119 माध्यमिक शिक्षकांची होणार उपशिक्षणाधिकारी पदी पदोन्नती......
जिल्हा तांत्रिक सेवा गट- क श्रेणी-2 (शिक्षण) या संवर्गातून उपशिक्षणाधिकारी व तत्सम, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (प्रशासन शाखा) या संवर्गात पदोन्नती देण्यासाठी, सन 2021-22 च्या निवडसूची महसुली विभागाची पसंती मागविण्यात आले आहे
जिल्हा तांत्रिक सेवा गट-क श्रेणी-2 (शिक्षण) या संवर्गातून महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (प्रशासन शाखा) उपशिक्षणाधिकारी व तत्सम या पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यासाठी खालील नमूद अधिकाऱ्यांची निवड समितीने शिफारस केली आहे. सदर निवड सूचीस सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिलेली आहे.
माध्यमिक शिक्षकांची पदोन्नतीसाठी निवड यादी CLICK HERE
"महाराष्ट्र शासकीय गट-अ व गट-ब ( राजपत्रीत व अराजपत्रीत) सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसुली विभाग वाटप नियम, 2021” निर्गमित करण्यात आले असून सोबत जोडलेल्या बंधपत्राच्या नमन्यामध्ये बंधपत्र सादर करणेबाबत निर्देश दिलेले आहेत. त्याअन्वये पदोन्नतीने नियुक्तीकरिता महसूल विभाग वाटपासाठी महसूल विभागनिहाय रिक्त पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे.
![]() |
शासन निर्णय दि. 22.06.2022 व दि. 11.10.
2022 अन्वये नव्याने जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालयासाठी उपशिक्षणाधिकारी (योजना) अशी एकूण 35 पदे मंजूर करण्यात आलेली आहेत. त्यापैकी 30 पदे रिक्त पदांमध्ये दर्शविण्यात आलेली आहेत. उर्वरित वाशिम, हिंगोली, गोंदिया, नंदुरबार व पालघर येथील जिल्हा परिषद कार्यालयात अद्याप आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचा सेवार्थ प्रणालीमध्ये समाविष्ठ करण्यात आलेला नाही. तसेच प्रशासकीय बाबींची पूर्तता होणे आवश्यक असल्याने उपरोक्त रिक्त पदांमध्ये सदर 05 जिल्हयातील उपशिक्षणाधिकारी (योजना) रिक्त पदांचा समावेश करण्यात आलेला नाही.
2/- निवडसूचीतील खालील नमुद अधिकाऱ्यांना वरील नमुद महसूल विभाग निहाय रिक्त पदांची संख्या कळविण्यात येत आहे. त्यानुसार नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोकण विभागाचा भाग असलेला कोकण-1, नाशिक, कोकण विभागाचा भाग असलेला भाग 2, पुणे यापैकी कोणत्याही एकाच महसूल विभागाची पसंती सोबत जोडलेल्या बंधपत्रात शासनास सादर करण्यासाठी या कार्यालयास सादर करण्यात यावी.
पदोन्नतीसाठी निवड यादी पहा
बंधपत्र नमुना
महत्त्वाच्या LINK
शिक्षण सेवा गट ब प्रशासन शाखा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा बाबत महत्त्वाचे आदेश सूचना
0 Comments