![]() |
जुन
महिन्यात शाळा सुरु होताच शैक्षणिक वर्ष २०२२-२३ राज्यस्तरावरून BridgeCourse
2022-23 ची ही सर्वच विद्याथ्यांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मागील दोन वर्षामध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे
नियमित शाळा सुरु होऊ शकल्या नाहीत. या आव्हानात्मक परिस्थितीमुळे विद्यार्थ्याचा अध्ययन
-हास झालेला आहे हे विविध सर्वेक्षणानुसार निदर्शनासआलेले आहे . त्याचप्रमाणे भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयातील
राज्यातील विद्यार्थ्यांची संपादणूक राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ नुसार कमी दिसून
आली आहे . या सर्वांचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होत असून विद्यार्थ्यांमध्ये इयत्तानिहाय
आणि विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. या कारणामुळे
शाळा सुरु होताच पुन्हा पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ राबवण्यात येणार आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन
परिषदेचे संचालक यांनी पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ ची शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी
करणेबाबतचे आदेश दिलेले आहेत
राज्यस्तरावरून शाळा बंद पण शिक्षण सुरु"
या उपक्रमांतर्गत विद्याथ्र्यांचे शिक्षण ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून सुरु राहावे याकरिता
विविध उपक्रम राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांचा झालेला हा अध्ययन हास भरून काढण्यासाठी
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यस्तरावरून विकसित केलेल्या ४५ दिवसांच्या सेतू अभ्यासाची
अंमलबजावणी करण्यात आलेली होती. सेतू अभ्यासाची परिणामकारकता तपासण्यासाठी राज्यस्तरावरून
संशोधन अभ्यास करण्यात आलेला असून यामध्ये सेतू अभ्यास परिणामकारक असल्याचे निष्कर्ष
मिळालेले आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये शाळा पूर्ण
क्षमतेने आणि नियमितपणे सुरु झालेल्या नसल्याने विद्यार्थ्यांना इयत्तानिहाय
आणि विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती संपादन करण्यामध्ये अडसर निर्माण झाले आहेत. त्यामुळे राज्यस्तरावरून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ही सर्वच विद्याथ्यांसाठी
पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
पुनर्रचित
सेतू अभ्यासाचे स्वरूप :
- इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी, इंग्रजी, सामान्य
विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र विषयाचा समावेश
- इयत्तानिहाय व विषयनिहाय सदर अभ्यास ,मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमतांवर आधारित
- पुनर्रचित सेतू अभ्यास हा ३० दिवसांचा (शालेय कामकाजाचे दिवस) , दिवसनिहाय कृतीपत्रिका
(worksheets) . सेतू अभ्यास मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमासाठी
- पुनर्रचित सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणीविषयक शिक्षक व विद्याथ्र्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यासाच्या सुरुवातीला
- पुनर्रचित सेतू अभ्यासातील कृतीपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित व कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पत्ती आधारित विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयं अध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप , अधिक संबोध स्पष्टतेकरिता ई-साहित्याच्या लिंक्स
- सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील याप्रकारे नियोजन
- पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणीचा यामध्ये समावेश पुनर्रचित सेतू अभ्यास व पूर्व चाचणी परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर दि. ९ जून पासून उपलब्ध . उत्तर चाचणी दि. २३ जुलै / दि. ६ ऑगस्ट, २०२२ पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध
पुनर्रचित सेतु अभ्यासाचा कालावधी
पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम 2022-2023
मराठी माध्यम सर्व विषय CLICK HERE
इंग्रजी माध्यम सर्व विषय CLICK HERE
पुनर्रचित
सेतू अभ्यासाची अंमलबजावणी :
- सेतू अभ्यास सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे बंधनकारक शालेय स्तरावर शाळेचे मुख्याध्यापक यांनी वरील नमूद केलेल्या कालावधीनुसार सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करावी.
- सेतू अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची विषयनिहाय पूर्व चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या पूर्व चावणीतील गुणांच्या नोंदी स्वत:कडे ठेवाव्यात.
- मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमता या अभ्यासातून संपादित होतील याकरिता शालेय कामकाजाच्या ३० दिवसांमध्ये सेतू अभ्यासाची अंमलबजावणी आपल्या स्तरावरून काटेकोर पद्धतीने करण्यात यावी.
- कृतीपत्रिका (worksheets) शिक्षकांनी शालेय वेळापत्रकानुसार संबंधित विषयाच्या तासिकेला सोडवून घ्याव्यात.
- शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाची कृतीपत्रिका सोडविणे अपेक्षित आहे. या कृतीपत्रिका विद्यार्थी स्वतंत्र वहीमध्ये सोडवू शकतात.
- सदर सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची विषयनिहाय उत्तर चावणी घेण्यात यावी उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या बावणीतील उत्तर गुणांच्या नोंदी स्वतःकडे ठेवाव्यात.
- ७. सदर अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्या त्या इयत्तेच्या विषयाची नियमित अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरु करण्यात यावी.
- ८.
शालेय स्तरावर पुनर्रचित सेतू अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व क्षेत्रीय
अधिकारी यांचसाठी दि. ९ जून २०२२ रोजी उद्बोधन सत्राचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात
येणार आहे.यामध्ये पुनर्रचित सेतू अभ्यास अमलबजावणी विषयी सेतू अभ्यासाचे स्वरूप कालावधी
आणि क्षेत्रीय स्तरावर करावयाची कार्यवाही बाबत उद्बोधन करण्यात येणार आहे. सदर ऑनलाईन
उद्बोधन सत्राची लिंक आपणास ईमेलद्वारे सूचित करण्यात येईल. उपरोक्त प्रमाणे सदर सेतू
अभ्यासाबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक तसेच
संबंधित पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व घटकांना अवगत करावे. सदर सेतू अभ्यासाची प्रभावी
अंमलबजावणी होण्यासाठी योग्य ती सर्व कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी. सेतू
अभ्यासाची अंमलबजावणी पूर्ण झालेनंतर शाळा भेटींच्या
आधारे सेतु अभ्यासाच्या अंमलबजावणीचा जिल्हानिहाय अहवाल पुढील १५ दिवसांच्या आत प्रस्तुत
कार्यालयास विनाविलंब सादर करावा.
0 Comments