Subscribe Us

प्रजासत्ताक दिन सांस्कृतिक कार्यक्रम जि. प. उच्च प्रा. शाळा, गोदरी दि.26 जानेवारी 2023

 प्रजासत्ताक दिन सांस्कृतिक कार्यक्रम जि. प. उच्च प्रा. शाळा, गोदरी  दि.26 जानेवारी 2023

आज दि.26 जानेवारी 2023 रोजी जि. प. उच्च प्रा. शाळा, गोदरी  तालुका चिखली जिल्हा बुलडाणा या ठिकाणी 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापकयांनी  ध्वजारोहण केले.केंद्र आणि तालुका स्तरीय क्रीडास्पर्धेत चमकदार कामगिरी करून यशस्वी झालेल्या खेळाडुंचे कौतुक करण्यात आले. एकलव्य ज्ञानवर्धिनी सामान्य ज्ञान स्पर्धा मध्ये प्रथम द्वतीय  क्रमांक आलेल्या विद्यार्थी व शाळेत आयोजित सामान्य ज्ञान प्रश्न संकलन वही मध्ये क्रमाक आलेल्या  तालुका स्तरीय विज्ञान स्पर्धेतील प्रश्न मंजुषा ,प्रदर्शनात सहभागी विद्यार्थी यांचे  सहभागी विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी इयत्ता निहाय सामूहिक नृत्य, कलाविष्कार सादर केले. याप्रसंगी सरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती सर्व पदाधिकारी,ग्रामपंचायत पदाधिकारी, गावातील सर्व सन्मानीय प्रतिष्ठित मंडळी,तरुण मंडळी, माता भगिनी ग्रामपंचायत सचिव, शाळेचे सर्व शिक्षकवृंद,अंगणवाडी कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments