Subscribe Us

30 हजार शिक्षक भरती करीता TAIT EXAM 2022 परीक्षेचे ऑनलाईन अर्ज सुरु On Line Application Start For Teacher Recruitment


30 हजार शिक्षक भरती करीता  TAIT EXAM 2022 'परीक्षेचे ऑनलाईन  अर्ज सुरु  On Line Application  Start For Teacher  Recruitment

 १. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र' या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता 'शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी २०२२' या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रणालीव्दारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

TAIT EXAM  प्रसिद्धी पत्रक CLICK HERE 

अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक CLICK HERE



२. उपलब्ध पदसंख्या : राज्यातील शिक्षण सेवकांच्या / शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती, विषय, प्रवर्ग, माध्यम व बिंदू नामावली नुसार 'पवित्र' (PAVITRA-Portal For Visible To All Teacher Recruitment) या संगणकीय प्रणालीव्दारे प्रसिध्द करण्यात येईल.

३. परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रमः


३.१ परीक्षेचे माध्यम : परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्रजी व उर्दू असेल. भाषिक क्षमता (मराठी) व भाषिक क्षमता (इंग्रजी) यावरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न व्दिभाषिक असतील. त्यामुळे परीक्षार्थीनी इंग्रजी मराठी अथवा इंग्रजी - उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरतेवेळी निवडणे आवश्यक आहे.


अ) अभियोग्यता या घटकांतर्गत गणितीय क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता (इंग्रजी), भाषिक क्षमता (मराठी), अवकाशीय क्षमता, कल / आवड, समायोजन / व्यक्तीमत्व इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील.

ब) बुध्दिमत्ता या घटकांतर्गत आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम श्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबध्द मांडणी इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील.

सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही. त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्टस्तर मर्यादा असणार नाही. क) परीक्षा कालावधी : परीक्षेसाठी दोन तासांचा ( १२० मिनिट) कालावधी राहील.

पवित्र पोर्टल शिक्षक पद भरतीच्या विद्यमान तरतूदी सुधारित करणे व नवीन तरतूदी समाविष्ट करणे

शासन निर्णय    CLICK HERE

पवित्र पोर्टल login   CLICK HERE

४. पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी:

४. ९ नियुक्त करावयाच्या रिक्त पदांचा सामाजिक समांतर आरक्षण, अध्यापनाच्या विषयाच्या रिक्त पदांबाबतचा तपशील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी व्यवस्थापन यांच्या पवित्र प्रणालीवरील जाहीरातीनुसार राहील.

४. २ विविध मागास प्रवर्ग, महिला, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, अनाथ इत्यादीसाठी सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील. ४. ३ महिलांसाठी आरक्षित पदाकरीता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचाअसल्यास अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी (Domiciled) असल्याबाबत तसेच नॉनक्रीमीलेअर (non creamy layer) मध्ये मोडत असल्याबाबत (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून)स्ष्टपणे दावा करणे आवश्यक आहे.

४. ४ ऑनलाईन अर्ज करतांना एखादी जात / जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केली असल्यासच तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले प्रमाणपत्र उमेदवारांकडे उपलब्ध असेल तर संबंधित जात/ जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील.

४.५ समांतर आरक्षणाबाबत शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही- १०१२/प्र.क्र.१६/ १२ / १६ अ, दि. २३ ऑगस्ट २०१४ तसेच शासन शुध्दीपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकिर्ण- १११८/प्र.क्र.३९/१६-अ, दिनांक १९ डिसेंबर, २०१८ आणि तद्नंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.

४. ६ आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील (ईडब्लूएस) उमेदवारांकरीता शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग,

क्रमांक: राआधो-४०१९/प्र.क्र. ३१/१६-अ, दिनांक १२ फेब्रुवारी २०१९ व दिनांक ३१ मे २०२१ अन्वये विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.

४.७ अद्ययावत नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र / आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा म्हणून सक्षम प्रधिकाऱ्याने वितरीत केलेले व ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

४.८ आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५० च्या कलम २० अनुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असेल.

४.९ आरक्षणाचा ( सामाजिक अथवा समांतर) अथवा सोयी सवलतींचा दावा करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित कायदा / नियम / आदेशानुसार विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापूर्वीचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे.

४.१० खेळाडूसाठीचे आरक्षण: शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक: राक्रीधो- २००२/प्र.क्र.६७/ क्रियुसे-२, दिनांक १ जुलै २०१६ तसचे शासन शुध्दीपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक: राक्रीधो-२००२/प्र.क्र.६७ / क्रियुसे-२, दि. १८ ऑगस्ट २०१६, शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक: संकिर्ण- १७१६/प्र.क्र.१८/क्रीयुसो-२, दि. ३० जून २०२२ आणि तद्नंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्राविण्यप्राप्त खेळाडू आरक्षणासंदर्भात तसेच वयोमर्यादा सवलती संदर्भात कार्यवाही करण्यात येईल.

