Subscribe Us

केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी पदांचा अभ्यासक्रम व महत्वाची संदर्भ पुस्तके


शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदांचा अभ्यासक्रम व महत्वाची संदर्भ पुस्तके पुढीलप्रमाणे आहे.

शिक्षण विस्तार अधिकारी वर्ग 3 श्रेणी 2 पदाचा  जिल्हा परिषद भरती परीक्षा अभ्यासक्रम शैक्षणिक पात्रता   CLICK HERE
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिनांक 5 जून च्या विभागीय परीक्षासाठी पुढीलप्रमाणे अभ्यासक्रम निश्चित केला आहे 

जाहिरात वाचा CLICK HERE 


        केंद्र प्रमुख रिक्त पदे स्पर्धा परीक्षेने भरण्यासाठी अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय 9/9/2019 द्वारे सुधारित व अद्ययावत करण्यात आला असून तो केंद्र प्रमुख पदाच्या कामकाजाशी सुसंगत करण्यात आला आहे.

एकूण - 200 गुणांची परीक्षा असेल. 

पेपर 1 हा 100 गुण 100 प्रश्न

पेपर 2 हा 100 गुण 100 प्रश्न

▪️  पेपर - 1 -  बुद्धिमत्ता व अभियोग्यता

( 100 प्रश्न - 100 गुण ) 

• बुद्धिमत्ता [ आकलन , वर्गीकरण ,  सहसंबंध संख्या व अक्षरे , संख्या / अक्षर मालिका , लयबद्धता , तर्क व अनुमान भाषिक व अभाषिक , अनुमान , कुट प्रश्न , गणित कोडी , सांकेतांक भाषा , आकृती , भाषिक बुद्धिमत्ता , अभाषिक बुद्धिमत्ता इत्यादी ] 

•  अभियोग्यता  [ गणितीय चाचणी , तार्किक प्रश्न , भाषिक क्षमता मराठी , भाषिक क्षमता इंग्रजी , अवकाशिय संबोध , कल , आवड , व्यक्तीमत्व विकास , अचुकता , निर्णय क्षमता , व्यवहारीक गणित ,  इत्यादी ] 

▪️ पेपर - 2 शालेय शिक्षणातील नियम , अधिनियम , शैक्षणिक नव विचार प्रवाह 

• भारतीय राज्यघटना शिक्षण विषयक तरतुदी , कायदे , नियम इत्यादी 

( 10 गुण  ) 

•  शिक्षण क्षेत्रातील घडामोडी , शैक्षणिक संस्था , कार्य व माहिती इत्यादी 

( 10 गुण ) 

•  माहिती तंत्रज्ञान / संगणक वापर व शैक्षणिक सहसंबंध .

   ( 15 गुण )

• अभ्यासक्रम व मुल्यमापन , अध्ययन अध्यापन पद्धती , शैक्षणिक विचावंत व विचार इत्यादी 

   ( 15 गुण  )

•  माहितीचे विश्लेषण , मुल्यमापन , शैक्षणिक सहसंबंध इत्यादी 

   ( 20 गुण ) 

• वियषज्ञान , सामान्यज्ञान , इंग्रजी विषयज्ञान इत्यादी 

    ( 15 गुण ) 

• संप्रेशन कौशल्य  ( 15 गुण )

    .परीक्षा मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमातून होणार आहे.

केंद्र प्रमुख सविस्तर अभ्यासक्रमासाठी 9 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयाचे अवलोकन    DOWNLOAD

केंद्र प्रमुख पेपर एक-महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ

1. केंद्र प्रमुख परीक्षा बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक पेपर एक संपूर्ण मार्गदर्शक - डॉ शशिकांत अन्नदाते, के सागर पब्लिकेशन्स,पुणे

2. केंद्र प्रमुख परीक्षा बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक पेपर एक संपूर्ण तयारी - के सागर व डॉ.अनिरुद्ध

3.शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी - स्वाती शेटे (के'सागर पब्लिकेशन्स)- सदरचे पुस्तक शिक्षक अभियोग्यता घटकाच्या परिपूर्ण तयारीसाठी अतिशय उपयुक्त आहे.

   वरील पुस्तके केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासक्रमाची व्याप्ती, परीक्षेतील काठिण्य पातळीचा दर्जा समजून परिक्षाभिमुख तयारी  करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतील.

  तसेच पेपर एकमधील बुद्धिमत्ता चाचणी व गणितासाठी स्वतंत्रपणे के सागर,नितीन महाले,शांताराम अहिरे,सतीश वसे यांची पुस्तके अभ्यासता येतील.

मराठी भाषिक क्षमतेसाठी  के'सागर,बाळासाहेब शिंदे,डॉ.आशालता गुट्टे  यांची पुस्तके अभ्यासावीत.

 इंग्रजी भाषिक क्षमतेसाठी के सागर, बाळासाहेब शिंदे, सुदेश वेळापुरे यांची पुस्तके अभ्यासता येतील.

 यामधील शिक्षक अभियोग्यतेशी संबधित कल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व घटकांवर उपयोजनात्मक प्रश्न विचारले जातात.या घटकाच्या तयारीसाठी स्वाती शेटे मॅडम यांचे "शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी" हे के'सागर पब्लिकेशन्स कडून प्रकाशित पुस्तक अतिशय उपयुक्त ठरेल.

   पेपर क्रमांक दोन- शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह

       यामध्ये शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह यावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत.प्रस्तुत पेपर अभ्यासक्रम पूर्णतः नवीन व केंद्र प्रमुख कामकाजाशी निगडित आहे.

        केंद्र प्रमुख पेपर दोनच्या अभ्यासक्रमात भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी, शिक्षण विषयक सर्व कायदे व योजना,अद्ययावत शासन निर्णय, केंद्रीय व राज्य पातळीवरील शिक्षण विषयक संस्थांचे रचना व कार्य,माहिती तंत्रज्ञान वापर, अभ्यासक्रम, अध्ययन-अध्यापन पद्धती,माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन, शालेय विषयांचे आशयज्ञान व सामान्यज्ञान, संप्रेषण कौशल्य, चालू घडामोडी विशेषतः शैक्षणिक व क्रीडा विषयक इत्यादी बाबींचा समावेश आहे.प्रस्तुत केंद्र प्रमुख सविस्तर अभ्यासक्रमासाठी 9 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयाचे अवलोकन करावे.

 केंद्र प्रमुख पेपर दोन महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ 


१.केंद्रप्रमुख परीक्षा शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह-पेपर दोन संपूर्ण मार्गदर्शक- डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स, पुणे

         सदर पुस्तकातून पेपर दोन मध्ये समाविष्ट सर्व घटक, उपघटक व प्रमुख मुद्यांची परीक्षभिमुख तयारी करता येईल.तसेच केंद्र प्रमुख अभ्यासक्रमाची व्याप्ती व त्यावर घटकनिहाय विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची तयारी करता येईल.

       तसेच केंद्र प्रमुख परीक्षा तसेच शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षा  अभ्यासक्रमाची तयारी करण्यासाठी पुढील पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.

1.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था - डॉ.शशिकांत अन्नदाते(तिसरी आवृत्ती),के'सागर पब्लिकेशन्स

2.शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र- डॉ.ह.ना.जगताप,नित्यनूतन प्रकाशन (पाचवी आवृत्ती)

3.संपुर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र संपुर्ण विवेचन व वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते(सातवी आवृत्ती)


  


Post a Comment

0 Comments