Subscribe Us

YCMOU नाशिक विद्यापीठाच्या सेवांतर्गत बी.एड शिक्षणक्रम प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

 

YCMOU विद्यापीठाच्या सेवांतर्गत बी.एड शिक्षणक्रम २०२३-२५ च्या  प्रवेश प्रक्रियेस सुरुवात  झाली असून त्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे 

प्रवेश सूचना : शैक्षणिक वर्ष २०२३-२५ 

ONLINE प्रवेश अर्ज भरणे सुरुवात  -  

अर्ज भरण्याची अंतिम दिनांक - १२ सप्टेंबर २०२३ (रात्री ११.५९ मि.)

प्रवेश अर्ज भरण्यसाठी website -http://ycmoubed.digitaluniversity.ac/StaticPages/HomePage.aspx

संपूर्ण माहितीपत्रक --   CLICK HERE


बी बी.एड. प्रवेशअर्ज शुल्क :

खुल्या प्रवर्गासाठी रु.८००/- आणि राखीव प्रवर्गासाठी रु.४००/- आहे. प्रवेश अर्ज भरतेवेळी सदर शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे.

·        जिल्हानिहाय जागा :

एन.सी.टी.ई. ने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील बी.एड. शिक्षणक्रमाला एकूण १५०० जागांना मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला ४२/४३ जागा भरण्यात येतात. उर्वरित ३० जागा प्रत्येक जिल्ह्याला एक याप्रमाणे सैन्यदलातील सेवेत असलेले आजी व माजी कर्मचारी यांच्यासंदर्भात असलेल्या परिपत्रकानुसार भरण्यात येतीत.

·        ऑनलाईन प्रवेश अर्जात भरलेल्या माहितीच्या आधारे गुणवत्तेनुसार खुला व सामाजिक आरक्षणनिहाय त्या त्या जिल्ह्याची कागदपत्र पडताळणी यादी व कागदपत्र पडताळणी वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर विद्यापीठाने दिलेल्या सूचनांनुसार जिल्हानिहाय कागदपत्र पडताळणी यादीतील संबंधित उमेदवारांनी त्या जिल्ह्याशी संबंधित विभागीय केंद्रावर वेळापत्रकाप्रमाणे आपल्या प्रवेशअर्जाची पडताळणी करून घ्यावी. विभागीय केंद्राने आपल्या प्रवेश अर्जातील भरलेल्या माहितीची पडताळणी केल्यानंतर जिल्हानिहाय प्रथम फेरीतील प्रवेशासाठी निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईलनिवड यादीतील उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या शिक्षणक्रमाचे प्रथम वर्ष विद्यापीठ शुल्क भरावयाचे आहे. त्यानंतर त्या जिल्ह्यातील अभ्यासकेंद्रावर प्रत्यक्ष भेट देवून अभ्यासकेंद्र शुल्क भरून उमेदवाराने आपला प्रवेश नियोजित कालावधीत निश्चित करावयाचा आहे.

शिक्षणक्रम प्रवेश पात्रता :

(१) यू.जी.सी. मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी/पदव्युत्तर पदवी.

(२) पदवी / पदव्युत्तर पदवी परीक्षेत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान ५०% (४९.५ ते ५० टक्क्यांपर्यंतचे गुण) व मागासवर्गीय उमेदवारांना किमान ४५% (४४.५ ते ४५ टक्क्यांपर्यंतचे गुण) गुण असणे अनिवार्य आहे. (महाराष्ट्र शासनाने ज्या प्राथमिक शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी (स्केल) लागू केली आहे अशा उमेदवारांना पदवी / पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्णतेच्या गुणांची अट नाहीमात्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.)

(३) डी.एड./ डी.टी.एड. क्राफ्ट टीचर डिप्लोमा हे शिक्षणक्रम पूर्ण केलेले आणि मान्यताप्राप्त प्राथमिक स्तरावर शासनाने मंजूर केलेल्या पदावर पूर्णवेळ / अर्धवेळ काम करणाऱ्या व किमान दोन वर्षांचा (अर्धवेळ असल्यास ४ वर्ष) अनुभव असलेल्या अध्यापकांना सेवाज्येष्ठतेनुसार प्रवेश मिळेल.

(४) प्रवेशासाठी किमान दोन वर्षांचा अनुभव अनिवार्य असेल. पूर्णवेळ / अर्धवेळ सेवेत असल्याचे व शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम पूर्ण होईपर्यंत सेवेत ठेवले जाईलअसे शाळाप्रमुखांचे प्रमाणपत्र देऊ शकणाऱ्या पदवीधर शिक्षकांना या शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल.

प्रवेश अपात्रता :

पुढील प्रकारच्या अर्जाचा प्रवेशासाठी विचार केला जात नाही आणि अशी आवेदनपत्रे प्राप्त झाल्यास ती रद्द करण्यात येतील व उमेद्वारास याबाबत कळविले जाणार नाही.

(१) ज्यांच्या सेवा आदेशात शिक्षक नियुक्ती असा उल्लेख नाही.

(२) सध्या सेवेत असलेल्या शाळेच्या जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यातून प्रवेश अर्ज भरणारे

(३) अपूर्ण आणि खोट्या माहितीचे प्रवेश अर्ज

(४) सध्या सेवेत नसलेले अध्यापक.

(५) तासिका वेतनावर कार्यरत शिक्षक.

(६) यू.जी.सी. मान्यता नसलेल्या विद्यापीठाचे पदवीधारक.

(७) माध्यमिक/उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक/प्रयोगशाळा सहायक/कनिष्ठ सहायक /लिपिकग्रंथपालइत्यादी.

(८) पदवी वर्षाच्या अंतिम परीक्षेस बसलेलेपरंतु निकाल न लागल्यामुळे पदवी परीक्षेचे पदवी प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिकेची सत्यप्रत न जोडणारे शिक्षक.

(९) बालवाडीत शिकविणारे अध्यापक.

(१०) तांत्रिक विद्यालयेकृषी विद्यालये तत्सम अन्य विद्यालयेएम.सी.व्ही.सी. निदेशक (Instructor) हे प्रवेशासाठी पात्र नाहीत.

(११) प्रवेश अर्जावर मुख्याध्यापकाची सही नसणारे तसेच सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र न जोडणारे शिक्षक प्रवेशास अपात्र ठरतील. मात्र मुख्याध्यापकच स्वतः उमेदवार असेलतर संस्थेचे सचिव वा शिक्षणाधिकारी यांची सही व शिक्का असणे आवश्यक आहे.

(१२) मराठीचे पुरेसे ज्ञान नसलेले विद्यार्थी अपात्र ठरतील.

(१३) राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र / जात पडताळणी प्रमाणपत्र / ना सायस्तर नसल्याचे प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी मुदतीत सादर करू न शकणारे उमेदवार राखीव प्रवर्गातून प्रवेशास अपात्र ठरतील.



प्रवेश पात्रतेच्या अटी 

(१) महाराष्ट्रातील सरकारमान्य प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून किमान दोन वर्षांचा अनुभव आणि सध्या सेवेत असणे आवश्यक.

(२) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी खुल्या प्रवर्गासाठी किमान ५०% गुण व राखीव प्रवर्गासाठी ४५% गुण पदव्युत्तर पदवी. (३) डी.एड. / डी.टी.एड./ क्राफ्ट टिचर डिप्लोमा पूर्ण केलेले.


Post a Comment

1 Comments