Subscribe Us

15 ऑगस्ट 2022 पासून शिक्षण गाथा या त्रेमासिकाचा शुभारंभ शिक्षकांना लेख पाठवण्याचे आवाहन -

15 ऑगस्ट 2022 पासून शिक्षण गाथा या त्रेमासिकाचा शुभारंभ शिक्षकांना लेख पाठवण्याचे आवाहन 

 महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे देशातील एक अग्रणी राज्य म्हणून ओळखले जाते राज्यात एक लाख दहा हजार पेक्षा अधिक शाळांमधील ७.५ लाख  शिक्षक २.२५ कोटी विद्यार्थी आणि जवळपास ४.५ पालक यांच्याशी आपुलकीच्या आपुलकीच्या अतूट धाग्यांनी हा विभाग जोडला गेला आहे नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करत असताना राज्याच्या शिक्षण विभागातील नवीन नवीन शैक्षणिक प्रयोगांचा वेध घेणारी बदलत्या काळातील शैक्षणिक विचारांचा प्रसार करणारे कर्तुत्ववान अधिकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर शिक्षकेतर वृंद कार्य करत आहेत 

 सर्वांच्या विविध सर्जनशील विचार कृतीची देवाणघेवाण एकमेकांशी प्रभावीपणे पोहोचविणे आपल्या कार्यक्षेत्रातील उत्तम कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर वृंद यांच्या कार्याचा लेखाजोखा मासिकाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा दृष्टीने माहिती 15 ऑगस्ट 2022 पासून शिक्षण गाथा या त्रेमासिकाचा शुभारंभ  करीत आहोत 

या निमित्ताने शिक्षण विभागातील प्रगतिशील घडामोडीची माहिती वाचकांना होणार आहे त्यांनी सदरची बाब आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व अधिकारी शिक्षक शिक्षकेतर वृंद यांना अवगत करून द्यावी दरमहा आपल्याकडे क्षेत्रामधून जास्तीत जास्त सृजनशील प्रयोगशील व कृती पर यशस्वी कार्याचे लेख तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा लेखाजोखा यशस्वी प्रयोग कृती चे लेख चित्रफिती ध्वनीफिती कलात्मक चित्रे छायाचित्रे आकृतीसह educomshikhangatha@gmail.com या ईमेलवर पाठवावेत  त्याचप्रमाणे शिक्षण विभागाचा समोरील आव्हानचा सामना करण्यासाठी काही ठळक व व्यवहार्य उपाययोजना उपक्रम असल्यास ते विशद करणारे लेखही पाठ्वावावेत 

आपल्या सहकार्यातून दर तिमाहीत एक संग्रहनिय अंक  राज्यभर पोहेचल याची खात्री वाटते 

मा सुरज मांढरे 

आयुक्त शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे 

वरीलप्रमाणे आवाहन राज्याचे शिक्षण आयुक्त मा श्री सूरज मांढरे यांनी केले आहे 

 

Post a Comment

0 Comments