पदविधर मतदार बंधूनो.. मतदान काळजीपूर्वक करावे
मतदार यादीमध्ये आपले नाव व मतदान केंद्र शोधा CLICK HERE
मतदान कसे करावे?
- मतदान करण्यासाठी मतपत्रिकेसोबत दिलेल्या जांभळ्या स्केच पेनचाच वापर करावा.
- आपणास दिलेल्या जांभळ्या शाईच्या स्केच पेन व्यतिरिक्त अन्य साधनाने जसे इतर कोणताही पेन, पेन्सिल, बॉल पॉईंट पेन किंवा अन्य साहित्य याद्वारे पसंतीक्रम नोंदविल्यास मतपत्रिका बाद होईल.
- . मतदान पसंतीक्रमानुसार असल्याने पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर 1 हा अंक लिहून मतदान करावे. 1 हा अंक फक्त एकाच उमेदवाराच्या नावासामोर लिहावा.
- • मतपत्रिकेवर नमुद करावयाचा पसंतीक्रम फक्त अंकांमध्येच (मराठी, देवनागरी, इंग्रजी, रोमन किंवा राज्य घटनेतील आठव्या परिशिष्टामध्ये नमुद कोणतीही इतर भारतीय भाषा) नमुद करावयाचा आहे.
- सदर पसंतीक्रम शब्दात (एक, दोन...) लिहू नये.
- • पसंतीच्या उमेदवारापुढे "X", "/" असे करू नये.
- • मतपत्रिकेवर नाव / एखादा शब्द किंवा कुठेही सही / अंगठा करू नये.
मतदान याद्या पहा CLICK HERE
मतदानाच्या दिवशी सुट्टी CLICK HERE
मतपत्रिका बाद केव्हा ठरेल?
- पसंतीक्रम 1 लिहीला नसेल.
- 1 हा पसंतीक्रम एकापेक्षा जास्त उमेदवारास दिला असल्यास.
- पसंतीक्रम 1 नक्की कोणत्या उमेदवाराला आहे? याचा बोध होत नसल्यास.
- पसंतीक्रम 1 लिहिल्यानंतर त्याच उमेदवारासमोर 2, 3, 4, 5 असे पसंतीक्रम लिहिल्यास.
- पसंतीक्रम शब्दात (एक, दोन... ) असा नोंदविला असल्यास.
- पसंतीक्रमाबरोबर इतर कुठल्याही प्रकारची खुण असेल (सही करणे, नाव लिहिणे, अंगठा देणे इ.) ज्यामुळे मतदाराची ओळख पटेल.
- मतदान केंद्रावर पुरविलेल्या जांभळ्या रंगाच्या शाई व्यतिरिक्त इतर शाईने पसंतीक्रम लिहिल्यास.
पदवीधर निवडणुकीत मतदानकसे करावे?यासाठी हा वीडियो अवश्य पाहा https://youtu.be/_FWpMHY7LFc
![]() |
0 Comments