Subscribe Us

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत दैनंदिन उपस्थितीची माहिती एमडीएम पोर्टलवर नियमित भरणे बाबत


 प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत दैनंदिन उपस्थितीची माहिती एमडीएम पोर्टलवर नियमितपणे अद्यावत करणे बाबत..

शिक्षण संचालक प्राथमिक यांचे पत्र CLICK HERE 

PM पोषणशक्ती वेबसाईट लिंक CLICK HERE

 प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण अंतर्गत शाळांमार्फत दैनंदिन आहार घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या उपस्थितीची माहिती एमडीएम पोर्टलवर मोबाईल अॅप व वेबपोर्टलच्या माध्यमातून अद्यावत करण्यात येते. शाळांनी ऑनलाईन भरलेल्या माहितीच्या आधारे इंधन - भाजीपाला तसेच धान्यादी मालाची देयके जनरेट करण्यात येऊन शाळांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येत आहे. माहे मार्च २०२२ पासून शाळास्तरावर आहार शिजवून विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तथापि अनेक शाळांचे अॅप अद्यावत नसणे, शिक्षकांची नोंदणी नसणे किंवा इतर काही तांत्रिक कारणामुळे दैनंदिन उपस्थितीची माहिती भरत नसल्याचे निदर्शनास येत आहे.

दिवाळी नंतर शाळांच्या कामकाजास प्रत्यक्ष सुरवात होऊन विद्यार्थ्यांना आहार उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तथापि आपल्या जिल्ह्यातील योजनेस पात्र असणा-या १०० टक्के शाळा दैनंदिन उपस्थितीची माहिती नियमितपणे एम. डी. एम पोर्टलवर अद्यावत करीत असलेबाबत आढावा घेण्यात यावा. सदर बाबत तालुकानिहाय अधिका-यांवर जबाबदारी निश्चित करुन देण्यात यावी, जेणेकरुन संनियंत्रण योग्य प्रकारे होईल, भविष्यात शाळांनी माहिती भरली नसल्याने त्यांना अनुदान न मिळाल्यास, संबंधित शाळा व क्षेत्रीय अधिकारी जबाबदार राहतील याची गांभीर्याने नोंद घ्यावी. असे मा शिक्षण संचालक प्राथमिक यांनी आदेश दिले आहेत 


Post a Comment

0 Comments