Subscribe Us

Senior and selection grade training वरिष्ठश्रेणी निवडश्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण नवीन अपडेट

 

Senior and selection grade training वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणबाबत महत्त्वाच्या सूचना 

महत्त्वाची सूचना - 

ऑनलाईन वरिष्ठ वेतन श्रेणी व निवडश्रेणी शंका समाधान प्रशिक्षण महत्वाचे सूचना सत्र - 

पुढील लिंक वर CLICK करा . 

  



वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण दिनांक   १  जून २०२२  पासून सुरू होणार 

राज्यातील शिक्षक मुख्याध्यापक प्राचार्य यांच्यासाठी चे वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण दिनांक   १  जून २०२२  पासून सुरू होणार आहे सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाइन स्वरुपामध्ये असून नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थी यांना एकाच वेळी पूर्ण करता येणार आहे

 राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील नोंदणीकृत प्रशिक्षणार्थी सहभागी होऊन ऑनलाईन प्रशिक्षण च्या माध्यमातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांचे मार्फत विकसित प्रशिक्षण कोर्स पूर्ण करून त्यावरील स्वाध्याय चाचणी सोडवून  वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करू शकणार आहे 

Infosys Springboard हे  प्रशिक्षण अँप click here वर टच करून मोबाईलवर अँप डाउनलोड करा CLICK HERE

प्रशिक्षणाचे सविस्तर मार्गदर्शन पत्र  CLICK HERE

वरिष्ठ  व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण सुरूवात कशी करावीCLICK HERE

वरिष्ठ  व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण कसे पूर्ण करावे CLICK HERE

स्वाध्याय कसा सोडवावा CLICK HERE

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण - चाचणी कशी सोडवावी?CLICK HERE

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण - अभिप्राय कसा द्यावा?   CLICK HERE

दिनांक १ जून२०२२  रोजी सकाळी ११ .०० वाजता झालेल्या  उदबोधन सत्र YouTube live   कार्यक्रमाची लिंक CLICK HERE

मा.संचालक यांचे पत्रDOWNLOAD

 ऑनलाईन प्रशिक्षण एकूण 50 ते 60 तासाचे असणार असून सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी एकूण ३०  दिवसांचा कालावधी देण्यात येईल त्यामुळे प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षक आपले प्रशिक्षण ऑनलाइन स्वरूपामध्ये ३०  दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार पूर्ण करू शकणार आहे

 ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पात्र प्रशिक्षणार्थी त्याच ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे या प्रशिक्षणाची सर्व माहिती दिनांक१ जून२०२२  रोजी सकाळी११ .०० वाजता युट्युब लाईव्ह द्वारे  आहे   प्रशिक्षणार्थींनी  सत्रात उपस्थित राहावे 

प्रशिक्षण App Name Infosys Springboard 

प्रशिक्षण अँप click here वर टच करून मोबाईलवर अँप डाउनलोड करा CLICK HERE

दिनांक १ जून२०२२  रोजी सकाळी ११ .०० वाजता ची प्रशिक्षण लिंक


YOUTUBE LIVE  LINK  

 

तसेच पात्र प्रशिक्षणार्थींना  दिनांक १  जून २०२२ पासून  ३० जून २०२२ पर्यंत तांत्रिक अडचणी संदर्भात सुद्धा मार्गदर्शन सत्राचे आयोजन परिषदेमार्फत केले जाणार आहे या सर्वांची माहिती  १  जून २०२२ रोजी आयोजित युट्युब लाईव्ह द्वारे दिली जाणार आहे


१  अवैध E-mail यादी -            


 ईमेल चुकलेले आहेत ते दुरुस्त करावेत. (कृपया आपला ई मेल आय. डी तपासावा. आपला इमेल आय. डी योग्य असल्यास कोणतीही कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही. मात्र आपला ई मेल आय.डी चुकला असल्यास तो पोर्टल वरून तात्काळ बदलण्याची प्रक्रिया करून घ्यावी.

२  दुबार E-mail यादी -   

एकच ईमेल दोन व्यक्ती साठी वापरला आहे तो बदल करावा.(एकच ईमेल आय.डी एका पेक्षा जास्त वेळा वापरण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थी यांची यादी ( प्रत्येक प्रशिक्षणार्थी यास त्याचा ईमेल आय.डी हाच लॉगिन आय.डी म्हणून दिला जाणार असल्याने प्रशिक्षणार्थी यांनी केवळ स्वतःचाच ईमेल आय.डी नोंदविणे अत्यावश्यक आहे. अन्यथा अशा प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षणाचे पुढील तपशील प्राप्त होणार नाहीत.)


३ Email दुरुस्ती लिंक 

(वरील लिंक वरून आपला Email ID चुकीचा असल्यास दुरुस्त करावा) 


४ वरीष्ठ / निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी पहा

गोलामधील Click here वर टच करा  

जिल्हा निवडा

तालुका निवडा

आपल्या शाळेच्या नावा समोरील show teacher बटन दाबा

५ वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी   नोंदणी केलेल्या शिक्षकांना आपल्या माहिती मध्ये काही दुरुस्ती करावयाची असल्यास ती पुढील प्रमाणे करता येईल .

या प्रक्रियेतून...
बदल २. प्रशिक्षण गट बदल ३.दुबार  नोंदणी रद्द करता येईल

पुढील click here वर  टच करण्यापूर्वी  आपला नोदणी क्रमांक लिहून ठेवा तो  टाकल्यावर आपल्या मोबाईलवर OTP जाईल  OTP टाकल्यावर पडताळणी करावर click केल्यावर आपली माहिती दुरुस्त करता येईल

गोलामधील Click here  वर टच करा 


  


इतर महत्त्वाची माहिती आपल्याला वैयक्तिक ईमेल द्वारे व मोबाईल मेसेजद्वारे लवकरच कळविण्यात येईल.

