Subscribe Us

प्रजासत्ताक दिनी शाळांमध्ये मुख्याध्यापकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचे शिक्षणाधिकारी यांचे आदेश

  प्रजासत्ताक दिनी शाळांमध्ये मुख्याध्यापकांच्या हस्ते  ध्वजारोहण करण्याचे शिक्षणाधिकारी यांचे आदेश 

 पदविधर मतदार संघ निवडणुकीची आचारसंहिता लागु असल्यामुळे दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासस्ताक दिनानिमित्त शासकीय कार्यालये, शाळा इत्यादी ठिकाणी होणारे ध्वजारोहण संबधित कार्यालयाच्या कार्यालयीन प्रमुख्यांच्या हस्ते करण्यात यावे. शाळांमधील ध्वजारोहण हे तेथील मुख्याध्यापक यांचे हस्ते करण्यात यावे. कार्यक्रमादरम्यान आचारसंहिता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे आदेश शिक्षणाधिकारी माध्यमिक प्राथमिक यांनी यांनी दिले आहेत

आदेश वाचा

महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी शि. सो. झणके यांनी दिनांक 12. 8. 2005 या दिवशी सर्व विभागांचे विभागीय आयुक्त व सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परिपत्रक काढून सूचना दिलेल्या आहेत. या दिलेल्या पत्रामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झेंडावंदन कुणी करावे याबाबत स्पष्ठ सूचना दिलेल्या आहेत. या पत्रा मध्ये संदर्भ क्रमांक १ ला शासनाचे पत्र दिनांक 15. 3. 2004 दिलेले आहे. तसेच संदर्भ क्रमांक 2 ला माहितीच्या अधिकार नियम 2002 च्या अर्जाचा उल्लेख केला आहे .

या परिपत्रकामध्ये स्पष्ठ सांगितले आहे कि सदर संदर्भ १ च्या परिपत्रकामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झेंडावंदन कुणी करावे याबाबतचे आदेश दिलेले आहेत. वरील संदर्भाधिन पत्र क्रमांक 1 अन्वये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये झेंडावंदन कुणी करावे याबाबत सर्व जिल्हा परिषदांना सूचना देण्यात आलेल्या होत्या तथापि संदर्भातील पत्र क्रमांक दोन च्या संदर्भात पुनश्च कळविण्यात येते की केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयामार्फत राष्ट्रीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रसंगी कशाप्रकारे ध्वजारोहण करण्यात यावे याबाबतच्या सूचना प्राप्त होत असतात. त्याप्रमाणे राज्यात ध्वजारोहणाचे कार्यक्रम साजरे करण्यात येतात. केंद्र शासनाच्या सूचनांनुसार मुंबईत माननीय राज्यपाल, माननीय मुख्यमंत्री तसेच जिल्हास्तरावर त्या-त्या जिल्ह्याचे पालकमंत्री तालुकास्तरावर तहसीलदार व प्रांताधिकारी व शाळांमधून शाळांचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहण होते. कृपया या प्रमाणे कार्यवाही करावी असा स्पष्ट उल्लेख माननीय कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन शि. सो. झणके यांनी आदेश दिलेले


Post a Comment

0 Comments