Subscribe Us

Senior and selection grade training start वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण नवीन सूचना


वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण 

महत्त्वाची सूचना -

ऑनलाईन वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दुरुस्ती प्रक्रीयेबाबत...

          सद्यस्थितीमध्ये काही प्रशिक्षणार्थी यांना काही तांत्रिक अडचणीमुळे प्रशिक्षण सुरु करण्यात / पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांचे प्रशिक्षण प्रलंबित असल्याने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत  http://training.scertmaha.ac.in/  या संकेतस्थळावर दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 

   सदरच्या दुरुस्तीच्या सुविधेमार्फत खालील दुरुस्ती प्रशिक्षणार्थी करू शकणार आहेत,

  • प्रशिक्षणाचे लॉगीन उपलब्ध झालेले नसणे.
  • प्रशिक्षण गट तसेच प्रशिक्षण प्रकार यामध्ये बदल करावयाचा असणे
  • ई-मेल आय. डी. दुरुस्ती करणे
  • प्रशिक्षण प्रमाणपत्र दुरुस्ती करणे.

सदरची दुरुस्ती प्रक्रिया ही केवळ ज्या प्रशिक्षणार्थी यांचे प्रशिक्षण अद्यापही सुरु नाही अशाच प्रशिक्षणार्थी यांचेसाठी आहे याची नोंद घ्यावी.

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण   दुरुस्ती प्रक्रिया  LINK  CLICK HERE 

मा संचालक ऑनलाईन वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दुरुस्ती प्रक्रीयेबाबत परिपत्रक यांचे   CLICK HERE

दुरुस्ती वेळापत्रक  पहा 


आवश्यक दुरुस्ती केल्यानंतरच्या कार्यवाहीबाबत देखील http://training.scertmaha.ac.in/ या संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक देण्यात आलेले आहे.  

              उक्त नमूद दुरुस्ती सुविधा सर्व उर्वरित प्रशिक्षणार्थी यांना दिनांक २१.१०.२०२२ ते ३१.१०.२०२२ या कालावधीसाठी  उपलब्ध करून देण्यात येत असून यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही.


ऑनलाइन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी खालील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करा.

प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपले प्रशिक्षण व्यवस्थित पूर्ण झाले असणे आवश्यक आहे.

इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाची चाचणी सोडवून आपण उत्तीर्ण झाले असणे आवश्यक आहे.

इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाचे स्वाध्यायच्या फोल्डरची लिंक अपलोड करणे आवश्यक आहे.

उपरोक्त मुद्दे एक ते तीन वाचले असून मी प्रमाणित करतो की उपरोक्त तिन्ही मुद्द्यांची पूर्तता मी केली आहे.

प्रमाणपत्र लिंक (वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी यांच्या प्रमाणपत्रासाठी सदर लिंक आहे) CLICK HERE

प्रमाणपत्र वितरण  सूचना 

आपला प्रशिक्षणाचा नोंदणी क्रमांक नोंदविल्यानंतर आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल.

आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी आपण प्रविष्ट केल्यानंतर आपणास

नोंदणी क्रमांक

इंग्रजी मधील आपले नाव

मोबाईल क्रमांक

ईमेल

प्रशिक्षण गट

आपले मराठीतील नाव

शाळेचे नाव

जिल्हा

तालुका

यातील आपले मराठीतील नाव, शाळेचे मराठीमधील नाव, आपला जिल्हा व तालुका यामध्ये आपली स्वतःची व्यवस्थित माहिती भरावी/ चूक असल्यास आवश्यक बदल करावेत.

उपरोक्त मुद्दा क्रमांक तीन मध्ये नमूद केलेले सर्व तपशील व नमूद माहिती १००% अचूक व खरी असून यामध्ये कोणतीही चूक आढळल्यास व चुकीच्या नावाचे, गटाचे प्रमाणपत्र डाऊनलोड झाल्यास संबंधित प्रशिक्षणार्थी स्वतः जबाबदार असतील.

ज्या प्रशिक्षणार्थीनी वरिष्ठ वेतन श्रेणी/ निवड श्रेणी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे, असे प्रशिक्षणार्थी आपले प्रमाणपत्र येथून डाऊनलोड करून घेऊ शकतात.

