Subscribe Us

शासनाचा 30 जून पर्यंत बदली स्थगिती आदेश प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होणार का?

 

शासनाचा 30 जून पर्यंत बदली स्थगिती आदेश प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होणार का?
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने सन 2022-23 या आर्थिक वर्षात दिनांक 30  जून  2022 पर्यंत कोणत्याही बदल्या करण्यात येऊ नये असा आदेश दिनांक 27 मे ला निर्गमित केला  आहे   सामान्य प्रशासन विभागाचा आदेश सर्वांसाठी असतो



या आदेशामुळे  शासकीय कर्मचारी यांच्या बदल्या रखडणार आहे 

बदलीचा अधिनियम 2005 नुसार प्रामुख्याने राज्यातील वर्ग 1 व 2 च्या अधिकारी यांच्या बदल्या केल्या जातात  

सामान्य प्रशासन विभागाने घेतलेला निर्णय सर्व विभागासाठी असतो 

त्यानुसार ते ते विभाग आदेश काढतात  राज्यातील मंत्रालयीन विभाग व इतर कार्यालयातील बदल्या साधारणपणे 30 मे पर्यंत केल्या जातात बहुतांश बदल्या झालेल्या आहेत परंतु आता  या आदेशामुळे राहिलेल्या बदल्या होणार नाहीत 

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ह्या  आदेशामुळे प्रभावित होणार का? याबाबतीत संभ्रम निर्माण झाला आहे  

वास्तविक प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसाठी स्वतंत्र शासन निर्णय काढण्यात आला असून त्यासाठी वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे ऑनलाईन बदल्या होणार आहेत यात मानवी हस्तक्षेप नाही  प्राथमीक शिक्षकांच्या बदलीच्या वेबपोर्टलचे उदघाटन मा ग्रामविकास मंत्री हे करणार आहेत 

सन 2005 चा कायदा प्राथमिक शिक्षकांना लागू नाही असे काही जाणकार    यांचे मत असले तरी प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसाठी ग्रामविकास विभागाला स्वतंत्र आदेश काढावा लागणार आहे 

 शिक्षकांच्या बदल्याबाबतीत ग्रामविकास विभाग काय निर्णय घेतो ते पुढील आठवड्यात समजेल

प्राथमिक शिक्षकांचे बदली पोर्टल सुरू झाल्यावर शिक्षकांच्या माहिती तपासणी प्रक्रिया जिल्हा परिषद स्तर वरील अवघड क्षेत्र, समाणिकरण, संचमान्यता  यासाठी जून चा तिसऱ्या आठवडा उजाडू शकतो 

वरील सर्व परिस्थितीत ग्राम विकास विभाग काय आदेश काढणार यावरच सर्व अवलंबून आहे

Post a Comment

0 Comments