Subscribe Us

पाचवी आठवी ची शिष्यवृत्ती SCHOLARSHIP EXAM 2022-23 प्रवेश अर्ज भरणे सुरु Application form start


पाचवी आठवी ची शिष्यवृत्ती परीक्षा   SCHOLARSHIP EXAM 2022-23  प्रवेश अर्ज  भरणे सुरु 

पाचवी आठवी ची शिष्यवृत्ती  परीक्षा  SCHOLARSHIP EXAM 2022-23 रविवार दिनांक 12 फेब्रुवारी 2023 

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी आयोजित करणेबाबतची अधिसूचना...

शासनमान्य शाळांमधून सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ठ होण्यासाठी तसेच इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ट होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या https://www.mscepune.in/   व https://2023.mscepuppss.in/startpage.aspx या संकेतस्थळावर दि. १६ / ११ / २०२२ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
उपरोक्त परीक्षा दि. १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये एकाच वेळी घेण्यात  येणार आहे

शिष्यवृत्ती परीक्षा - २०२३ बाबतच्या सूचना


परीक्षेची माहिती 

Post a Comment

0 Comments