 दिनांक १५ जुलै २०२२ 

  • राज्यात एकूण ९४,५४१ यापैकी दिनांक १४.०७.२०२२ रोजी पर्यंत ५२,५५१ प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे  
  •  उर्वरित प्रशिक्षणार्थ्यांनी आपले प्रशिक्षण दि. ३१ जुलै, २०२२ पूर्वी पूर्ण करणे आवश्यक .
  •  प्रशिक्षण उशिरा सुरु झाले आहे, अशा प्रशिक्षणार्थ्याना प्रशिक्षण सुरु झालेल्या दिनांकापासून पुढील ४५ दिवसात आपले प्रशिक्षण पूर्ण करावे.
  • दि. २३ व २४ जुलै, २०२२ रोजी प्रशिक्षण प्रणाली बंद राहणार 

दिनांक १५ जुलै २०२२चे प्रशिक्षण कालावधी बाबतचे पत्र पहा -  CLICK HERE


युजर आय. डी व पासवर्ड प्राप्त असणारे मात्र इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड प्रणालीवर अद्याप लॉगिन न झालेल्या प्रशिक्षणार्थी यांची जिल्हानिहाय यादी

महत्त्वाच्या मार्गदर्शक YoutubeVideo ची लिंक 

वरिष्ठ  व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण सुरूवात कशी करावीCLICK HERE

वरिष्ठ  व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण कसे पूर्ण करावे CLICK HERE

स्वाध्याय कसा सोडवावा CLICK HERE

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण - चाचणी कशी सोडवावी?CLICK HERE

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण - अभिप्राय कसा द्यावा?   CLICK HERE

दिनांक १ जून२०२२  रोजी सकाळी ११ .०० वाजता झालेल्या  उदबोधन सत्र YouTube live   कार्यक्रमाची लिंक CLICK HERE


वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण अधिकृत टेलिग्राम चॅनल


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या तर्फे राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, अध्यापक विद्यालयातील अध्यापक, प्राचार्य यांच्या साठी वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड या प्रणालीवर सुरू करण्यात आले आहे.याबाबतच्या सूचना वेळोवळी ईमेल, पत्र व https://training.scertmaha.ac.in/ या वेबसाईटद्वारे  दिल्या जातात.

  सर्व प्रशिक्षणार्थी यांच्यापर्यंत तात्काळ पोहोचता यावे, सूचना जाव्यात यासाठी सदर प्रशिक्षणाचे अधिकृत टेलिग्राम चॅनल तयार करण्यातआले आहे 

 प्रशिक्षणार्थी आपल्या सोयीसाठी खालील टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकतात.

टेलिग्राम चॅनल JOIN होण्यासाठी खालील  टेलिग्रामच्या चिन्हाला टच करा .  https://t.me/scertmaha  ( टेलिग्राम APP आपल्या मोबाईल मध्ये नसल्यास  PLAYSTORE मधून डाऊनलोड  करा )








ऑनलाईन वरिष्ठ वेतन श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण महत्वाचे सूचना सत्र - दिनांक ८ जून सकाळी ९.३० वाजता 

पुढील लिंक वर CLICK करा . 

  


अवैध ईमेल मूळे इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर नोंदणी न झालेल्यांची यादी  

इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर नोंदणी झालेले व नोंदणी न झालेल्या प्रशिक्षणार्थी यांची कारणासह जिल्हानिहाय आकडेवारी

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण

तक्रार निवारण TAB सुरु झाली असून आपल्याला प्रशिक्षणात काही अडचणी येत असल्यास त्या नोंदवण्याची सुविधा देण्यात आली आहे . 

आपली समस्या ,तक्रार नोंदवण्यासाठी पुढील  CLICK HERE ला टच करा .

 ३ जून चे SCERT चे ऑनलाईन वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी उदबोधन सत्र लिंक   

उदबोधन सत्राला  पाहण्यासाठी होण्यासाठी  CLICK HERE ला टच करा 







दैनिक  शंका समाधान सत्र ZOOM मीटिंगमध्ये लिंक  

राज्यातील शिक्षक/मुख्याध्यापक/अध्यापकाचार्य/प्राचार्य यांच्यासाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये दिनांक १ जून २०२२ पासून सुरू झाले आहे.

वरिष्ठ वेतन श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण २०२१-२०२२ हे infosys springboard या app वर होणार.

Infosys Springboard हे  प्रशिक्षण अँप click here वर टच करून मोबाईलवर अँप डाउनलोड करा CLICK HERE

प्रशिक्षणाचे सविस्तर मार्गदर्शन पत्र  CLICK HERE


नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यास सदरचे ऑनलाइन प्रशिक्षण हे  https://infyspringboard.onwingspan.com/web/en/login  

या लिंकवर क्लिक करून सुरु करता येईल.  

या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थ्यास आवश्यक युजर आय.डी व  पासवर्ड प्रशिक्षनार्थ्यानी नोंदणी करताना पुरविलेल्या ई- मेलवर प्राप्त होईल. ज्या प्रशिक्षणार्थ्याना पुरविलेल्या ई मेल आय डीवर मेल प्राप्त होणार नाही त्यांनी  https://training.scertmaha.ac.in/   या वेबसाईटवर तक्रार करण्याची सुर्विधा दि. ०३ जुन २०२२पासून सुरु होईल अशा प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी वेळ वाढवून मिळेल. .     

सदरचे प्रशिक्षण हे प्रशिक्षणार्थ्यास  दिनांक ०१ जून २०२२ ते ०१ जुलै २०२२ या कालावधीत पूर्ण करावयाचे आहे. 

