Subscribe Us

इयत्ता 9 वी ते इयत्ता12 वी मधील विद्यार्थ्यांना वार्षिक 9600 रुपये शिष्यवृत्ती मिळणार-छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना I Sarathi Scholarship

 


  इयत्ता नववी ते इयत्ता बारावी मधील विद्यार्थ्यांना  वार्षिक 9600 रुपये शिष्यवृत्ती मिळणार ---
छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना

मराठा - कुणबी या लक्षीत गटातील पात्र विद्यार्थ्यांकडून छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती अर्ज मागविण्याबाबत

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणेचे व्यवस्थापकीय संचालक यांनी  सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता छत्रपती राजाराम महाराज सारखी शिष्यवृत्तीसाठी इयत्ता नववी व इयत्ता दहावीच्या मराठा, कुणबी ,कुणबी-मराठा व मराठा -कुणबी या  लक्षीत गटातील पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागणीबाबत दिनांक 26 जुलै 2022 रोजी पुढील प्रमाणे परिपत्रक निर्गमित केले आहे.

संपूर्ण माहिती परिपत्रक वाचा CLICK HERE

    समाजाच्या आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्याची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना  परीक्षेचे (NATIONAL MERIT CUM MEANS SCHOLARSHIP -NMMS) मुख्य उद्देश आहे. सदरची परीक्षा सन 2007- 2008 पासून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत इयत्ता आठवीच्या वर्षाखेरीस घेतली जाते.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पातळीवर NMMS परीक्षा शिष्यवृत्तीच्या धरतीवर सारथी शिष्यवृत्ती योजना सन 2021-22 पासून लक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहेमहाराष्ट्र राज्यातील NMMS) ही शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झालेले पण केंद्र सरकारची शिष्यवृत्ती अप्राप्त असलेल्या मराठा कुणबी, कुणबी मराठा, मराठा- कुणबी या केवळ लक्ष गटातील तसेच आर्थिक दुर्बल घटकातील इयत्ता नववीचे इयत्ता बारावी पर्यंत नियमित शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारखी पुणे यांचे मार्फत राजाराम महाराज सारखी शिष्यवृत्ती योजना सन 2021-22 या वर्षापासून सुरू केली आहे

          महाराष्ट्र राज्यातील दहा हजार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ सन 2021- 22 मध्ये झाला आहे. सदरची शिष्यवृत्ती योजना इयत्ता नववी पासून इयत्ता बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असून सन 2021-22 मध्ये इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली ही योजना यावर्षी इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेल्या लक्षात गटातील पात्र विद्यार्थ्यांना लागू करण्यात येत आहे.

    सारथी संस्थेने सदर छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती अर्ज करू इच्छिणाऱ्या लक्षित  गटातील पात्र विद्यार्थ्यांकडून नववी व दहावी साठी स्वतंत्रपणे अर्जाचा नमुना मुख्याध्यापक शिफारस पत्र व अर्ज भरताना विचारात घ्यावयाच्या सूचना अर्जासोबत जोडायची कागदपत्र या याबाबत सविस्तर मसुदा तयार केला असून याविषयी आपल्या कार्यालयाकडून शिक्षणाधिकारी माध्यमिक सर्व यांना कळविण्यात यावे शिक्षण अधिकारी माध्यमिक यांनी आपल्या स्तरावरून सर्व संबंधित पात्र असलेल्या माध्यमिक शाळांना कळवावे तसेच अर्ज सादर करताना खालील सूचना माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी विचारात घेणे बाबत अवगत करावे.

  1.  NMMS परीक्षा उत्तीर्ण झालेले व केंद्र शासनाच्या मेरिट लिस्ट मध्ये येऊन शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज सारथी शिष्यवृत्ती  साठी घेऊ नये.
  2.  NMMS परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पण केंद्र शासनाची शिष्यवृत्ती अप्राप्त असलेल्या मराठा खुला संवर्ग, कुणबी ,कुणबी मराठा व मराठा कुणबी ओबीसी संवर्ग या चार लक्षीत गटातील असणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे अर्ज सारथी संस्थेच्या शिष्यवृत्ती स्वीकारावे.
  3.  विद्यार्थ्यांची ऑनलाइन माहिती खालील दिलेल्या लिंक वर भरावी व सोबत दिलेल्या नमुन्यातच हार्ड कॉपी आवश्यक सत्यप्रति सह सादर करावी.
  4.  महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना आहे.
  5.  खालील विद्यार्थी एन एम एम एस परीक्षेसाठी पात्र नाहीत म्हणून खालील शाळेतील विद्यार्थी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी ही अपात्र आहेत अशा विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीस अर्ज स्वीकारू नये.
    1. विनाअनुदानित शाळेत शिकणारी विद्यार्थी.
    2. केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
    3. जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
    4. शासकीय वस्तीगृहाच्या सवलतीच्या भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधेचा लाभ घेणारे विद्यार्थी.
    5. सैनिकी शाळेत शिकणारे विद्यार्थी.
  6. प्रस्तुत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असावे. विद्यार्थ्यांनी तहसीलदाराचे अपक्षित असलेला चालू आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक कडे जमा करावा सदर उत्पन्नाचा दाखला मुख्यध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवावा उत्पन्नाच्या दाखल्याची सत्य प्रत विद्यार्थ्यांच्या अर्जासोबत जोडावी.
  7. मुख्याध्यापकांनी वर्ग शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांची ऑनलाइन माहिती सारथी ने  दिलेल्या पुढील लिंक वर भरावी इयत्ता नववी व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे लिंक देण्यात आली आहे.   (महत्त्वाचे - विद्यार्थ्यांनी सदर लिंक भरू नये आपले वर्ग शिक्षक यांना कागदपत्र द्यावे व त्यांना लिंक भरण्यास सांगावे  )
    1. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना    https://forms.gle/DX3tLdkyGzhqtK1v8  या वरील लिंक वरून माहिती इंग्रजी भाषेत भरावी.
    2. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScFdc6X67ka4HZhxJxBCiE7WUIptuXnSSkAxsBoyg6ZCVa-ow/viewform  या वरील लिंक वरून माहिती इंग्रजी भाषेत भरावी.
  8.  छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी अर्जासोबत खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करावे.
    1. विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीत विहित नमुन्यात शिष्यवृत्ती मागणी अर्ज इयत्ता नववी व दहावी साठी स्वतंत्र अर्ज नमुना तयार केला आहे सोबत जोडला आहे.
    2. मुख्याध्यापकांची स्वाक्षरीत विहित नमुन्यात शिफारस पत्र प्रपत्रक.
    3. विद्यार्थ्यांच्या पालकांचा तहसीलदाराच्या स्वाक्षरीतील सन 2022 23 या सालातील उत्पन्नाच्या दाखल्याची सत्यप्रत.
    4. विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची सत्यप्रत.
    5. विद्यार्थ्यांची स्वतःची नवी बँक खाते असलेल्या पासबुकच्या पहिल्या पानाची सत्यप्रत नाव खाते क्रमांक आयएफसी कोड सह नमूद असणे आवश्यक आहे.
    6. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता नववीच्या वार्षिक परीक्षा 55% गुणांसह उत्तीर्ण असलेल्या गुणपत्रिकेची सत्य प्रत. केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांनी जोडावी.
    7. एन एम एम एस परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक निकाल पत्रक.
    8. अन्य अनावश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडू नये.
    9.  काही एकत्रित कुटुंबातील विद्यार्थ्यांचा उत्पन्नाचा दाखला हा आजोबा काका आजी काकी व अन्य नातेवाईकांच्या नावाचा असतो सदर दाखल्यावर संबंधित विद्यार्थ्यांच्या नावाचा व नात्याचा उल्लेख असावा केवळ अशा दाखल्यासोबत विद्यार्थ्यांनी एकत्रित कुटुंबातील शिधापत्रिका रेशन कार्ड सत्य प्रत अर्ज सोबत जोडावी व इतर विद्यार्थ्यांना शिधापत्रिका सत्यप्रत जोडण्याची आवश्यकता नाही.
    10.  एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षा बाबत आहे त्याची पालन होणे आवश्यक आहे तरच विद्यार्थ्यास सारथी शिष्यवृत्ती योजना लागू राहील.
    11. विद्यार्थी विद्यार्थिनीस नववी व इयत्ता अकरावी मध्ये वार्षिक परीक्षेत किमान 55 टक्के गुण मिळणे आवश्यक आहेत.
    12. विद्यार्थी विद्यार्थिनीस इयत्ता दहावी मध्ये 60 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