प्रावीण्यप्राप्त खेळाडू व्यक्तीसाठी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत क्रीडा विषयक विहित अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले पात्र खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचे किंवा तत्पूर्वीचे असणे बंधनकारक आहे.

४. ११ दिव्यांग आरक्षणः दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या आधारे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्र. दिव्यांग २०१८/प्र.क्र. ११४/१६ अ, दि. २९ मे २०१९ तसेच या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तींच्या आरक्षणासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या वयोमर्यादेचा अथवा इतर कोणत्याही प्रकारचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्र. अप्रकि- २०१८/प्र.क्र. ४६ / आरोग्य-६, दि. १४ सप्टेंबर २०१८ मधील आदेशानुसार केंद्रशासनाच्या www.swavlambancard.gov.in अथवा SADM या संगणकीय प्रणालीव्दारे वितरीत करण्यात आलेले नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.

४.१२ अनाथ आरक्षण: अनाथ व्यक्तीचे आरक्षण शासन निर्णय, महिला व बालविकास विभाग, क्र. : अनाथ - २०१८ / प्र.क्र. १८२/का-०३, दि. २३ ऑगस्ट २०२१ तसेच या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील.

४. १३ माजी सैनिक आरक्षणः उमेदवार माजी सैनिक स्वतः तसेच शहीद सैनिकांचे कुटुंबीय असल्यास त्यांनी त्याबाबत स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे, अन्यथा त्यास अनुज्ञेय असलेले लाभ मिळणार नाहीत. माजी सैनिकाकरीता आरक्षणा संदर्भातील तरतुदी शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या आदेशानुसार असतील.

४.१४ प्रकल्पग्रस्त आरक्षण: शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्र. एईएम-१०८०/३५/१६-अ, दि. २०/०१/१९८० तसेच यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी नमुद करण्यात येणाऱ्या आदेशानुसार प्रकल्पग्रस्तासाठीचे आरक्षण राहील.

४.१५ भूकंपग्रस्त आरक्षण: शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्र. भूकंप-१००९/प्र.क्र.२०७/२००९/१६- अ, दि. २७/०८/२००९ तसेच या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी नमूद करण्यात येणा-या आदेशानुसार भूकंपग्रस्ताचे आरक्षण राहील.

४.१६ पदवीधर अंशकालिन कर्मचारी आरक्षण : शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र. पअंक- १००९/प्र.क्र.२००/२००९/१६-अ, दि. २७/१०/२००९ तसेच या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी नमूद करण्यात येणाऱ्या आदेशानुसार पदवीधर अंशकालिन कर्मचारी आरक्षण राहील.

५. उमेदवारांची पात्रता -

५.१ भारतीय नागरीकत्व

५. २ वयोमर्यादेबाबत शासन वेळोवेळी शासन निर्णयाव्दारे विहित करील, अशी वयोमर्यादा शिक्षण सेवकांना/शिक्षकांना लागू होईल.

५. ३ शैक्षणिक व व्यावसायिक अर्हताः शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण २०१८/प्र.क्र.३९७ / टीएनटी-१, दि. ०७ फेब्रुवारी २०१९, शासन शुध्दीपत्रक २५ फेब्रुवारी २०१९, १६ मे २०१९, १२ जून २०१९ तसेच शासनाचे वेळोवेळीच्या आदेशानुसार अर्हताप्राप्त उमेदवार सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.

प्रस्तुत जाहीरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक व व्यावसायिक अनुषंगिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग विभाग शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२२/प्र.क्र.१०६ / टीएनटी-०१, दि. १०/११/२०२२ अनुसार उमेदवारास प्रत्येक वेळी नव्याने होणान्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीस प्रविष्ठ होणे अनिवार्य राहील. उमेदवाराचे त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिध्द झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.

६. निवड प्रक्रिया: परीक्षेत मिळालेले गुण सर्व प्रकारच्या शाळांमधील (प्राथमिक/ उच्च प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक/ अध्यापक विद्यालय/रात्र शाळा) पद भरतीसाठी ग्राहय धरण्यात येतील.

शिक्षण सेवक भरती प्रक्रिया शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. सी.ई.टी. २०१५/प्र.क्र. १४९/ टीएनटी-१, दि. ०७/०२/२०१९, शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२२/प्र.क्र.१०६/ टीएनटी-१, दि. १०/११/२०२२ तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राहील.

७. ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत:

७.१ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरविण्यात आलेल्या https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/ या लिंकव्दारे विहित पध्दतीने नोंदणी करून आपला ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.


७.२ परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे आवश्यक आहे.

७.३ ऑनलाईन अर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील. (अ) पासपोर्ट साईज फोटो उमेदवाराने त्याचा स्कॅन केलेला नवीनतम पासपोर्ट साईज (४.५ सेमी

- X ३.५ सेमी) फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.

आकारमान 200X300 pixels

फाईल साईज - 20 kb - 50kb

(ब) स्वाक्षरी उमेदवाराने त्याची पांढऱ्या कागदावर काळया शाईने स्वाक्षरी करून स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे.

