Subscribe Us

५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा जुलै २०२२ चा अंतरिम निकाल जाहीर 5th and 8th Scholarship exam result declared

 


    ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा जुलै २०२२ चा अंतरिम  निकाल जाहीर 
 
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)

    रविवार दिनांक 31 जुलै 2022 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या  पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा  इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी या महाराष्ट्रातील लाखो मुलांनी परीक्षा दिली होती.  शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षाआदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षाविमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता ) निकाल सोमवार०७ नोव्हेंबर २०२२ रोजी सायं. ०६.००  वाजता परिषदेच्या https://www.mscepune.in/   https://www.2022.mscepuppss.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे  

विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी  CLICK HERE 

(विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी फक्त सिट/परीक्षा नंबर आवश्यक ) 

शाळा निकाल पाहण्यासाठी  CLICK HERE 

(शाळा निकाल पाहण्यासाठी udise नंबर व passward आवश्यक)

गुणपडताळणी सूचना 

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. ०७/११/२०२२ ते १७/११/२०२२ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.

नावात दुरुस्ती

विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी / ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरूस्तीसाठी दि. १७/११/२०२२ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

मुदत 

विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये, अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.





 

Post a Comment

0 Comments