भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात या स्वातंत्र्यलढ्याच्या मृत्यू होत राहाव्यात स्वातंत्र्यसंग्रामातील अज्ञात नायक क्रांतिकारक स्वातंत्र्यसंग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे स्वातंत्र्यासाठी चेतवले स्फुल्लिंग कायम तेवत राहावी व देशभक्तीची जाज्वल्य भावना जनमानसात कायम राहावी या उद्देशाने या गतिमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी " आजादी का अमृत महोत्सव" अर्थात " स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत दिनांक 13ऑगस्ट 2022 ते दिनांक 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनुसार "हर घर झंडा " हा उपक्रम राबविण्यात येत आहे
केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाने "हर घर झंडा " या विषयावरील दिनांक 12 एप्रिल 2022 व 20 मे 2022 च्या सादरीकरणाद्वारे या कार्यक्रमाच्या आयोजनाचे अनुषंगाने विविध निर्णय दिले आहेत
त्यामध्ये सदर कार्यक्रम यशस्वी करावा अशा सूचनांचा समावेश पुढीलप्रमाणे आहे
- सर्व शासकीय/ निमशासकीय यंत्रणा आणि प्रसार माध्यमातून देशाभिमान व जाणीव जागृतीची मोहीम प्रभावीपणे राबवावी
- दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 22 या कालावधीत प्रत्येक शासकीय/ निमशासकीय व खाजगी व्यवस्थापनावर तसेच प्रत्येक घर इमारतीवर राष्ट्रध्वज उभारणेसाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे
- नागरिकांनी राष्ट्रध्वज स्वतः विकत घेऊन उभारण्यासाठी त्यांना प्रेरित करावे
- सदर राष्ट्रध्वज उभारणीसाठी जास्तीत जास्त प्रसिद्धी करावी यामध्ये प्रामुख्याने सामाजिक माध्यमाचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा
- केंद्रीय गृह विभाग यांच्या दिनांक 30 डिसेंबर 2021 रोजीच्या अधिसूचनेनुसार भारतीय ध्वजसंहिता 2002 भाग-1 मधील परिच्छेद 1.2 मधील राष्ट्रध्वज हे "हाताने काढलेले किंवा विणलेल्या" लोकर /सूत/सिल्क/खादी कापडापासून बनविलेला असेल या तरतुदींमध्ये बदल करण्यात आला असून सदर बदलानुसार राष्ट्रध्वज हे हाताने काढलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत / पॉलिस्टर /लोकर/ सिल्क/ खादी पासून बनवलेल्या कपड्यांचे असावेत असा उल्लेख केला आहे या भरलेल्या तरतुदीनुसार तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा वापर या प्रयोजनासाठी करता येईल
- संगीतातूनही राष्ट्रध्वजाबाबत वेगवेगळ्या पद्धतीने सादरीकरण करता येईल
- "हर घर झंडा" या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात यावी
- या उपक्रमांमध्ये राज्य/ देशातील/ परदेशातील सहभागी होणाऱ्या व्यक्तींची नोंद घ्यावी
- राष्ट्रध्वज मुबलक उपलब्ध होणेबाबत खात्री संबंधित यंत्रणांनी करावी ऑनलाईन व ऑफलाईन विक्री केंद्र राज्याने उपलब्ध करून द्यावे
- भारतीय ध्वजसंहिताचे पालन व्हावे जाणते-अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये याची दक्षता घेणेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी
- "हर घर झंडा " या उपक्रमांतर्गत कार्यक्रमाची छायाचित्रे चित्रफिती ध्वनिमुद्रण इत्यादी केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालय यांच्या https://amritmahotsav.nic.in/?QUERY या संकेतस्थळावर अपलोड करावे
- https://mahaamrut.org/ https://mahaamrut75.org/
- नागरिकांमध्ये या उपक्रमात बाबत रुची निर्माण करण्यासाठी वेबसाइट ई- कॉमर्स तसेच राष्ट्रध्वज भेट देणे अशा सर्व माध्यमाचा घेण्यात यावा
- स्थानिक स्वराज्य संस्था ,पोलिस यंत्रणा ,शाळा महाविद्यालय परिवहन ,आरोग्य केंद्रे स्वस्त धान्य दुकाने सहकारी संस्था अशा सर्वसामान्य नागरिकांची निगडित यंत्रणांचा वापर करून सदर कार्यक्रम यशस्वी करण्यात यावा या मार्गदर्शक कृती आराखडा सोबत परिशिष्ट अ मध्ये दर्शवण्यात आलेली आहे
मार्गदर्शक कृती आराखडा परिशिष्ट अ वाचा CLICK HERE
मार्गदर्शक कृती आराखडा परिशिष्ट अ पहा
९
0 Comments