पाचवी आठवी ची शिष्यवृत्ती परीक्षा SCHOLARSHIP EXAM 2022-23 प्रवेश अर्ज भरण्यास २० डिसेंबर पर्यत मुदतवाढ
परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दिनांक १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर, २०२२ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. २० डिसेंबर, २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
प्रसिद्धीपत्रक पहा CLICK HERE
सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दि. २० डिसेंबर, २०२२ अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी..
पाचवी आठवी ची शिष्यवृत्ती परीक्षा SCHOLARSHIP EXAM 2022-23 रविवार दिनांक 12 फेब्रुवारी 2023
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी आयोजित करणेबाबतची अधिसूचना...
शासनमान्य शाळांमधून सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ठ होण्यासाठी तसेच इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ट होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या https://www.mscepune.in/ व https://2023.mscepuppss.in/startpage.aspx या संकेतस्थळावर दि. १६ / ११ / २०२२ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
उपरोक्त परीक्षा दि. १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये एकाच वेळी घेण्यात येणार आहे
शाळा नोंदणी अर्ज नमुना CLICK HERE
शिष्यवृत्ती परीक्षा - २०२३ बाबतच्या सूचना
परीक्षेची माहिती 

0 Comments