महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ति MJPRF वर्ष २०२२-२३ साठी अर्ज सादर करण्याबाबत
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपुर मार्फत महाराष्ट्रातील नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील पीएचडी करता नोंदणी केलेल्या उमेदवारांना अधिकतम पाच वर्षाच्या कालावधीसाठी ममहात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ति MJPRF प्रदान करण्याकरता महाज्योतीच्या https://mahajyoti.org.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन स्वरूपात अर्ज मागविण्यात येत आहे
महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (महाज्योती) (Mahajyoti) पीएच.डी. (Ph.D.) करणाऱ्या विद्यार्थ्यांना (Students) १ जानेवारी २०२२ पासून ३१ हजार रुपये फेलोशिप (Fellowship) देण्याची घोषणा ‘महाज्योती’चे अध्यक्ष आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण व इतर मागासवर्गीय मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी बुधवारी केली. एकूण ७५३ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे
योजनेचा सविस्तर तपशील https://mahajyoti.org.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक ३१ मे २०२२ सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे
योजनेच्या अटी व शर्ती तसेच जाहिराती तपशीलात योग्य तो बदल करण्याचा व रद्द करण्याचा अधिकार महाज्योती संचालक मंडळ राखून ठेवलेला आहे
व्यवस्थापकीय
संचालक महाज्योती नागपुर
![]() |
0 Comments