Subscribe Us

ZPFMS प्रणालीने जिल्हा स्तरावरून मासिक वेतन थेट शिक्षकांच्या खात्यात जमा होणार


मा.  सुरज मांढरे  शिक्षण आयुक्त पुणे यांनी दिनांक ०५ मे २०२२ रोजी  ZPFMS  प्रणालीने जिल्हा स्तरावरून थेट शिक्षकांच्या खात्यात  मासिक वेतन जमा करण्यात यावे असे आदेश परिपत्रकाद्वारे  दिले आहे  

आता राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे शालार्थ  प्रणालीतून वेतन देयक सादर करण्याबाबतचे वेळापत्रक देण्यात आलेले असून त्यानुसार ऑनलाइन देयके विहित मुदतीत सादर करावी लागणार आहेत 

वेतन देयक सादर करण्याचे वेळापत्रक 







सध्या जिल्हा परिषदेच्या अधिनस्त शिक्षकांचे वेतन देयक कोषागार कार्यालयातून पारित झाल्यावर  मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या खात्यावर वेतनाची रक्कम जमा होते त्यानंतर सदर रक्कम गट विकास अधिकारी यांच्यामार्फत गट शिक्षणाधिकारी / मुख्याध्यापक यांच्या खात्यावर जमा केली जाते  त्यानंतर  शिक्षकाच्या खात्यात वेतन  जमा  करण्यास विलंब होतो  या प्रक्रियेस लागणारा कालावधी जास्त असल्यामुळे शिक्षकांच्या खात्यात वेतन जमा होण्यास विलंब होत आहे

कशी असणार कार्य पद्धती 

आता  जालना जिल्हा परिषदेच्या धरतीवर मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडून ZPFMS प्रणालीद्वारे शिक्षकांचे खात्यावर थेट वेतनाची रक्कम जिल्हास्तरावरून जमा करण्याची कार्यवाही  करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश माननीय शिक्षण आयुक्त पुणे यांनी सर्व जिल्हा परिषदांना दिले आहेत 

यामुळे आता जिल्हा परिषद स्तरावरून  ONLINE पद्धतीने थेट  शिक्षकांच्या खात्यात त्यांचे वेतन विहित कालावधीत जमा करण्यात येणार आहेत .

 निव्वळ वेतन शिक्षकाच्या खात्यावर जमा केल्यावर उर्वरित कपातीची रक्कम गट विकास अधिकारी /गट शिक्षणाधिकारी / मुख्याध्यापक यांच्या खात्यावर जमा करून संबधितांच्या खात्यावर वर्ग केल्या जाणार आहे 


मा शिक्षण आयुक्त यांचे परिपत्रक दिनांक ०५मे २०२२   DOWNLOAD


Post a Comment

0 Comments