निवडश्रेणी प्रशिक्षण संबंधाने जे youtube सत्र पार पडले त्यात , निवडश्रेणी प्रशिक्षण कसे दिले जाईल याची माहिती देण्यात आली

  •  11 वाजता जॉइण्ड होऊ शकले नाही त्यांचे करिता थोडक्यात या प्रमाणे 
  •  प्रशिक्षण नोंदणी चे वेळेस दिलेल्या EMail वर व मोबाईल नंबर वर आपल्याला एक लॉगिन ID व पासवर्ड येईल.
  • सर्वप्रथम *प्रशिक्षण ची अँप* डाउनलोड करायची आहे.
  • त्यानंतर लॉगिन ID व पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे. लॉगिन ID व पासवर्ड आल्याशिवाय चुकूनही लॉगिन करायचे नाही.
  • लॉगिन झाल्यानंतर temaprary पासवर्ड बदलवून स्वतःचा पासवर्ड तयार करावा.
  • पासवर्ड बद्दलविल्यानंतर आपली प्रोफाइल update करायची आहे.
  • प्रोफाइल update झाल्यानंतर search ऑपशन मध्ये जाऊन प्रशिक्षण कोर्स सीलेक्ट करायचा आहे.
  • प्रशिक्षण कोर्स घेतल्यानंतर त्यातील एक एक module आपल्याला पूर्ण करायचे आहे.
  •  प्रत्येक module मध्ये तीन कन्टेन्ट असेल 1) PDF 2) विडिओ 3) स्वाध्याय 
  • दिलेल्या वेळेपेक्षा ज्यास्त वेळ घेऊन प्रत्येक module पूर्ण करायचे आहे. प्रत्येक घटकातील PDF वाचायची, video पहायचे व स्वाध्याय सोडवायचा. स्वाध्याय ऑनलाइन type करता येईल किंवा कागदावर लिहून PDF तयार करून अपलोड करता येईल.
  •  सर्व module (घटक)पूर्ण केल्यानंतर मूल्यमापन वर जायचे आहे.
  • मूल्यमापन मध्ये कमीतकमी 40% गुण घेणे गरजेचे आहे.
  • एकदा मूल्यमापन सुरू केले की ते मध्येच बंद करता येणार नाही. याची नोंद घ्यावी.
  • मूल्यमापन ची प्रक्रिया सर्व attempt session पूर्ण केल्यानंतर *finish test* वर क्लीक करावे.
  • मूल्यमापन झाल्यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे feedback,
  • feedback मध्ये आपलं अभिप्राय नोंदवावा.
  • या प्रकारे आपल्याला प्रशिक्षण पूर्ण करायचे आहे.
  • या बाबत आणखी माहिती पत्रक निघणार आहे. घाई करू नये. लॉगिन ID,  पासवर्ड येऊ द्यावे.

राज्यातील शिक्षक मुख्याध्यापक प्राचार्य यांच्यासाठी चे वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण दिनांक   १  जून २०२२  पासून सुरू होणार आहे सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाइन स्वरुपामध्ये असून नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थी यांना एकाच वेळी पूर्ण करता येणार आहे

 राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील नोंदणीकृत प्रशिक्षणार्थी सहभागी होऊन ऑनलाईन प्रशिक्षण च्या माध्यमातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांचे मार्फत विकसित प्रशिक्षण कोर्स पूर्ण करून त्यावरील स्वाध्याय चाचणी सोडवून  वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करू शकणार आहे 

मा.संचालक यांची प्रेस नोट पत्र - DOWNLOAD

 ऑनलाईन प्रशिक्षण एकूण 50 ते 60 तासाचे असणार असून सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी एकूण ३०  दिवसांचा कालावधी देण्यात येईल त्यामुळे प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षक आपले प्रशिक्षण ऑनलाइन स्वरूपामध्ये ३०  दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार पूर्ण करू शकणार आहे

तसेच पात्र प्रशिक्षणार्थींना  दिनांक १  जून २०२२ पासून  ३० जून २०२२ पर्यंत तांत्रिक अडचणी संदर्भात सुद्धा मार्गदर्शन सत्राचे आयोजन परिषदेमार्फत केले जाणार आहे या सर्वांची माहिती  १  जून २०२२ रोजी आयोजित युट्युब लाईव्ह द्वारे दिली जाणार आहे



Post a Comment

2 Comments

Unknown said…
App hi download Jale ॲप फ्री डाउनलोड झालेले आहे परंतु दुसरेच काही संदर्भ येत असल्यामुळे वरिष्ठ निवड श्रेणी किंवा यांचे कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण घेता आले नाही कृपया मार्गदर्शन करावे.
eZPschool.com said…
App download झाल्यावर आपल्याला ई-मेल वर प्राप्त user id व पासवर्ड ने login करावे व scert ने youtube वर दिलेल्या सूचनेनुसार कार्यवाही करावी