Subscribe Us

राज्यात 17130 पोलीस शिपाई व ड्रायव्हर पदासाठी भरती प्रक्रिया अर्ज 3 नोव्हेंबर 2022 पासून सुरु ...


राज्यात 17130 पोलीस शिपाई व ड्रायव्हर पदासाठी भरती प्रक्रिया अर्ज 3 नोव्हेंबर 2022 पासून  सुरु ... 

महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि दिनांक २३.६.२०२२ च्या सेवाप्रवेश नियमात केलेल्या सुधारीत तरतुदींनुसार पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक  यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई  यांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे स्विकारण्यात येतील. 

महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम   CLICK HERE

 अर्ज भरणे कालावधी  दिनांक ०३.११.२०२२ ते ३०.११.२०२२ 

पोलीस शिपाई जाहिरात  CLICK HERE

पोलीस ड्रायवर जाहिरात CLICK HERE

ऑनलाईन अर्ज    CLICK HERE CLICK HERE

◾पदाचे नाव: पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई), पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई) ड्रायव्हर, SRPF पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई).
◾ रिक्त पदे: 17130 पदे.
शैक्षणिक पात्रता: बारावी उत्तीर्ण
◾वयाची अट: खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे, मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे.
◾नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.
◾अर्ज सुरू होण्याची तारीख: 03 नोव्हेंबर 2022
◾आवेदन का अंतिम तारीख: 30 नोव्हेंबर 2022 (Maharashtra police recruitment 2022)
संकेतस्थळ   policerecruitment2022. mahait.org आणि www.mahapolice.gov.in   

मेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करु शकत नाही.

उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल.

पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा घेण्यांत येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यांत येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची वाव विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.

शारीरीक चाचणी परीक्षा



भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारिरीक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या १.१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.

लेखी परीक्षा



शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधुन एक गुणवत्तायादी तयार केली जाईल. तात्पुरत्या निवडसूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील. कागदपत्र पडताळणी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवडसूचीमध्ये समावेश केला जाईल. निवडसूचीतील उमेदवाराची निवड तात्पुरती (Provisional selection) असेल. निवडसूचीमध्ये उमेदवाराच्या नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येवू नये. शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रिकरण केल्यानंतर, गृहविभाग शासन निर्णय, दि.१०.१२.२०२० नुसार अंतिम गुणवत्तायादी तयार करण्यांत येईल.





पदोन्नतीवरील आरक्षणासंदर्भात शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २८३०६/२०१७ बाबत होणान्या अंतिम निर्णयाच्या आदेशाच्या अधिन राहून व मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी जनहित याचिका क्रमांक १७५ / २०१८ व इतर संलग्न याचिकांमध्ये दिनांक २७.०६.२०१९ रोजी दिलेल्या निर्णयाविरुध्द मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेबाबत होणान्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून रिक्त पदांची गणना केलेली आहे. त्यामुळे जाहीरातीमध्ये नमूद केलेल्या रिक्त पदांच्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो व त्याची माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानुसार नियुक्ती अधिकारी यांना पदे भरण्याचा अधिकार आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी लागू केलेले आरक्षण हे या अनुषंगाने उद्भवणान्या न्यायालयीन प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधिन असेल.

पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment 2022.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या १% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.

उमेदवारांनी संकेतस्थळावर जावुन आवेदन अर्ज सादर करावयाचा आहे, त्या घटकात रिक्त असलेली पदे विचारात घेऊनच उमेदवाराने अर्ज सादर करावेत. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात (Unreserved) अर्ज करु शकतात, परंतू खुल्या प्रवर्गातील (Unreserved) उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करु शकणार नाहीत.

Post a Comment

0 Comments