आकारमान 140X60 pixels

फाईल साईज 10kb 20 kb

(क) डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी उमेदवाराने त्याच्या डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी (३ सेमी x ३ सेमीपांढऱ्या कागदावर काळया / निळयाशाई मध्ये) स्कॅन केलेली प्रतिमा अपलोड करणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराला डाव्या हाताचा अंगठा नसेल अशा उमेदवारांनी उजव्या हाताच्या अंगठयाची निशाणी वापरावी. आकारमान 240X240 pixels in 200 DPI

फाईल साईज 20kb - 50kb

(ड) स्व- हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र उमेदवाराने त्याच्या स्व- हस्ताक्षरातील इंग्रजीतील खालील प्रतिज्ञापत्र (१० सेमी x ५ सेमी पांढऱ्या कागदावर काळया / निळया शाई मध्ये लिहीलेले) अपलोड करणे आवश्यक आहे.

आकारमान 800X400 pixels in 200 DPI

फाईल साईज - 50kb - 100 kb

स्व- हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्राचा नमूना

"I, (Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required."


सदरचे प्रतिज्ञापत्र उमेदवाराने स्वतःच्या हस्ताक्षरात इंग्रजीमध्येच लिहून त्याची स्कॅन प्रत अपलोड करणे आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्र टंकलिखित केलेले, दुसऱ्या व्यक्तीने अथवा अन्य भाषेत लिहिलेले आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. (लिहू न शकणाऱ्या अंध अथवा अल्प दृष्टी उमेदवारांनी टंकलिखित प्रतिज्ञापत्रावर स्वतःच्या डाव्या हाताच्या अंगठयाचा ठसा उमटवून सदरच्या प्रतिज्ञापत्राची प्रत अपलोड करणे आवश्यक आहे.)

७. ४ परीक्षेचे शुल्क :

१. खुल्या संवर्गातील उमेदवार (अराखीव): रु. ९५०/-

२. मागासवर्गीय/ आर्थिक दृष्टया दुर्बल घटक/ अनाथ / दिव्यांग उमेदवारः रु. ८५०/- ३. परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.


४. उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.

५. विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करु न शकलेल्या उमेदवारांचा संबंधित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही.


७.५ जिल्हा / परीक्षा केंद्र निवडः अर्ज सादर करतांना ३ (तीन) जिल्हा / परीक्षा केंद्रांची निवड करणे अनिवार्य आहे. जिल्हा / परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परीस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही. एखादे जिल्हा / परीक्षा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्हा / परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली तर ते जिल्हा / परीक्षा केंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था दुसऱ्या जिल्हा / परीक्षा केंद्रावर करण्यात येईल.


८. प्रवेशपत्र :

८.१ परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या उमेदवारांची प्रवेशपत्रे www.mscepune.in संकेतस्थळावर विशिष्ट लिंकव्दारे उपलब्ध करून देण्यात येतील. त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाऊनलोड करून घेणे व परीक्षेच्यावेळी उमेदवारांनी सादर करणे आवश्यक आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.

८.२ परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसेन्स या पैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. प्रवेशपत्र व ओळखपत्र या दोन्ही नावामध्ये कोणत्याही स्वरूपाची तफावत असू नये.


९. परीक्षेस प्रवेश :

९.१ फक्त पेन, पेन्सिल, प्रवेशपत्र, ओळखीचा पुरावा व ओळखीच्या पुराव्याची सुस्पष्ट छायांकित प्रत अथवा प्रवेशपत्रावरील सुचनेनुसार परवानगी दिलेल्या साहित्यासह उमेदवाराला परीक्षाकक्षात प्रवेश देण्यात येईल.

९. २ स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईल, कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, ब्लू टूथ, दूरसंचारसाधने म्हणून वापरण्यायोग्य कोणत्याही वस्तू, कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वया, नोट्स, पुस्तके, बॅग्ज, परिगणक (Calculator) इत्यादी प्रकारची साधने / साहित्य परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास, स्वतः जवळ बाळगण्यास, त्याचा वापर करण्यास अथवा त्याच्या वापरासाठी इतरांची मदत घेण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य उमेदवारांनी आणल्यास ते परीक्षा केंद्राबाहेर ठेवण्याची व त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. यासंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अथवा परीक्षा केंद्र व्यवस्थापन अथवा परीक्षा आयोजक जबाबदार राहणार नाहीत.


१०. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली माहिती/ जाहिरात अधिकृत समजण्यात येईल.


१९. सदर जाहिरात परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


१२. सदर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करतांना उमेदवारांना काही अडचण उद्भवल्यास msce.tait2022@gmail.com या इमेल वर संपर्क साधता येईल.


ठिकाण : पुणे

दिनांक : ३१/०१/२०२३

(संजयकुमार राठोड

उपायुक्त तथा सदस्य सचिव शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी २०२२ समिती, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -०१,

Post a Comment

0 Comments