    13. एन एम एम एस ही परीक्षा इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची वर्षा अखेरीस आयोजित केली जाते यावर्षी सदर परीक्षा 19 जून 2022 रोजी घेण्यात आली या परीक्षेचा निकाल ऑगस्टपर्यंत प्राप्त होऊ शकेल तदनंतर इयत्ता नववी मध्ये शिकत असलेल्या लक्षीत गटातील मराठा कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागविण्यात यावे त्यापूर्वी आवश्यक पूर्वतयारी करावी पालकांना उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराच्या स्वाक्षरीतील दाखला विद्यार्थ्यांचे स्वतःचे नावे बँक खाते पोस्ट बँक खाते आधार कार्ड तयारी छत्रपती राजाराम महाराज सार्थी शिष्यवृत्ती पात्र असणाऱ्या लक्षीत गटातील इच्छुक विद्यार्थ्यांनी करावी.
    14.  ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी मध्ये शिकत असताना सारथी संस्थेची शिष्यवृत्ती मंजूर झाली होती यावर्षी 2022-23 मध्ये दहावी मध्ये नियमित शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकडून यावर्षी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती मिळण्यासाठी 15 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज घ्यावेत इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या व सार्थी शिष्यवृत्ती पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी मध्ये 55% गुण प्राप्त करून वार्षिक परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सोबत इयत्ता नववीच्या वार्षिक परीक्षेच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत जोडावी.
  9.  विद्यार्थ्यांचे संपूर्ण भरलेले अर्ज संबंधित शाळांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे सादर करावेत शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी सदर अर्ज स्वीकारताना तालुका निहाय संख्या विचारात घेऊन कॅम्पचे आयोजन करावे सदर कॅम्पची तारीख या कार्यालयास कळवावी सदर दिवशी तज्ञ व्यक्तीकडून सदर अर्जांची छाननी व पडताळणी करावी व पात्र असलेले अर्ज सारथी संस्थेकडे माननीय व्यवस्थापकीय संचालक छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे महाराष्ट्र 411004 या पत्त्यावर खास दुताकरवी समक्ष अगर स्पीड पोस्ट ने सादर करावे.
  10. सारथी संस्थेकडून मराठा, कुणबी ,कुणबी-मराठा व मराठा -कुणबी या चार लक्षित गटातील असणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते इयत्ता बारावी पर्यंत प्रत्येक शैक्षणिक वर्षात प्रति महिन्याकरता 800 रुपये प्रमाणे प्रति व वार्षिक एकूण 9600 शिष्यवृत्ती अदा केली जाईल.
  11. छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम अदा केली जाईल.
  12. अपूर्ण भरलेला अर्ज चुकीची माहिती भरलेला अर्ज अपूर्ण कागदपत्रे असलेला अर्ज विहित मुदतीत सादर न केलेला अर्ज अन्य व्यक्तीचे बँक खाते पासबुक सत्यप्रत असल्यास सदर अर्जाचा सारथी शिष्यवृत्तीस विचार केला जाणार नाही.
  13. विद्यार्थ्यांनी व शाळांनी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज परस्पर सारथी संस्थेकडे पाठवू नयेत शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे मार्फत सदर अर्ज सादर करणे आवश्यक आहेत शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी आपल्या जिल्ह्याचे सोबतचे ख प्रपत्र सदर अर्जासोबत सादर करावे.
  14.  अपात्र विद्यार्थ्यांची सार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवून घेणे उत्पन्न मर्यादेचे उल्लंघन होणे अन्यसंवर्गाचे अर्ज दाखल करून शिष्यवृत्ती मिळणे बाबत संबंधित विद्यार्थी व मुख्याध्यापक यांचेवर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल यापूर्वी अशी शिष्यवृत्ती प्राप्त केली असल्यास परत करावी.
  15.  कोणतीही आपत्कालीन परिस्थिती व अन्य कारणाने उपरोक्त शिष्यवृत्ती प्रलंबित किंवा रद्द झाल्यास प्रलंबित किंवा रद्द कालावधीचा कोणताही लाभ अथवा आर्थिक सहाय्य सारथी पुणे मार्फत उमेदवारांना देय राहणार नाही.
  16.  छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती बाबत निर्णय घेण्याची सर्वाधिकार सारथी संचालक मंडळ व व्यवस्थापकीय संचालक यांना राहतील.
  17. वरील सर्व सूचना सर्व संबंधित शाळांच्या निदर्शनास आणाव्यात शाळांना काही शंका अडचणी असल्यास 02025592504 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन कामाच्या दिवशी विहित शासकीय कामकाजाच्या वेळेत संपर्क करावा.

संपूर्ण माहिती परिपत्रक वाचा CLICK HERE

पुढील प्रमाणे सूचना व्यवस्थापकीय संचालक छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे यांनी माननीय आयुक्त शिक्षण आयुक्तालय पुणे सर्व विभागीय उपसंचालक व सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक सर्व जिल्हे मनपा नपा प्रशासन अधिकारी यांना दिले आहेत.




Post a Comment

0 Comments