Subscribe Us

चिखली तालुका क्रीडा स्पर्धा २०२२-२३ खोखो कबड्डी सामने मुली क्षणचित्रे दिनांक १७ जानेवारी

 तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा  तालुका- चिखली 

खो खो  मुली-   विजयी -मंगरूळ नवघरे केंद्र 

                     उपविजयी -सावरगाव डुकरे केंद्र 

कब्बडी   मुली-   विजयी - गांगलगाव केंद्र  

                        उपविजयी- सवना  केंद्र




    आज दि.17 जानेवारी 2023 रोजी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा चंदनशेष क्रीडा मंडळ मैदान सवणा येथे मोठ्या थाटामाटात सुरू झाल्या. सदर स्पर्धेचे उद्घाटक म्हणून मा. श्री अविनाशजी निवालकर अधीक्षक शालेय पोषण आहार (वर्ग-2) तसेच अध्यक्षस्थानी मा.श्री समाधानजी खेडेकर सर, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, चिखली हे होते.प्रमुख अतिथी म्हणून चंदनशेष क्रीडा मंडळाचे अध्यक्ष  आदरणीय पद्माकर भाऊ भुतेकर, सचिव आदरणीय श्री करवंदे सर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संजयभाऊ जोशी तसेच सर्व केंद्रप्रमुख  हे सर्व होते. याप्रसंगी क्रीडा मंडळाचे सर्व सन्माननीय संचालक ,शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, चिखली तालुक्यातील सर्व सन्माननीय मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका एंडोले  मॅडम ,सर्व शिक्षक वृंद, शिक्षक पतसंस्थेचे(422) पदाधिकारी तसेच गावकरी मंडळी उपस्थित होते. येथील विद्यार्थिनींनी स्वागत गीताने सर्व पाहुण्यांची स्वागत केले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदरणीय श्री आर.आर.पाटील सर शिक्षण विस्तार अधिकारी  यांनी केले. श्री साळवे सर यांच्या आवाजात राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर श्री गणेशजी भुतेकर सर  मार्गदर्शनाखाली चांदई येथील विद्यार्थ्यांच्या लेझीम संचाने संदेशे आते है व देश रंगीला या गीतांवर अतिशय सुंदर लेझीमनृत्य सादर करून उपस्थितांची मने  जिंकली. श्री सपकाळ सर,श्री खेडेकर सर व श्री निवालकर साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अतिशय सुरेल सूत्रसंचालन श्री फारुख सर यांनी केले.आभार प्रदर्शन श्री साळवे सर यांनी केले. या स्पर्धेत चिखली तालुक्यातील केंद्रस्तरावर विजेते व उपविजेते झालेल्या संघांनी कबड्डी,खो-खो ,100मी धावणे,200मी धावणे  ह्या खेळांत भाग घेतला. सदर स्पर्धेसाठी श्री सुरडकर सर व त्यांचे सहकारी शिक्षकवृंद तसेच चंदनशेष  क्रीडा मंडळाचे संचालक मंडळ व पंच, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, माजी खेळाडू यांनी विशेष मेहनत घेतली.






Post a Comment

0 Comments