शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या इयत्ता १ ली ते १२ वी च्या शाळांसाठी, शिक्षकांसाठी विविध योजना याचसोबत शिक्षकांसाठी विविध प्रशिक्षणांचे आयोजन, विविध राष्ट्रीय, राज्य स्तरीय शैक्षणिक सर्वेक्षणे (उदा. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण, राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षण इत्यादी) विविध शैक्षणिक योजना, विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय, राज्य स्तरावरून आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा, विविध ऑनलाईन उपक्रम, विविध उपक्रमांच्या अनुषंगाने मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजन, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य स्तरावरील विविध स्पर्धा, उपक्रम, विविध शैक्षणिक कार्यक्रम व त्यांची वेळापत्रके इत्यादी अशा अनेक अनुषंगिक बाबींसाठी राज्यस्तरावरून विभागस्तरावर / जिल्हास्तरावर / तालुकास्तरावर पत्र व्यवहार केला जातो.
राज्यस्तरावरून दिल्या जाणाऱ्या सूचनांच्या अनुषंगाने उपरोक्त बाबींची माहिती शाळास्तरावर अथवा शिक्षकांपर्यंत काहीवेळेस तत्काळ उपलब्ध होतेच असे नाही. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये राज्यस्तरावरील अशा स्वरुपाची महत्वाची शैक्षणिक माहिती, पत्रव्यवहार, तसेच शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रसिद्धी देण्याच्या दृष्टीने घेण्यात येणारे उपक्रम यांची माहिती राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षकांना एकाच वेळी व तात्काळ उपलब्ध व्हावे यादृष्टीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत टेलीग्राम चॅनेल सुरु करण्यात येत आहे. सोबतच्या लिंक वर क्लिक करून राज्यातील इ. १ ली ते इ. १२ वी चे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य सदरच्या टेलीग्राम चॅनेल मध्ये सहभागी होऊ शकतात.
राज्यातील इ.१ ली ते इ.१२ वी च्या सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांच्या सर्व मुख्याध्यापक/ प्राचार्य, सर्व शिक्षक यांच्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे टेलिग्राम चॅनेल सुरू करण्यात येत आहे.
राज्यातील सर्व शिक्षक खालील लिंक ला क्लिक करून या चॅनेल ला जॉईन होऊ शकतात.
ज्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्यापर्यंत शालेय शिक्षण विभागाचे उपक्रम अथवा माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे .सर्व शिक्षकांना सदर जॉईन होणेबाबत अवगत करण्यात यावे. असे (राजेश पाटील भा.प्र.से) संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी आदेश दिले आहे
टेलिग्राम चॅनेल ला जॉईन होण्यासाठी CLICK HERE
महत्त्वाचे - ज्या शिक्षकांच्या मोबाइल मध्ये टेलिग्राम हे APP नसेल त्यांनी PLAY STORE वरून खालील लिंक वरून APP INSTALL करा
टेलिग्राम APP LINK CLICK HERE
फेसबुक : https://www.facebook.com/MahaSCERT
ट्विटर : https://twitter.com/scertmaha
संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र
0 Comments