Subscribe Us

जिल्हा अतंर्गत बदली मधील संवर्ग 2 प्रक्रिया पूर्ण

 


बदली पोर्टल महत्त्वाचे

संवर्ग 2 अंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांची यादी मा. शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) यांचे पोर्टलवरील लॉगीन मधून प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच आपणास सुलभ संदर्भासाठी या द्वारे पुरविण्यात येत आहे.

संवर्ग 2 बदली झालेले शिक्षकांची यादी जि प बुलडाणा CLICK HERE


संवर्ग 2 बदली नंतर रिक्त जागांची यादीजि प बुलडाणा CLICK HERE

सुधारित बदली  पात्र यादी जि प बुलडाणा  CLICK HERE 


संवर्ग 3 यादी जि प बुलडाणा CLICK HERE

जि. प. बुलडाणा अंतर्गत 54 शिक्षकांनी संवर्ग 2 अंतर्गत अर्ज केला आहे त्यापैकी 53 शिक्षकांना पोर्टल द्वारे त्यांचे पसंतीक्रमानुसार बदली मिळाली आहे


संवर्ग 2 ची बदली प्रक्रीया झाले नंतर झालेली सुधारीत रीक्त पदांची यादी मा. शिक्षणाधिकारी ( प्राथ) यांचे लॉगीन मधून  पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.तसेच आपणास सुलभ संदर्भासाठी या द्वारे पुरविण्यात येत आहे.

संवर्ग २ मधून झालेल्या रिक्त जागा आणि संवर्ग 1 ची बदली झाल्या नंतर ज्या जागा संवर्ग 2 ने वापरल्या नाही अश्या सर्व जागा मिळून नवीन यादी प्रसिद्ध केली आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.


या शाळेत रिक्त जागा आहे पण मला बदली नाही मिळाली ? 👉👉👉कारण ही जागा संवर्ग २ बदली नंतर रिक्त झाली आहे.  ज्या जागा आधी रिक्त होत्या आणि बदली पात्र शिक्षक होते त्या प्रमाणे संवर्ग २ ची बदली झाली आहे.


 संवर्ग भाग 2 मधून बदली झाले नंतर सुधारीत बदलीपात्र शिक्षकांची यादी सुद्धा मा. शिक्षणाधिकारी ( प्राथ) यांचे लॉगीन मधून  पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.तसेच आपणास सुलभ संदर्भासाठी या द्वारे पुरविण्यात येत आहे.

सदर यादीमध्ये ज्यांचे नावासमोरील Status मध्ये TRANSFERRED आहे त्यांची बदली झाली आहे. 

 सदर यादीमध्ये ज्यांचे नावासमोर  Status मध्ये TAGGED आहे त्यांना खो बसला आहे.


 सदर यादीमध्ये ज्यांचे नावासमोर  Status मध्ये ELIGIBLE आहे ते अद्यापही बदली पात्र आहेत व अशा शिक्षकांच्या जागा संवर्ग -3 मधील शिक्षक मागू शकतात. 


उद्या पासून बदली अधिकार प्राप्त शिक्षक ( संवर्ग - 3 )  विकल्प भरू शकतील. त्यांना या साठी 4 दिवस दिले आहेत.


जिल्हा बदली नियंत्रण कक्ष

जिल्हा परिषद बुलडाणा



Post a Comment

0 Comments