Subscribe Us

किशोरवयीन मुलांची सुरक्षितता आणि हक्क समस्या यावर जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करणेबाबत


 शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांची आणि किशोरवयीन मुलांची सुरक्षितता आणि हक्क समस्या यावर जनजागृती पर कार्यक्रम आयोजित करणे बाबत

 नवीन शैक्षणिक धोरणानुसार NEP 2020 मध्ये सुरक्षेसंबंधित अनेक मुद्दे मांडलेले आहेत यासाठी शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांची सुरक्षितता आणि हक्क समस्या याकडे  लक्ष देणे आवश्यक आहे मादक पदार्थाचे सेवन, हिंसाचार, भेदभाव आणि छळवणुकीचे प्रकार थांबवून किशोवयीन मुलांना सुरक्षित वातावरण देणे गरजेचे आहे

 त्यासाठी त्यांच्या हक्काची जपवणूक होणे आवश्यक आहे अंमली पदार्थ संबंधित विविध मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी नवी दिल्ली येथे माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय नार्को समितीची बैठक झाली सदर बैठकीत अंमली पदार्थांच्या तस्करी आणि गैर वर्तनाच्या दुष्परिणामाबद्दल जागरूकता वाढविणे भारतातील अंमली पदार्थांचे विरोधात लढण्यासाठी किशोरवयीन मुलांना प्रेरित करण्यासाठी प्रभावी पाऊल उचलली जाण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे. 

भारतातील किशोरवयीन मुलांना सुदृढ आणि जबाबदार जीवन जगण्यासाठी शाळांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने तदनुषंगाने खालील सुचवलेले कार्यक्रम शाळा स्तरावर आयोजित केले जावेत या संदर्भात पुढील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा 

  1.  दरमहा निबंधलेखन स्पर्धा ,रेखाचित्र, चित्र, छायाचित्रण आणि शाळेमध्ये प्रदर्शन फलक  अशा  संकल्पनेसह कला स्पर्धेचे आयोजन करावे 
  2.  स्थानिक कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या खाजगी- शासकीय संस्थेच्या समन्वयाने शालेयस्तरावर पथनाट्याची आयोजन करावे तसेच व्यसनमुक्ती या विषयावर मार्गदर्शन व चर्चासत्र करावे
  3.  अंमली पदार्थविरोधी मोहिमे संदर्भात विविध घोषवाक्य स्पर्धांचे शाळांमध्ये आयोजन तसेच समाज माध्यमात वापर करून व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम बाबत जनजागृती करणे यासारखे कार्यक्रम शाळास्तरावर आयोजित केले जावेत या व्यतिरिक्त शाळा स्तरावर आपल्या आवश्यकतेनुसार विविध कार्यक्रमाचे आखणी शाळा करू शकतात अशा प्रकारचे पत्र  मा.उपसंचालक राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्राचे पुणे यांनी निर्गमित केले असून जिल्ह्यातील सर्व प्राचार्य ,शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी आपल्या अधिनस्त  असणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांना पत्राप्रमाणे विविध कार्यक्रमाचे  आयोजन  करण्यास सूचित केले आहे



Post a Comment

0 Comments