-6 स्तरासाठी 1000 व 675 रुपये.

उपरोक्त एस-1 ते एस-6 या वेतन स्तरामधील 24 हजार 200 रुपये व त्यापेक्षा जास्त वेतन आहरित करणाऱ्या बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी मधील कार्यरत कर्मचाऱ्यांना 2700 रुपये व इतर ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना 1350 रुपये इतका वाहतूक भत्ता मिळेल तसेच अंध, अस्थिव्यंगाने अधु आणि कण्याच्या विकाराने पीडित असणाऱ्या तसेच मूकबधीर/ श्रवणशक्तीतला दोष असणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना पुढीलप्रमाणे वाहतूक भत्ता राहील. एस-20 व त्यावरील वेतन स्तरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी समूहात 10 हजार 800 रुपये व इतर ठिकाणी 5400 रुपये, एस-7 ते एस-19 स्तरासाठी अनुक्रमे 5400 व 2700 रुपये, एस-1 ते एस-6 स्तरासाठी 2250 व 2250 रुपये अशी सुधारणा असेल. एस-1 ते एस-6 या वेतन स्तरामधील 24 हजार 200 व त्यापेक्षा जास्त वेतन आहरित करणाऱ्या बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी मधील कार्यरत कर्मचाऱ्यांना 5400 रुपये व इतर ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना 2700 रुपये इतका वाहतूक भत्ता राहील. 

Post a Comment

0 Comments