जिल्हांतर्गत बदलीकरीता विशेष संवर्ग 1 व 2 मधुन अर्ज करणा-या प्राथमिक शिक्षकांचे मुळ कागदपत्र समितीकडुन तपासणी करुन घेण्याचे आदेश
मा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांचे पत्र CLICK HERE
जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमध्ये विशेष संवर्ग 1 मधुन अर्ज करणा-या प्राथमिक शिक्षकांचे मुळ कागदपत्र पडताळणी करीता संदर्भीय शासन निर्णयामधील मुद्दा क्रमंक 4.2.8 मध्ये नमुद असलेल्या समितीमध्ये गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी अशी समिती असुन सदर समिती गठीत करण्यात येऊन विशेष संवर्ग 2 मधुन अर्ज करणा-या प्राथमिक शिक्षकांना 30 कि.मी रस्त्यांच्या आंतराचा दाखला कार्यकारी अभियंता सार्वजनीक बांधकाम विभाग / जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांचा दाखला संदर्भीय शासन निर्णयामधील मुद्दा क्रमांक 4.3.5 नुसार आवश्यक असल्यामुळे सदरचा दाखला प्राप्त करुन घेणे बाबत अवगत करणेकरीता संदर्भ क्रमांक 5 च्या पत्रान्वये सुचना देण्यात आलेल्या होत्या , जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेकरीता संदर्भ क्रमांक 2 च्या पत्रान्वये सेवा कालावधी 30 जुन 2022 पर्यंतचा गृहीत धरुन विशेष संवर्ग 1 व 2 मधुन अर्ज करणा-या शिक्षकांचे दिनांक 22/11/2022 ते 23/11/2022 पर्यंत मुळ कागदपत्र तपासणी करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहे
जिल्हांतर्गत बदली करीता विशेष संवर्ग-1 मधुन अर्ज करणा-या प्राथमिक शिक्षकांची मुळ कागदपत्र पडताळणी करीता समिती गठीत होणार
ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक 07 एप्रील 2021 मधील मुद्दा क्रमांक 4.2.8. विशेष संवर्ग भाग 1 मध्ये गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकांनी त्याबाबतचे सक्षम प्राधिका-याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहणार आहे
सदरच्या अर्जाच्या पात्रतेबाबत संबंधित गटाचे गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची समिती निर्णय घेईल असे शासन निर्णयात नमुद आहे. प्राथमिक शिक्षक संवर्गातील विशेष संवर्ग भाग-1 मधुन अर्ज करणा-या कर्मचा-यांच्या अर्जाच्या पात्रतेबाबत पंचायत समिती मध्ये समिती गठीत करुन प्राथमिक शिक्षकांची मुळ कागदपत्र पडताळणी करून निर्णय घेण्यात यावा. असे आदेश मा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांनी दिले आहेत
सदर समिती तालुका स्तरावर असणार आहे
मा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांचे पत्र CLICK HERE
जिल्हापरिषद शिक्षक बदली २०२२ सर्व महत्त्वाचे अपडेट https://bit.ly/3n5wl9A
सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत सुधारित वेळापत्रक जाहीर CLICK HERE
0 Comments