Subscribe Us

नियमित पदावरील शिक्षकाची नामनिर्देशनाद्वारे/स्पर्धात्मक निवड प्रक्रियेद्वारे समान / उच्च वेतनश्रेणीत नियुक्ती झाल्यास पुर्वीच्या वेतनास संरक्षण देण्याबाबत.

 नियमित पदावरील शिक्षकाची नामनिर्देशनाद्वारे/स्पर्धात्मक निवड प्रक्रियेद्वारे समान / उच्च वेतनश्रेणीत नियुक्ती झाल्यास पुर्वीच्या वेतनास संरक्षण देण्याबाबत. दिनांक १६ डिसेंबर २०२२ 

 कार्यरत नियमित शिक्षकाची उच्च अर्हता प्राप्त करुन नामनिर्देशनाद्वारे/स्पर्धात्मक निवड प्रक्रियेद्वारे निवड होऊनही उच्च/असमान पदावर नियुक्ती झाल्यास वेतनास संरक्षण नसल्याच्या शासन निर्णयातील अटीमुळे अशा शिक्षकास पूर्वी केलेल्या सेवेचा लाभ नवीन नियुक्ती वेळी होत नसल्याने त्यास अशी नवीन नियुक्ती स्वीकारणे अहितकारी ठरते. त्यामुळे अशा नियमित कार्यरत शिक्षकाने नामनिर्देशाद्वारे/स्पर्धात्मक निवड प्रक्रियेद्वारे निवड होऊन नवीन नियुक्ती स्वीकारल्यास त्याच्या वेतनास संरक्षण देण्यात यावे अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत होती. सदर मागणीच्या अनुषंगाने शासन निर्णय दि. १५/९/२०११ मधील अट/शर्त क्र. ३ मध्ये सुधारणा करण्यात येऊन नियमित कार्यरत शिक्षकाची नामनिर्देशनाद्वारे / स्पर्धात्मक निवड प्रक्रियेद्वारे दुस-या समान (प्राथमिक मधून प्राथमिक, माध्यमिक मधून माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये) तसेच उच्च/असमान (प्राथमिक मधून माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालय अथवा माध्यमिक मधून उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयात) पदावर नव्याने नियुक्ती झाली असल्यास अशा शिक्षकाच्या पूर्वीच्या पदावरील वेतनास संरक्षण देण्याची बाब विचाराधीन होती.

शासन निर्णय वाचा   CLICK HERE 

नियमित शिक्षक पदावर कार्यरत शिक्षकाची नामनिर्देशनाद्वारे/स्पर्धात्मक निवड प्रक्रियेद्वारे दूस- या समान (प्राथमिक मधून प्राथमिक, माध्यमिक मधून माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय) तसेच उच्च/असमान (प्राथमिक मधून माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालय अथवा माध्यमिक मधून उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय) पदावर नव्याने नियुक्ती झाली असल्यास अशा शिक्षकाच्या पुर्वीच्या वेतनास संरक्षण देतेवेळी  अटी व शर्ती लागू राहतील


Post a Comment

0 Comments