प्रशिक्षणासाठी या अगोदर 2000 रुपये प्रशिक्षण शुल्क भरून नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थींची माहितीची पडताळणी सुरू आहे. लवकरच सर्व या प्रशिक्षणार्थींना लॉगिन आयडी व पासवर्ड मोबाईलवर पाठविण्यात येणार आहे

संपूर्ण महाराष्ट्रात (प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनासाठी ) राबविण्यात येणार्‍या प्रशिक्षणासाठी नोंदणी झालेल्या व या प्रशिक्षणासाठी पात्र असलेल्या शिक्षकांनाच प्रशिक्षण घेता येईल.

सर्व विषय समाविष्ट असलेल्या व प्रशिक्षणाला उपयुक्त असे प्रशिक्षण देण्यात येणार आहे व त्यासाठी हजारहुन  अधिक व्हिडिओ तयार करण्यात आलेले आहे

प्रशिक्षणासाठी SCERT महाराष्ट्र राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषद च्या वेबसाईटवर अधिक माहिती साठी click here वर टच करा

वरिष्ठ /निवड श्रेणी प्रशिक्षण याविषयी माहिती

शासन निर्णय दिनांक : २० जुलै, २०२१      DOWNLOAD


वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण हे प्रशिक्षण १२ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी  व निवड श्रेणी प्रशिक्षण २४ वर्ष एकाच वेतनश्रेणीत सेवा  पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी आहे

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे, महाराष्ट्र वरिष्ठ /निवड श्रेणी प्रशिक्षण याविषयी महाराष्ट्र शासनाने वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपवली आहे. सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाइन नोंदणी करिता हे पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय अध्यापकाचार्य या चार गटातील शिक्षकांनी नोंदणी करावयाची आहे.

वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण

हे प्रशिक्षण १२ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी आहे

प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये

  1. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बाबत जाणीव जागृती करणे.
  2. जागतिकीकरण, आधुनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात करावयाचे बदल व त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम.
  3. शिक्षक शिक्षण प्रक्रियेमध्ये सुधार करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, वृत्ती बदल आत्मसात होण्यासाठी सक्षम करणे.
  4. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून स्व विकास, छात्राध्यापक विकास, संस्था विकास होण्यासाठी त्याचा उपयोग करण्यास आत्मनिर्भर करणे.
  5. एकविसाव्या शतकातील कौशल्य छात्राध्यापक/ विद्यार्थी यांमध्ये रुजविण्यासाठी सक्षम करणे.
  6. शारीरिक व मानसिक स्वास्थ संवर्धनाचे मार्ग समजून घेऊन त्यानुसार कृती करण्यास सक्षम करणे.
  7. मानवी हक्क सजगता, बहुसांस्कृतिकत्व व घटनात्मक मूल्यांची बांधिलकी जपण्यासाठी सबळ करणे.

पात्रता निकष

  1. उमेदवाराला खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
  2. १२ वर्षाची अर्हताकारी सेवा
  3. या कामासाठी नियुक्त केलेल्या समितीला उमेदवारांचे कामकाज समाधानकारक वाटणे.
  4. अ) त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान तीन आठवड्याचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी ५० तासांचे ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
  5. ब) शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने/तिने पूर्ण केले असले पाहिजे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.


निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण

हे प्रशिक्षण २४ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी आहे

प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये

  1. बदलत्या शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवविचार प्रवाहाच्या अंमल बजावणीसाठी सक्षम करणे.
  2. मूल्यमापन पध्दती आणि साधन तंत्रे यांच्या प्रभावी अंमल बजावणीसाठी शिक्षकांना सक्षम करणे.
  3. शिक्षकांमध्ये प्रभावी शालेय व्यवस्थापन संघटन आणि प्रशासकीय कौशल्यासाठी आवश्यक शैक्षणिक कार्य संस्कृती विकसित करणे.
  4. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शालेय अभ्यासक्रम व शिक्षक शिक्षण अभ्यासक्रमात होत असलेल्या बदलांना सामोरे जाण्यासाठी सक्षम करणे.
  5. मानवी हक्क सजगता, बहुसांस्कृतिकत्व व घटनात्मक मूल्यांची बांधिलकी जपण्यासाठी सबळ करणे.
  6. शिक्षक शिक्षण प्रक्रियेमध्ये सुधार करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, वृत्ती बदल आत्मसात होण्यासाठी सक्षम करणे.
  7. जागतिकीकरण, आधुनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात करावयाचे बदल व त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम

पात्रता निकष

उमेदवाराला खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

  1. २४ वर्षाची अर्हताकारी सेवा
  2. अ) त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान तीन आठवड्याचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी ५० तासांचे ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
  3. ब) शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने/तिने पूर्ण केले असले पाहजे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
  4. क)प्राथमिक शिक्षकांसाठी प्रशिक्षित पदवीधराची अर्हता मिळविली असली पाहिजे.
  5. प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांसाठी पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त केली असली पाहिजे.
  6. माध्यमिक शाळेतील प्रशिक्षित अपदवीधर शिक्षकांसाठी पदवी व पदवीधर शिक्षकांसाठी पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त केलेली असली पाहिजे.

Post a Comment

0 Comments