Subscribe Us

संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रातील युवकांना सुवर्णसंधी

 


संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रातील युवकांना सुवर्णसंधी

Gateway To Defence Career सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, एन-१२, सिडको, औरंगाबाद SPISERVICES PREPARATORY INSTITUTE, N-12 SECTOR, CIDCO, AURANGABAD सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, (एस.पी.आय.) औरंगाबाद : संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवकांनी जास्तीत जास्त संख्येने जावे, यासाठी औरंगाबाद येथे सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची (SPI) स्थापना महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. संस्थेच्या पुढील, ४७ व्या तुकडीसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

SPI- Admission Advertise (Marathi) CLICK HERE

WEBSITE  CLICK HERE

Registration  CLICK HERE

Login CLICK HERE

DOWNLOAD BROCHURE   CLICK HERE

पात्रता : (अ) अविवाहित (मुलगा).

               (ब) महाराष्ट्राचा अधिवासी (Domicile). 

               (क) जन्म तारीख ०१ जानेवारी २००७ ते ३१ डिसेंबर २००८ च्या दरम्यान. 

               (ड) मार्च/एप्रिल/मे २०२३ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेला बसणारा.

                (इ) जून २०२३ मध्ये इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा.

शारीरिक पात्रता : सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी पात्र असावा. UPSC ने NDA आणि INA साठी दिलेल्या शारीरिक सर्व निकषांस पात्र असावा. हे निकष UPSC तथा संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. काही प्रमुख निकष उंची - १५७ से.मी., वजन -४३ कि.ग्रॅ., छाती न फुगवता ७४ से.मी., फुगवून-७९ से.मी., रातांधळा किंवा रंगांधळेपणा नसावा. NDA/ INA प्रवेशासाठी UPSC च्या अधिसूचनेनुसार डोळ्यांची क्षमता असावी (eye) power).

 लेखी परीक्षा आणि मुलाखत : पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा इंग्रजी माध्यमातून ०९ एप्रिल २०२३ रोजी विविध केंद्रांवर घेतली जाईल. परीक्षेमध्ये एकाच प्रश्नपत्रिकेत १५० माकांचे बहुपर्यायी Multiple Choice Questions, ७५ गणिताचे आणि ७५ सामान्यज्ञान General Ability Test (GAT) असतील. लेखी परीक्षा साधारणतः इयत्ता ८ वी ते १०वीच्या स्टेट बोर्ड व सी.बी.एस.ई. च्या अभ्यासाक्रमावर आधारीत असेल. प्रत्येक योग्य उत्तराला (१) गुण मिळेल. यशस्वी परीक्षार्थीना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.

1. ऑनलाइन अर्ज www.spiaurangabad.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परीक्षा शुल्क रुपये ४५०/- (परत न करता येण्याजोगे) ऑनलाइन फक्त क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेटबँकींग इत्यादीद्वारे भरावे. डिमांड ड्राफ्ट किंवा चलनाद्वारे भरलेले परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार नाही. प्रवेश अर्ज संस्थेच्या अटी व शर्तीनुसार भरलेला नसल्यास अर्ज नामंजूर तसेच परीक्षा शुल्क परत मिळणार नाही.

 प्रवेश अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आणि वेळ १२ मार्च २०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. 

७. हॉल तिकीट : दिनांक ३० मार्च २०२३ सकाळी १०.०० वा. नंतर संस्थेच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येतील.

८. परीक्षासंबंधित सूचनांसाठी वेळोवेळी https://spiaurangabad.com/ हे संकेतस्थळ वेळोवेळी तपासावे. इतर कोठेही याबाबत सूचना दिल्या जाणार नाहीत...

स्वाक्षरित /-


(एस. फिरासत) 

मेजर (निवृत्त) प्रभारी संचालक

Post a Comment

0 Comments