सारथी शिष्यवृत्ती - डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना - 2022
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे मार्फत राबवली जाणारी सारथी शिष्यवृत्ती अंतर्गत डॉक्टर पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना 2022. मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी या प्रवर्गांमधील पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती योजना.
अंतिम मुदत दिनांक 31 डिसेंबर 2022.
- मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी या प्रवर्गांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न रुपये आठ लक्ष पर्यंत आहे
- जे विद्यार्थी पदवी प्राप्त असून पदव्युत्तर शिक्षणासाठी आयआयटी अथवा तत्सम 200 शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश प्राप्त आहेत अशा विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना 2022 सुरू करण्यात आलेली आहे.
- सोबत दोनशे विविध शैक्षणिक संस्थांची यादी दिली आहे. यामध्ये पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला असल्यास विहित नमुन्यामध्ये अर्ज करून आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन व हार्ड कॉपी सह अर्ज दिनांक 31 डिसेंबर 2022 पर्यंत सारथी संस्थेच्या कार्यालयामध्ये सादर करायचा आहे
- या शिष्यवृत्ती योजनेमध्ये 300 विद्यार्थ्यांची निवड करून शिक्षणाचा संपूर्ण खर्च सारथी संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.
- या शिष्यवृत्ती योजनेची अंतिम मुदत दिनांक 31 डिसेंबर 2022 पर्यंत असल्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत याबाबतची माहिती पाठविणे आवश्यक आहे
Application Form & List of Institutes / Colleges CLICK HERE
Advertisement -मुदतवाढ CLICK HERE
हमीपत्र CLICK HERE
Terms & Conditions - CLICK HERE
APPLICATION LINK CLICK HERE
0 Comments