स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा हा उपक्रम
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारच्या सूचनेनुसार हर घर तिरंगा हा उपक्रम राबवण्यावर सविस्तर सूचना शासन परिपत्रकानुसार देण्यात आलेले आहेत त्यास अनुसरून उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत शासकीय/ निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था ,वसतिगृहे, निवासस्थाने इत्यादी ,इमारतीवर हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत राष्ट्रध्वज फडकवण्याचा संदर्भात त्यानुसार पुढील प्रमाणे सूचना देण्यात आलेले आहेत
शासन परिपत्रक केंद्र शासनाच्या सूचनेनुसार घरोघरी तिरंगा हा उपक्रम दिनांक 13 ऑगस्ट 15 ऑगस्ट 2012 या कालावधीत राबविण्यात यावे सदर उपक्रम उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत शासकीय निमशासकीय कार्यालये सर्व विद्यापीठ .महाविद्यालय. वसतिगृह .निवासस्थाने इत्यादी इमारतीवर राष्ट्रध्वज फडकावला जाईल याची खातरजमा सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी करावी.सदर उपक्रम राबविताना प्रमुख्याने पुढील बाबींचा समावेश करावा
- एक प्रत्येक विभाग उपविभाग, विद्यापीठ, महाविद्यालय, कार्यालय यांच्या वेबसाईटच्या दर्शनी भागावर, घरोघरी तिरंगा ही टॅगलाईन तसेच तिरंगाचे चित्र प्रदर्शित करावे
- सर्व शासकीय निमशासकीय .अधिकारी. कर्मचारी. शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी .विद्यार्थी पालक यांनी समाज माध्यमाद्वारे (फेसबुक .ट्विटर .इंस्टाग्राम .व्हाट्सअप) इत्यादी तिरंग्याविषयक संदेश प्रदर्शित करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुख कार्यालय प्रमुखांनी आवाहन करावे
- उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत महाविद्यालय विद्यार्थ्यांबरोबर प्रभात फेरीचे आयोजन करून या उपक्रमाबाबत पालक व नागरिकांमध्ये प्रसार व प्रचार जाणीव जागृती करावी त्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा समावेश करून मोठ्या प्रमाणावर करता येईल
- शासकीय /निमशासकीय इमारती बरोबरच खाजगी इमारतीवर अथवा राहत्या घरावर तिरंगा फडकला बाबत सर्व अधिकारी कर्मचारी यांनी पुढाकार घ्यावा जेणेकरून इतर नागरिकांमध्ये या उपक्रमाची जाणीवजागृती निर्माण होण्यास मदत होईल
- सांस्कृतिक कार्यविभागाने सदर उपक्रमाच्या जाणीव जागृती साठी जिंगल्स, गीते ,ध्वनीचित्रफिती इत्यादीची निर्मिती केली आहे त्यावर ची माहिती शासनाच्या या https://mahaamrut.org/ https://mahaamrut75.org/ संकेतस्थळावर उपलब्ध आहेत .सदर जिंगल गीते पोस्टर्स इत्यादी वापर शासकीय -अधिकारी कर्मचारी तसेच सर्वसाधारण नागरिकांनी देखील सदर उपक्रमाच्या प्रचार प्रचारासाठी प्रचार-प्रसारासाठी करावा
- सदर उपक्रम करता राष्ट्रध्वजाची उपलब्धता महसूल विभागामार्फत तसेच इतर विभागामार्फत देखील तालुका गावपातळीपर्यंत करण्यासंबंधीच्या सूचना यापूर्वीच शासन स्तरावर देण्यात आले आहेत त्यांच्या सुनिश्चित केलेल्या दराने राष्ट्रध्वज सर्वांना खरेदीसाठी उपलब्ध असतील
- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमाचे फोटो चित्रफिती सांस्कृतिक कार्य विभागाच्या वेबसाईटवर अपलोड करण्याची कार्यवाही राज्य संपर्क अधिकारी /राष्ट्रीय सेवा योजना सुरू आहेत त्याचप्रमाणे घरोघरी कार्यक्रमाचे फोटो इत्यादी मोठा होण्यासाठी राज्य संपर्क अधिकारी राज्य सेवा योजना यांनी विशेष पथक तयार करून त्यांच्यामार्फत या प्रकरणी कार्यवाही करावी जेणेकरून राज्यातील जास्तीत जास्त माहिती देशपातळीवर पोहोचले
- वरील सर्व उपक्रम राबविताना भारतीय ध्वजसंहिता चे पालन होणे आवश्यक असून जाणते-अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये यासाठी याची सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे त्यामुळे यावर देखील जाणीव जागृती करावी
सर्व विद्यापीठाच्या कुलसचिव यांनी त्यांच्या विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालय सदर उपक्रमाबाबत सूचना देण्यात याव्या सदर उपक्रमासाठी विभागांतर्गत सर्व संचालक, विभागीय संचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक, जिल्हा सर्व अधिकारी ,कर्मचारी ,तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, कार्यक्रम समन्वयक यावेळी शिवाय विद्यापीठ स्तरावरील कुलसचिव ,उपकुलसचिव ,सहाय्यक कुलसचिव ,महाविद्यालय स्तरावर प्राचार्य, उपप्राचार्य ,प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक इत्यादी सर्व घटकांचे सहकार्य अपेक्षित असून सदर उपक्रमास सर्वांनी योग्य ती कारवाई करावी, तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल 16 ऑगस्ट 2022 या सर्व संचालकामार्फत सादर शासनास सादर करावा असे सूचित केले आहे .
मार्गदर्शक कृती आराखडा परिशिष्ट अ वाचा CLICK HERE
संपूर्ण शासन परिपत्रक वाचा २२ जुलै २०२२ पहा
0 Comments