Subscribe Us

परीक्षा पे चर्चा ६ मार्गदर्शक सत्र

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत मा. पंतप्रधान महोदय यांच्यासमवेत *परीक्षा पे चर्चा ६* या कार्यक्रमात सहभाग घेण्याबाबत मार्गदर्शक सत्र

    मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी *परीक्षा पे चर्चा ६* या कार्यक्रमांतर्गत इयत्ता नववी ते बारावी चे विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचेसमवेत तालकटोरा स्टेडीयम, नवी दिल्ली येथे जानेवारी २०२३ मध्ये संवाद साधणार आहेत .

या उपक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना *"परीक्षा पे चर्चा-६"* कार्यक्रमासाठीची नाव नोंदणी प्रक्रिया, सृजनशील निबंध लेखनाचे विषय व मा. पंतप्रधान यांना विचारायचे प्रश्न यात सहभाग घेण्याबाबत  आवश्यक *विशेष मार्गदर्शन सत्र* राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत https://youtu.be/LyBT328-hvU  या यु-ट्यूब लिंकद्वारे घेण्यात येत आहे.

सदर मार्गदर्शन सत्र दि.  १४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११:०० घेण्यात  येणार आहे.

या मार्गदर्शनाचा लाभ इयत्ता ९ ते १२ पर्यंतचे विद्यार्थी, सर्व शिक्षक व पालक यांना घेता येईल.

ज्यांना सदर सत्र लाईव्ह पाहणे शक्य नसेल ते आपल्या सोईने याचा लाभ घेऊन सदर स्पर्धेत भाग घेऊ शकतात.

तरी  आपल्या जिल्ह्यातील / शाळेतील  इयत्ता नववी ते बारावीचे सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक व पालक यांच्यापर्यंत सदर सत्राची माहिती पोहोचवावी.

*राजेश पाटील*
*संचालक,*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.*

Post a Comment

0 Comments