इयत्ता 6 वी ते 8 वीच्या वर्गावरील पदवीधर शिक्षकांना देय असलेल्या वेतन श्रेणी बाबत कक्ष अधिकारी यांनी शिक्षण संचालक (प्राथमिक )यांना मागितला अभिप्राय
शासनाच्या शासन निर्णय शिक्षण व रोजगार व युवक सेवा विभाग शासन निर्णय दिनांक 14 नोव्हेंबर 1979 नुसार इयत्ता पाचवी ते सातवी मान्य शिक्षक पदांपैकी 25%पदे प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांच्या वाढीव वेतन श्रेणी मध्ये परावर्तित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे
त्यानुसार वाढीव वेतनश्रेणी मध्ये परावर्तित पदी नियुक्ती होण्याकरता प्राथमिक शिक्षकांकरता विहित केलेल्या प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या पदवीधर शिक्षकांसह सेवांतर्गत पदवीधर प्राथमिक शिक्षकांने प्राथमिक शाळांमध्ये शिकवण्यात येणारा एखादा विषय घेऊन पदवी तसेच शिक्षण शास्त्रातील पदवी प्राप्त करणे आवश्यक होते तदनंतर सदर तरतुदीत कालौघात बदल झाल्याचे दिसून येते सद्यस्थितीतील उच्च प्राथमिक वर्गावर प्रशिक्षित पदवीधर वेतन श्रेणी मध्ये नियुक्ती देत असताना शिक्षकांची शैक्षणिक पदवीसह डी एड अथवा शैक्षणिक पदवी सह बीएड ही अहर्ता ही अर्थ ग्राह्य धरली जाते याबाबत आपले अभिप्राय नियमातील तरतुदीस तात्काळ ईमेलवर पाठवण्यात यावे असे कक्ष अधिकारी शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांनी शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांना मागितले आहे
कक्ष अधिकारी शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांचे पत्र वाचा CLICK HERE
0 Comments