राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) बुधवार दि. २१ डिसेंबर २०२२ अंतीम सूची
प्रसिध्दीपत्रक CLICK HERE
अंतिम उत्तरसूची
Final Answer Key
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत बुधवार दि. २१.१२.२०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या https://www.mscepune.in/ व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
सदर परीक्षेच्या MAT व SAT पेपरच्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी / आक्षेपबाबतचे ऑनलाईन निवेदन दि. ०४/०१/२०२३ अखेरपर्यंत पाठविण्याबाबत दिनांक २८/१२/२०२२ रोजीच्या प्रसिध्दी निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन / आक्षेप स्विकारले जाणार नाहीत, तसेच सदर परीक्षेसाठी गुणपडताळणी केली जात नाही याची मुख्याध्यापकांनी, पालकांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
या अंतिम उत्तरसूचीनुसार राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
0 Comments